
चंद्रपूर जिल्ह्यातील OYO हॉटेल्स ची कायदेशीर चौकशी करा- नरेंद्र सोनारकर
बल्लारपूर प्रतिनिधी-
उडिसा च्या रितेश अग्रवाल यांनी
2013 मध्ये स्थापित केलेले ओयो हॉटेलचे भारतभर स्थापत्य झाले. हजारो ओयोची सरकारी वही ठायी नोंदही झाली. मात्र नियमांची ऐशी तैशी करून गल्ली गाेबाळात बुजगावण्या सारखे निर्माण होणारे ओयो हे कपल्स ला शरीरसुख भोगण्यासाठीचे अड्डे बनलत चालले आहे.

फक्त नफा कमविण्याच्या उद्देश असल्याने ओयो संचालक मूळ कागद पत्रांची पृष्टी न करताच रूम देत असतात. ज्यात काही अल्पवयीन मुली सुध्दा बळी पडत आहेत. याकडे पाेलिस विभागाच्या वतीने लक्ष देने अत्यंत गरजे आहे. त्यामुळे जिल्ह्यातिल सर्वच ओयो हॉटेल्सची पाेलिसांन मार्फत कायदेशीर चौकशी करून बेकायदेशीर चालवत असलेल्या ओयो हॉटेल्सला सील ठोकण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य संघटक नरेंद्र सोनारकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
बल्लारपूरात नुकतीच एक दुर्दैवी घटना घडली असून, ओयो संचालकाच्या अक्षम्य चुकीमुळे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याने आणि बदनामी मुळे त्या पीडित मुलीलाच आत्महत्या करून तिला आपला जीव गमवावा लागला.

चंद्रपूर जिल्ह्यातिल अनेक शहरात हे ओयो हॉटेल्स गल्ली गाेबाळात उभारले गेले याची परवानगी घेण्यात आली आहे का? याची संबंधित विभागा मार्फत कायदेशीर चौकशी होने महत्वाचे आहे. कारण बल्लारपूर येथील घटना उघडकीस आल्या नंतर इतर हॉटेल्स मध्ये असले प्रकार घडत नसतील, हे कशावरून..? असा प्रश्न सोनारकर यांनी उपस्थित केला आहे.
या संबंधाने राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे एक शिष्ट मंडळ लवकरच जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
आज राज्यातच नव्हे देशात वासनाअंधांनी कळस गाठला आहे.

आई, बहिणी सह 4- 5 वर्षाच्या चिमूरड्या ही आता सुरक्षित नाही…अशा भिषण अवस्थेत, पोलीस विभाग, पालक वर्ग, शिक्षक वर्ग, आणी जागरूक नागरिकांनी अशा घटनेला लगाम लावण्यासाठी सज्ज झाले पाहिजे असे आवाहन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य संघटक नरेंद्र सोनारकर यांनी केले आहे.




