Saturday, April 18, 2026
Google search engine

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमान प्रकरणी, चंद्रपुरात 4 सप्टेंबर ला निघणार भव्य निषेध मोर्चा.

आम्ही शिवप्रेमी चंद्रपूरकर तर्फे होणार आयोजन

आज चंद्रपूर येथील विश्रामगृहात आयोजित विविध सामाजिक संघटना तथा सर्वपक्षीय बैठकीचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात चंद्रपुरातिल सामाजिक संघटना, राजकिय पक्ष तथा सांसकृतिक, संघटनेचे पदधिकारी तसेच दाेनशेच्या संख्येने लाेकांनी आपली उपस्थिती दर्शवली. यात या माेर्चा बद्दल नियाेजन करण्याकरिता अनेक विषयावर चर्चा हाेवुन काही ठराव पास करण्यात आले.

मुख्यता छत्रपती शिवाजी महाराजांचा जलदुर्ग सिंधुदुर्ग शेजारी राजकोट वर आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा एकाएकी कोसळून पडला या घटनेचा निषेध आज विविध सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय लोकांच्या वतीने या बैठकित करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे. छत्रपती शिवराय हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा, स्वाभिमानाचा,अस्मितेचा आणि सन्मानाचा विषय आहे.

शिवरायांच्या नावावर या महाराष्ट्रात नेहमीच राजकिय सत्ता स्थापन झालेली आहे. असे असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जलदुर्ग असलेल्या सिंधुदुर्ग शेजारी राजकोट वर आठ महिन्यापूर्वी उभारलेला शिवछत्रपतींचा पुतळा एकाएकी कोसळून पडतो ही अत्यंत संतापजनक आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग लावणारी बाब आहे. या पुतळ्याचे उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी यांनी केलेले होते.

भारतीय नौदलाच्या अखत्यारीत या पुतळ्याचे बांधकाम पूर्ण झालेले असताना फक्त आठ महिन्यात हा पुतळा अपमानास्पद स्थितीत कोसळून पडावा हा संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा अपमान आहे.

त्याचबरोबर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली, कर्तुत्ववान पुराेगामी इतिहासाचा सुद्धा घोर अवमान आहे.

या भयानक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये सध्या तीव्र संताप असून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे. महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळा बांधकामात भ्रष्टाचार व्हावा ही क्लेशदायक घटना आहे.

350 वर्षापूर्वी खुद्द शिवाजी महाराज यांनी बांधलेला सिंधुदुर्ग हा किल्ला आजही दिमाखात उभा असताना 8 महिन्यापूर्वी उभा केलेला पुतळा पडतोच कसा? या पुतळ्याचे बांधकाम करताना आवश्यक ती काळजी का घेतली गेली नाही. त्यामुळे गांभीर्याने या घटनेची दखल घेऊन शिल्पकार आपटे, कंत्राटदार चेतन पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,त्यांचे सहकारी आणि या घटनेसाठी दोषी असलेल्या सर्वांवर ताबडतोब कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे व त्यांना अटक करण्यात यावे.

तसेच या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी… शिवस्मारकाच्या नावावर झालेल्या फसवणुकीचा, व वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी बुधवार दिनांक  4 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 चंद्रपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ( गिरनार चौक) ते जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर पर्यंत भव्य निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

या माेर्चा मध्ये विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी राजकीय पक्षाचे पदाधिकारी व चंद्रपूर जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिकांनी हजाराेच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान आम्ही शिवप्रेमी चंद्रपूरकर आयाेजन समितीने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page