अवैध दारू विक्री बंद करा अन्यथा आंदोलन करणार मंगेश तिखट यांचा इशारा.
कोरपना :-
तालुक्यातील नारंडा येथे अवैध देशी दारू ची सर्रास विक्री होत आहे. गावात महिला व पुरूष असे पाच दुकानदारांनी देशी दारू ची विक्री कोरपना पोलीस स्टेशन चा आशीर्वादाने जोमात सुरू आहे .
कुणाला हि न घाबरता बिनधास्त पणे विक्री करत असल्याने गावातील शाळाकरी मुलांवर, महिला यांच्या घरावर मोठा परिणाम होत आहे.
गावातील अवैध देशी दारू तत्काळ बंद करण्याचा यावी या करिता . राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गट चे युवा नेते मंगेश तिखट यानीं
18 ऑगस्ट रविवारी सकाळी सात ते आठ वाजता कोरपना पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले व त्यांना इशारा दिला की तालुक्यातील अवैध देशी दारू बंद करा अन्यथा आम्ही पोलीस प्रशासनाविरोधात आंदोलन करू, यावेळी गावातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



