कुणबी समाज एक वटणार वडेट्टीवाराचा सफाया होणार
✍️ रुपेश देशमुख ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी नुकत्याच लोकसभेच्या
निवडणुका संपल्या आता ऑक्टोबर २०२४ मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. अवघे तिन महिने निवडणुका शिल्लक असल्याने राजकीय पक्ष, राजकीय नेते कामाला लागले आहेत. विद्यमान महाराष्ट्र सरकार वारेमाप घोषणाचा पाऊस पाडून मतदारांना आकर्षिक करण्यासाठी विविध योजना घोषीत करीत आहे.
ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार वडेट्टीवार मागील १ वर्षापासूनच विजयदुत नावाने गावागावांतील तरूणांना उत्तेजीत करून मतदारापर्यंत पोहचुन मते मिळविण्याचा फंडा म्हणुन विजयदुत मतदारांना भुत लावीत आहे. वडेट्टीवारांनी दोन पंचवार्षीक निवडणुका ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातुन लढविल्या २०१४ मध्ये ७०३७३ मते मिळवुन मुंबई गाठली तेव्हा ब्रम्हपुरी विधानभा क्षेत्रात ३५ वर्षापासून काँग्रेसचा आमदार निवडून आलाच नव्हता. म्हणुन वडेट्टीवारांना मतदारांनी निवडून दिले. या प्रचाराला सोनिया गांधी आल्यात.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान वडेट्टीवारांनी मतदारांना आकर्षीत करण्यासाठी कंत्राटदार असलेले सुख समाधानी आहेत. आणि हिच मंडळी वडेट्टीवारासाठी फायदेशीर ठरणारी आहे. जरी भुमाफीया वाळूतस्कर, दारू तस्कर आणि मर्जीतले बांधकाम कंत्राटदार वडेट्टीवाराचे जवळील असले तरी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचा २ पंचवार्षिकचा रेकार्ड कायम राहणार आहे. कारण १९७० च्या इतिहासापासून बळले तर ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारे काँग्रेसला या क्षेत्रातुन पराभुत करणारे सुरेश उर्फ बाबा खानोरकर यांनी पहिल्यांदा जनतेच्या जोरावर सिंह चिन्ह घेवुन अपक्ष निवडणुक लढवुन जिंकली.
त्यानंतर पुरोगामी लोकशाही आघाडीच्या चरखा चिन्हावर निवडणुक लढवुन जिंकली. असे लगातार १० वर्ष ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व केले. तिसऱ्यांदा एका अति गरीब असणाऱ्या नामदेव दोनाडकर यांनी बाबा खानोरकराचा पराभव केला. यानंतर पुन्हा बाबा खानोरकर जनता दलाचे चक्र चिन्हावर निवडून आले. यानंतरच्या कालखंडात भाजपा अस्तीत्वात आला. ५ वर्ष उद्धवराव शिंगाडे यांनी या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व केले. आणि २००४ ते २००९, २००९ ते २०१४ पर्यंत भाजपाचे प्रा. अतुल देशकर ग्रह सुटणार नाही.
लालब बुरी बला है. घरका भेदी लंका द्वाये याप्रमाणे त्यांचे जवळीलच मंडळी मध्ये असा प्रकार केव्हा पर्यंत चालणार आम्ही काय सतरंज्याच उचलायच्या, आम्ही काय नुसता बडेड्डीबाराचा उदो उदो करून मते मिळवुन द्यायचे. व्ही. एम. च्या बटना दाबायचे, आम्हाला संधी कधी मिळणार अशी खदखद सुरू आहे. यापुर्वी भाजपाच्या प्रा. अतुल देशकरांना त्यांच्याच जवळील मंडळीनी प्रा. अतुल देशकराबर नाराजी सुर उमटवुन जोरदार झटका दिला. यामुळेच वडेट्टीवाराचा या विधानसभा क्षेत्रात डंका वाजला. याचप्रमाणे या विधानसभा क्षेत्रात कुणबी समाजाचे लोकसंख्येमध्ये सर्वात जास्त मतदार असुन या नंतरची लोकसंख्या बौद्ध समाजाची आहे. बौद्ध समाज रा.स्व. संघ आणि त्यांच्या भाजपाला चांगल्याप्रकारे ओळखुन आहे. यामुळे बौद्ध समाज पर्यायाने काँग्रेसला मतदान करतो. बडेड्डीबार याच समाजाचे गठ्ठा मतावर महाराष्ट्रात फुगड्या घालतो. महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडी बरेही सत्तेपासून दुर असली तरी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या
पक्षाना घाम फोडण्याचे काम करतो.



