Friday, April 17, 2026
Google search engine

सुसंस्कृत आणि शांत चंद्रपुर जिल्ह्याची गुन्हेगारीकडे वाटचाल

शांत प्रिय अशी चंद्रपुर जिल्ह्याची ओळख आहे मात्र चंद्रपुरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेन दिवस वाढलं जात आहे. नुकत्याच चंद्रपुर व बल्लारपुर या भागात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. यामुळं गुन्हेगारीच्या बाबतीत सुसंस्कृत आणि शांत चंद्रपुर हा गुन्हेगारीकडे वाटचाल करत आहे का? अशी चर्चा सध्या राजकीय, सामाजिक, जनतेच्या वर्तुळात हाेतआहे.

माेठ्या प्रमाणात गुन्हेगारीत चंद्रपुर वाटचाल करतोय का? असं का वाटतंय? काय आहेत कारणे?
जुगार, तस्करी, सट्टा, अवैध धंदे, गुंडेगीरी, गुन्हेगारी प्रशासनातिल भ्रष्ट्राचार हेच मुख्य कारण असेल असे म्हणावे लागेल.

चंद्रपुरातील वाढती गुन्हेगारी आणि वाढते गोळीबार पाहता कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. याला संपूर्णपणे जबाबदार राजकिय नेत्यांच्या अवती भवती असणारे काही गुंड प्रवृतीचे युवा नेतृत्व व जिल्ह्यातिल माेठ्या व्यवसाईकांचे आपसात असलेले मतभेद कारणीभुत आहेत, एकेकाळी महाराष्ट्र राज्य गुन्हेगारीच्या बाबतीत बिहारकडे वाटचाल करतांना दिसुन येत हाेता. आता तर चक्क चंद्रपुर मिनी बिहार झाले का? अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

पण मला असं मुळीच वाटत नाही. तर महाराष्ट्र बिहारकडे वाटचाल करत नसून, महाराष्ट्राचा बिहार झालेला आहे, दरम्यान, या सर्व गुन्हेगारीस राज्य सरकार आणि गृहमंत्री, पाेलिस यंत्रना कारणीभूत आहे.

महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचं राज्य आहे. अश्या घटना राज्यातच नव्हे तर चंद्रपुर शहरातच घडायला नकाे आहे. किवा घडणार नाही याची खबरदारी पाेलिस प्रशासनानी घ्यायला हवी. चंद्रपुरात कायदा सुव्यवस्था नियत्रंणात असायला हवे असतांना उलट चंद्रपुर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचेच तीनतेरा वाजले आहेत. अशी भीतीसुद्धा आता चंद्रपुरातिल प्रत्येक सामान्य लाेकांनी व्यक्त केली आहे.

चंद्रपुरातिल इतर भागात सतत गुन्हे घडत आहेत. त्यावर कुनाचे प्रतीबंध किवा अंकुश नाही त्यामुळं आपण महाराष्ट्रातल्या चंद्रपुरात राहतोय की बिहारमध्ये हेच समजत नाही.

नुकताच चंद्रपुरातिल रघुवंशी कॉप्लेक्स येथे गोळीबार झाला होता. ते प्रकरण ताजे असतांनाच गेल्या तिन चार दिवसाच्या अंतराने पुन्हा बल्लारपुर येथे उघडपणे गोळीबार होण्याची ही दुसरी घटना घडली.

( या पुर्वी बँकेच्या एका संचालकावर राजकिय पुरेस्पुर हेतुने गाेळीबार झाला हाेता हे विशेष )

आज पुन्हा एकदा राजुरा शहरात गाेळीबारच्या घटनेत एकाची हत्या झाल्याची धक्कादायक बातमी समाेर आली आहे. या अगाेदर सुध्दा राजुरा शहरात झालेल्या गाेळीबारात हत्या हाेवुन संपुर्ण राजुरा शहर हादरून गेले हाेते.

चंद्रपुर जिल्हा येथिल सामान्य माणसात असुरक्षितेची भावना निर्माण हाेत आहे, मनात अत्यंत चीड आणणा-या ह्या घटना घडत आहेत. अश्या घटने मुळे चंद्रपुर जिल्ह्याला गुन्हेगारीचा डाग लागत असेल तर जनता येथिल शासनकर्त्या नेत्यांना कदापी माफ करणार नाही. राज्यातच नव्हे तर चंद्रपुर जिल्ह्यात देखिल गुंडगिरी सतत वाढत चालली आहे. खुलेआम गोळीबाराच्या घटना घडत आहेत.

या सर्व बाबीचा आढावा घेत पुन्हा अश्या घटना घडु नये म्हणुन जिल्हा पाेलिस अधिक्षक यांच्या कडुन चंद्रपुरकरांना माेठ्या अपेक्षा आहेत. कुठे तरि पाेलिस प्रशासनानी या सर्व बाबीची दक्षता घेवुन यावर कसे अंकुश लावता येईल या करिता पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे आहे. नाही तर शांती प्रिय असणारा चंद्रपुर जिल्हा हा राज्यात गुन्हेगारीत अग्रस्थानी असेल याला नाकारता येणार नाही.

टिप :- शासन प्रशासनाच्या काही तक्रारी असल्यास 9371321070 या क्रमांकावर संपर्क करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page