
सगळ्यांनाच राजकारणात स्वारस्य असतं पण राजकारण सर्व आपला कामधंदा सांभाळून करायचं असतं एवढही भान आजच्या तरुण पिढीला नाही.
▶गावात गावात स्टॅण्डवर आपला फोटो छापलेला किमान एक तरी बॅनर झळकला पाहिजे असली भुक्कड स्वप्ने हे तरूण पाहतात असतात.
फक्त फेसबुक आणि व्हाट्सअपवर शेतकऱ्यांच्या पोस्ट करणारा युवक प्रत्यक्षात मात्र दिवसभर स्टॅण्डवर पडुन दिसतो. २३-२४ वय झालं कि १९-२० वर्षाच्या मुलीला लग्न करून घरी आणायचं, चार दिवसांचं कौतुक संपलं कि तिला कामावर जुंपायच आणि स्वतः मात्र मस्तपैकी स्टॅण्डवर गप्पा मारत पत्ते खेळत बसायचं असाच सध्या ग्रामीण भागातील तरुणांचा राेजचा कार्यक्रम आहे.

बायकोला आठवडाभराची रोजी मिळाली कि त्यातून स्वतः साठी चार पाचशे रुपये हिसकावुन
घ्यायचे, चहा दारू आणि पत्त्यांत उडवायचे एवढाच ग्रामीण भागातील तरुणांचा दिनक्रम असतो.
कोणत्या नेत्याने काय केलं, कुठं कुणी काय डाव टाकले, निवडणूक, राजकारण याच्याबाहेर हा तरुण यायलाच तयार नाही. वर्षातून येणारे सगळे सण साजरे करायचे त्यासाठी स्थानिक नेत्यांकडून पैसे गोळा करायचे, विविध महापुरुषांच्या जंयतीत डिझे समोर दारु पिऊन डिजेच्या तालावर झिंगायचं व गणपतीच्या मंडपाखाली पत्त्याचे डाव मांडायचे आणि पुढच्या ४-५ महिन्याची सोय करायची, नेत्याला सुद्धा माहित असतं या तरुणांना बनवायच कस ते पैसे फेकले कि, येतात धावुन हे यांना चांलच ठावुक असते.
राज्यात कोणत्याही कोपऱ्यात हीच परिस्थिती दिसेल. सगळेच वाईट आहेत असे मी म्हणार नाही, पण जे चांगले आहेत ते हाताच्या बोटावर मोजण्याइतके सुद्धा सापडणार नाहीत.
कधी एखाद्या गावात पारावर बसलेल्या मुलांना जाऊन विचाराव कि शेतात काम करायचंय, तीनशे रुपये रोज मिळेल, चलता का ? सगळी पोरं एका क्षणात गायब होतात. घरी बायको म्हणून आणलेली २०-२१ वर्षाची कोवळी पोर यांच्यासाठी आता हक्काची गुलाम असते. ती कमावते आणी यांनी मजा मारायची. घरातील स्त्री शेतावर राब राबत असताना हा महान आत्मा स्टॅण्डवर उभा राहून आपल्या मान-सन्मानाच्या गप्पा झोडत असतो.

एखाद्या कुत्र्यासारखा नेत्यांच्या मागे पुढे असताे अगदी तशीच यांची अवस्था असते. शेवटी अश्या तरूणांना गुलाम कुनी म्हणत असेततर त्यात काय चुकल? गावाच्या राजकारणात धडाडीने उतरणारा आजचा युवक ‘घरासाठी काहीतरी काम करायच म्हटलं तर क्षणात मागे हटतो. त्यांना काम नकोच.
कुणीतरी हातात पैसे आणून द्याव असं त्यांना वाटतंय आणि व्हाट्सअप वर शेतीसंबंधी मेसेज आला कि मस्तपैकी पुढच्या ग्रुप वर फॉरवर्ड करून शेतकऱ्यांसाठी आम्ही काहीतरी केल्याचा कागावा करत असताे.
यासाठी हक्काची गुलाम बायको आणि हक्काचा मालक नेता हे दोन मुख्य स्रोत असताना त्याला भविष्याची चिंता कधीच सतावत नाही. काय अपेक्षा करावी यांच्याकडून घंटा ? वाटत तरि काय क्रांती घडणार यांच्या हातून ? ताेंडात तंबाखू आणि मावा, डोक्यात नुसतं राजकारण, हातात कुणाचातरी झेंडा, अशी या युवकांची अवस्था आहे.
राजकारणात इंटरेस्ट कुणाला नसतो ? सगळ्यांनाच राजकारणात स्वारस्य असते… पण हे सर्व करतांना घर, काम-धंदा सांभाळून करायच असतं एवढही भान आजच्या तरुण पिढीला राहीले नाही.

एखाद्या गावात जाऊन शेती आंदोलनाला येण्यासाठी आवाहन करावं तर हीच शेतकऱ्यांची मुल पैसे किती मिळणार याचा हिशोब करतात, यांना आपन नेत्यांच्या हातचं बाहुलं बनुन आहाेत याच साध भान ही यांना नसत. राजकारणी नेते अश्या तरुणांना आपल्या हाताखालवी मांजर बनवतात.
आपण असला मूर्खपणा करतोय म्हणूनच दानवे सारखे भिकारचाेट राजकारणी आपल्याबद्दल म्हणजे शेतकऱ्या बद्दल अपशब्द वापरायची हिम्मत दाखवू शकतात. एवढही कस कळत नाही या तरुण पिढीला.
फक्त दानवेच नाही तर सगळेच नेते आज शेतक-यांबद्दल असलाच दृष्टिकोन बाळगून आहेत, फक्त दानवे उघडउघड बोलले हाेते, आणि बाकीची खाजगीत बोलतात इतकाच फरक आहे. आणि याच कारणाने म्हणजे शेतकऱ्यांची मुल, ज्यांच्या जीवावर शेतकरी उज्ज्वल शेतीचं स्वप्न पाहतोय ती या नेत्यांच्या हातचं बाहुलं बनल आहेत. फेसबुक, व्हॉटसऑप, व्यसनाधीनता व राजकारणामुळे ग्रामीण भागातला तरुण झाला आळशी झाला आहे.
म्हणुन अश्या तरूणांनी स्वताची अक्कल स्वताहुन काही राजकीय नेत्यांनकडे गाहाण ठेवली आहे. ती आता कुठे तरि जागेवर आनुन तरूणांनी विचार करायला हवे. नाही तर उरलेल आयुष्य तुमच असच निघुन जाईल हे मात्र खर असेल…..



