Friday, April 17, 2026
Google search engine

माैलाना अबुल कलाम आझाद गार्डन येथिल जलतरण तलावाच्या नुतनीकरणाची मागणी.

    ✍️……..निलेश ठाकरे

चंद्रपुर शहराच्या अगदी मध्यभागी असलेला एकमात्र अबुल कलाम आझाद गार्डन आहे. हे गार्डन फार जुने असुन शहरातील जेष्ठ महिला / पुरूष नागरीक तसेच युवा वर्ग आणि लाहान मुल / मुली माेकळा श्वास घेण्यास तसेच आराेग्य उत्तम राहावे याकरिता राेज माेठ्या प्रमाणात पहाटे पासुनच येत असतात.

चंद्रपूर शहरातल्या लोकांना शहराच्या अगदी मध्यभागी असलेल्या निसर्गरम्य पोषक वातावरणात मौलाना अबुल कलाम आझाद गार्डन येथील जलतरण केंद्राचा उत्तम पणे उपयोग घेता यावे म्हणुन जलतरण तलाव सुध्दा आहे. परंतु ते तलावच आता नुतनीकरणाच्या प्रतिक्षेत दिसुन येत आहे.

काही वर्षा पुर्वीच संपुर्ण माैलाना अबुल कलाम गार्डन येथील, चंद्रपुरचे पालक मंत्री यांच्या पुढाकाराने तथा चंद्रपुर महापालिकेच्या वतीने एका खाजगी कंत्राटदाराला नुतनीकरणाचे काम देण्यात आले हाेते.


हे गार्डन शहराच्या अगदी मध्यभागी असलेला एकमेव गार्डन असुन नुतनीकरण झाल्या पासुन या गार्डनला बघण्या चंद्रपुर महानगरातील नागरिक माेठ्या प्रमाणात येत असतात. शनिवार, रवीवारला तर गार्डनला सह – कुटुंब साेबत येथे चिक्कार गर्दी करत असतात.

या गार्डनच्या नुतनी करणाच्या उदघाटनाच्या प्रसंगी नुतनीकरणाच्या कामाचे श्रेय, घेण्यास पालक मंत्री तथा आमदार यांच्यात चांगलीच स्पर्धा रंगलेली नागरिकांनी बघीतलेली हाेती.

चंद्रपुर माहानगरपालिका व कंत्राटदार यांच्या ५ वर्षाच्या करारनाम्या नुसार या गार्डनचे मेंटेनन्स कंत्राटदारालाच करायचे आहे, असे कंत्राटदाराच्या वर्कआडर मध्ये स्पष्ट पणे नमुद आहे. परंतु कंत्राटदार मात्र गार्डन मेंटनेन्सच्या कामाकडे जानिव पुर्वक दुर्लक्ष करतांना दिसुन येताे.

कंत्राटदारा बाबत गार्डन येथे येणा-यां नागरिकांच्या ब-याच तक्रारी असुन सुध्दा मनपा मार्फत अजुन पर्यंत कुठली ही ठाेस कारवाही कंत्राटदारावर केल्या गेली नाही व केल्या ही जात नाही? याचे मुख्य कारण म्हणजे कंत्राटदार हा आयुक्तांच्या अगदी निकटवर्ती असल्याचे, दबक्या आवाजात नागरीकांकडुन बाेलल्या जाते.

गार्डनमध्ये अनेक ठीकानी मेंटेनन्सचे काम करने गरजेचे.

१९८० च्या दरम्यान या अबुल कलाम आझाद गार्डनचा शिलान्यास करण्यात आला हाेता. तेव्हा पासुन येथील जलतरण तलावाचे नुतनीकरण तर साेडा, साधी रंग रंगाेटी सुध्दा केली जात नाही. नुकतेच काही दिवसा पुर्वी शाैचालयाचा स्लापचा काही भाग खाली पडला. त्यात एक बालक थाेडक्याने बचावला सुध्दा व त्याला कुठली ही जिवित हाणी झाली म्हणुन बरे झाले.

तीथे बघीतल्यास सर्वत्र अस्वच्छा दिसुन येते

गार्डनचे नुतनीकरण करत्यावेळीच जलतरण तलावाचे सुध्दा नुतनीकरण व्हायला हवे हाेते. परंतु या पुर्वीची नगर पालिका व आताची महानगरपालिकेला जलतरण तलावाचे कधीतरी नुतनीकरन व्हावे म्हणुन कदाचित विसर पडला असावा.

अनेक वर्षा पासुन जलतरण तलावाची स्थिती बराेबर नाही. त्या तलावाचे फिल्टर मशिन तर कित्येक वर्षा पासुन बंद पडलेली आहे. या जलतरण तलावाच्या देखरेखी करिता मनपा येथिल एकच स्थाई कर्मचारी ठेवण्यात आला. त्यात या जलतरण तवालात येणा-यां कडुन मासिक शुल्क घेण्यात येत असते. त्याच येणा-या शुल्कातुन स्थाई कर्मचा-यांनी स्वताहुन साह्यक म्हणुन दाेन कर्मचारी ठेवण्यात आले. हे तिन ही कर्मचारी आठवड्यातुन एक दिवस कसे तरी करून जलतरण तलाच्या पाण्याला स्वच्छ करत असतात.

बंद अवस्थेत असलेली फिल्टर मशिन

म्हणुन मौलाना अबुल कलाम आझाद गार्डन येथे महानगरपालिकेचे जलतरण तलाव निरंतर कसेबसे तरि सुरु आहे. गेल्या अनेक वर्षापासुन जलतरण केंद्राचे मेन्टेनेन्स चे काम कधी ही काढल्या गेले नाही.

जिल्हा क्रीडा संकुल येथील जलतरण केंद्र हे आझाद गार्डन येथील जलतरण केंद्रापेक्षा नवीन असून, तेथील जलतरण केंद्राचे नुकतेच नुतनीकरण करण्यात आले. परंतु आझाद गार्डन येथील जलतरण केंद्र हे ४४ वर्षे जुने असून सुद्धा त्याचे नुतनीकरणासाठी अद्याप ही मनपाकडुन पुढाकार घेण्यात आलेला नाही.

अजुन रंगरगाेटी सुध्दा नाही

या जलतरण केंद्रावर संपूर्ण वर्षभर शहरातील प्रशासकीय अधिकारी, वकील, पत्रकार, डॉक्टर तसेच शहरातील नागरीक निरंतर पोहण्यास येत असतात. परंतु प्रत्येक आठवळ्यात तीन दिवसा नंतर जलतरणाच्या पाण्याची स्वच्छता करावी लागते, त्याचे मुख्य कारण म्हणजे जलतरण केंद्रातील पाणी फिल्टरची मशीन पुर्णता बंद आहे हेच हाेय.

या जलतरण केंद्रात गेल्या २५ / ३० वर्षा पासुन महापालिकेचे अभियंता, अधिकारी, कर्मचारी सुध्दा पाेहण्यास येत असतात. तरि सुध्दा याकडे का बर दुर्लक्ष करण्यात येते हे अजुन पर्यत तरि न समजण्या पलीकडचे आहे.

मात्र या जलतरण तलावाची बिकट अवस्था राेज बघुन सुध्दा जलतरण केंद्राचे नुतनीकरण व्हावे याकरिता आता पाेहणा-या नागरिकांनीच पुढाकार घेतला आहे. तीथे राेज पाेहण्यास येणा-यांनी जवळपास ६० लाेकांनच्या साक्षरीने महानगर पालिकेला निवेदन देवुन महानगरपालिकेच्या वतीने २५ ते ३० लाखाचा निधी उपलब्ध करून. जलतरण केंद्राचे वॉटर फिल्टर मशीन पुर्णता सुरू व्हावी व संपूर्णपणे जलतरण तलावाचे नव्याने नुतनीकरण करून शुशाेभीत करावे. अशी मागणी पाेहायला येणा-या नागरकांकडुन केल्या गेली आहे.

एकीकडे “स्वच्छ चंद्रपुर सुंदर चंद्रपुर” ची माेठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करणारी चंद्रपुर मनपा जाहीरातीवर लाखाे कराेडाे रूपये खर्च करते. परंतु महापालिकेचे असलेल्या जलतरण तलावाची अस्वच्छता मनपा प्रशासनाला का? दिसत नाही. असा सवाल आता पाेहण्यास येणा-या सर्व नागरिकांकडुन केली जात आहे. हे विशेष…..

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page