
चंद्रपुर नगरी ही नैसर्गिक मनमाेहक वातावरणासाठी, येथे वाहणा-या नद्या करिता तसेच ऐतिहासिक किल्ले आणि काेळसा खदानी व जगात प्रसिध्द असलेल्या ताडाेबा जगंला करिता प्रसिध्द आहे.
तसेच या नगरीला एकीकडे स्वादीष्ट व्यजंनाच्या चवेसाठी खास करून ओडखल जात. राेज या जिल्ह्यात ईतर जिल्ह्यातुन तसेच पर प्रांतातुन व्यवसाय व राेजगारा करिता येणा-या प्रवासी नारीकांना. चंद्रपुर येथिल स्वादिष्ट सावजी भाेजनाची व ईतर व्यंजनाची चव या नगरीत पुन्हा पुन्हा येण्यास भाग पाडत असते.

म्हणुन चंद्रपुर शहरात व शहराच्या अवती भवती तसेच शहरापासुन २५ किलाे. पर्यंतच्या नैसर्गिक जंगल भागात लाेहारा, मामला बाेर्डा, चेक निंबाळा अजयपुर चिचपल्ली येथे भाेजनाचा आस्वाद घेण्याकरिता हॉटेल, धाबे, माेठ्या प्रमाणात दिसुन येतात.
तसेच शहराच्या ईतर ठीकानी सुध्दा हे हॉटेल उपलब्ध आहेत. त्या अनुषंगाने चंद्रपुर नगरीत नवे नवे हॉटेल्स जाेमात सुरू झाले आहेत. या चंद्रपुर नगरीत आलेल्या प्रवाश्यांना तसेच शहरातिल भाेजनाचा आनंद घेण्यास येणा-या ग्राहकांनाच्या जिभेला उत्तम चव मिळावी म्हणुन चंद्रपुर येथिल हॉटेल व्यसाईक नेहमिच आप आपल्या परीने प्रयत्न करत असतात.

मात्र याच कारणाने दिवसेन दिवस चंद्रपुर शहारात हॉटेलची संख्या झपाट्याने वाढत आहे का.? याचे मुख्य कारण केवळ मात्र हेच नसुन घरच्या महिलांनी सायंकाळचे घरचे किचन बंद केले हेच हाेय. त्यात पुरूष वर्गांच्या राेज हाेणा-या पार्ट्या सुध्दा याला कारणीभुत आहेत.
आता तर चक्क एका हॉटेल व्यवसाईकांनी “घरी स्वयंपाक न करणा-या महिलाच आमच्या दैवत” असे हॉटेल मध्ये फलकच लावुन घेतले.

आठवळ्यातले चार दिवस बाहेर जावुन जेवनाचा आनंद घेणे ही विद्यमान परिस्थिती सध्या तरि चंद्रपुरात जास्त प्रमाणात दिसुन येते.
घरी सायंकाळचा स्वयंपाक न करने आता महिलांनची सवय झाली असुन घरच्या महिलांनी आता चक्क सायंकाळचा स्वयंपाक करनेच कमी केल्याची तक्रार अनेक पुरूष वर्ग करतांना दिसतात.
राेज कुठे तरि बाहेर जावुन स्वादीष्ट व्यंजनाचा स्वाद घ्यायचा हीच वास्तविकता आता अनेक कुटुंबानी आत्मसात केलेली दिसुन येते.

आता तर शहरात जागाे जागी वेज/नॉनवेज snacks, चॉयनिज, कबाब, बिर्यानी, चुलीवरचा स्वयंपाक, भाकरी, लांब राेटी, मिळण्याचे हॉटेल, हाथ ठेले जागाेजागी दिसुन येतात. या सर्व खाद्य पदार्थाची चव आता प्रत्येकांनी एक दिवसा आड घेण्याचा जणु मानसच केला की काय? असेच आता वाटु लागले.
झाेम्याटाे कंपनी सारख्या आनलाई सर्व्हिसमुळे सुध्दा घरी स्वयंपाक करण्याची संस्कृतीच पुर्ण पणे बंद झाल्याचे आता स्पष्ट हाेते.

पिज्जा, बर्गर, वडा पॉव, दाबेली, माेमाेज, मंचुरियन, फ्रेच फ्राय, सेंडविच,काठी राेल, हे जर आपल्या हवे असले तर ते घरूनच मागवता येते.
आनलाईन सर्व्हिसमुळे खाण्याची कधी, केव्हा ही ईच्छा झाली की लगेच घरूनच आनलाईन मागवने आता महिलावर्गांना अगदी साेपे झाले आहे.
कुठे तरी या चुकीच्या सवई आपनच आपल्याला लावुन घेतल्या आहेत. संयुक्त कुटुंब पध्दती पुर्ण पणे नाहीश्या झालेल्या आहेत. पुर्वी एकत्र कुटुंब बसुन जेवणाची पध्दत हाेती. मात्र आता संयुक्त कुटुंब पध्दतच संपुष्टात आलेली असतांना सर्व कुटुंबा साेबत बसुन जेवनाची पध्दतच नाहीसी झालेली बघण्यास मिळते.


प्रत्येक महिण्यात हाेणारे नामकरण, वाढदिवस, सगाई, हळद, विवाह, स्वागत समाराेह, लग्नाचा वाढदिवस, सेवा निवृत, झाले असल्यास भाेजनाचे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात येत असतात. काही कारण नसतांना नियाेजन करून आयाेजन केलेले ईव्हेंट, त्यात वर्षातुन येणा-या ईतर कार्यक्रमाचा सुध्दा समावेश आहे.
असेच निरंतर सुरू राहीले तर एक दिवस घरचे जेवनच मिळनेच कठीन हाेईल हे मात्र नक्की…..




