Friday, April 17, 2026
Google search engine

जयंत टॉकीजच्या जागेवर हाेणार मॉल मस्त, त्या मॉलच्या बांधकामामुळे परिसरातले नागरीक झाले त्रस्त.

✍️…. निलेश ठाकरे 9371321070 चंद्रपुर – जयंत टॉकीज ही चंद्रपुरातील जुण्या थेटर पैकी एक या थेटर मध्ये अनेक चित्रपट चंद्रपुरकरांनी बघीतले आहेत. शहराच्या अगदी मध्यभागी असलेल्या या चित्रपट गृहात अनेक चित्रपटांनी आपले वर्चस्व गाजवलेले . या थेटर मध्ये चित्रपटाच्या प्रमाेशन करिता अनेक हिंदी तसेच मराठी चित्रपटातिल प्रसिध्द नटांनी स्वता जयंत थेटरला भेट दिली आहे.

आपल्या प्रसिध्द नटाला बघण्यास चंद्रपुरकर नेहमिच उत्सुक असायचे तसेच त्यांना बघण्यास चिक्कार गर्दी सुध्दा करायचे. या चित्रपट गृहात अनेक चित्रपटानी विक्रम स्थापित केले आहे. काही चित्रपट रिलीज हाेताच सहा खेळात लागत असत. म्हनुन चित्रपट बघण्यास सिने प्रेमी चक्क पहाटे ३ वाजताच्या सुमारास चित्रपट बघण्यास चित्रपट प्रेमी चित्रपट बघण्यास आतुर असायचा. चित्रपट चाहते एक दिवस पुर्वीच अँडव्हांस बुकिंग करण्याकरिता जयंत टॉकीज येथे माेठ्या गर्दीने उपस्थीत राहुन टीकीट काढण्यास अमाप गर्दीतुन मार्ग काळत टिकीट खिडकीवर तारेवरची कसरत करतांना अनेकांनी असे प्रसंग या थेटरात बघितले आहे. या चित्रपट गृहात माेठ्या कलावंतांचे आर्केस्ट्रा, नाटक, याचे सुध्दा आयाेजन हाेत हाेते.

मात्र या सर्व बाबी जुण्या भुतकाळाच्या आठवनीतच जमा झाल्या आहेत. आता मात्र जयंत टॉकीजच्या जागेवरती माेठ्या भव्य स्वरूपाची ( मॉल ) दहा मजली ईमारत उभी राहणार आहे. त्याचे काम चंद्रपुर येथिल एका नावाजलेल्या माेठ्या कंत्राटदाराला भेटले असुन त्या कामाची सुरवात सुध्दा जाेमात सुरू झाली आहे. जमिनीच्या आत दाेन फ्लाेर आणि जमिवरती आठ फ्लाेर अशी भव्य स्वरूपाची माेठी ईमारत चंद्रपुर शहराच्या अगदी मध्य भागी म्हनजे आता जयंत टॉकीजच्या जागेवर लवकरच उभी हाेणार आहे.

मात्र या ईमारतीचे काम सुरू असतांना परिसरातले नागरिक व जयंत टॉकीज च्या बाजुच्या राेडवरून येजा करणार्या वाहन धारकांना विनाकारण नाहक त्रास हाेत आहे. या मुळे परिसरातले नागरिक व वाहन धारक त्रस्त झाले आहेत. जयंत टॉकीजच्या बाजुने असणारा सिमेंट राेड आताच काही महिण्या पुर्वी चंद्रपुर महापालिकेकडुन बनवण्यात आला हाेता. परंतु त्या राेडचे काम अत्यंत निष्क्रूष्ठ दर्ज्याचे असल्याने त्या कामाची तक्रार प्राप्त हाेताच. परत एकदा या राेडला मनपाच्या वतीने पुन्हा एकदा बनवण्यात आले. त्या मुळे ह्या राेडचे बांधकाम करतांना हा राेड पुर्ण पणे बंद असायचा. महनुन नागरिक व वाहनधारकांनसाठी हा रस्ता डाेके दुखी ठरला हाेता.

मात्र पुन्हा या ईमारतीचे काम करण्या करिता मनपाच्या वतीने बंद करण्याची परवानगी कशी काय देण्यात आली हा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ह्या राेडला कंत्राटदारा कडुन ब्यारिकेट लावल्यामुळे दाेन चाकी गाडी ही बराेबर जात नसल्याचे दिसुन येईल. मात्र चार चाकी तसेच जड वाहणांना प्रतीबंध आहे. असे बैनर फलक लावुन कंत्राटदाराचे कर्मचारी मुजाेरी करतांना दिसतात. केवळ दुचाकी वाहन धारकांसाठी हा राेड सुरू ठेवण्यात आला आहे. त्या मुळे वर्ष भरा पासुन हा राेड अधुन मधुन बंद करण्यात येत असल्याने तेथील नागरिकांनी महानगरपालिकेला याची तक्रार केल्यास महापालिका मुद्दामुन याकडे दुर्लक्ष करतांना दिसते.

याचे मुख्य कारण म्हनजे या ईमारतीच्या प्रत्येक फ्लाेरवर चंद्रपुरातील राजकिय नेते तसेस माेठया व्यवसाईकांचे ते फ्लाेर असल्याने महापालिकेच्या अधिकारी दुर्लक्ष करत आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. हा पुर्ण प्लाट कॉर्रनर असुन दाेन्ही राेडवर राेड मारजिंग न साेडताच या ईमारतीचे काम जाेमात सुरू आहे. ही ईमारत नियमबाह्य हाेत असल्याची परिसरातल्या नागरिकांचे म्हनने आहे. या ईमारतीचे काम सुरू करतांना न्यु इंग्लिश शाळेला लागुन असणार्या रसत्याच्या समाेर टिनाचे शेड उभारून बांधकामा करिता टिनाचे शेड उभारले गेले हाेते. त्या टिनाच्या शेडला लागुन बांधकाम करत असतांना गड्डे करण्यात आले. मात्र काही दिवसातच टिनाच्या शेडला लागुन असणार्या जागेवरून मातीची घसरन झाली. याच टिनाच्या शेडला लागुन आठवड्याचा दर रविवारी संडे मार्केटचे दुकाने लागत असल्याने माेठी जिवित हानी हाेवु शकते. त्यामुळे हा संपुर्ण राेडच बेरीकेट लावुन बंद पाडण्यात आला आहे. म्हनुन “जयंत टॉकीजच्या जागेवर हाेणार मॉल मस्त, त्या मॉलच्या बांधकामामुळे परिसरातले नागरीक झाले त्रस्त” असेच आता म्हनावे लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page