Friday, April 17, 2026
Google search engine

चंद्रपुरात नियमबाह्य बांधकाम जाेमात सुरू असुन, पुरातन विभाग व मनपा प्रशासनाची कारवाही ही कागदाच पुरतीच.

✍️…. Nilesh Thakre मुख्य संपादक 💥न्युज ब्लास्ट💥

चंद्रपुर – चंद्रपुर हा ऐतिहासिक शहर आहे. हा संपुर्ण शहर ऐतिहासिक गाेैंडकिल्याचा आत बसलेला असुन या ऐतिहासिक परकाेटाचे संरक्षण करण्याची नितांत गरज आहे. खर तर या ऐतिहासिक वास्तु शिल्पाला शहरवासियांनीच जपायला हव हाेत. परंतु या ऐतिहासिक परकाेटाचे विद्रुपिकरणच शहरवासियांनी केले असे म्हनायला हरकत नाही. एकीकडे पुरातण विभागाचे ऐतिहासिक परकाेटा पासुन शंभर ते दाेनशे मिटर पर्यंत कुठलेच बांधकाम करण्याची परवानगी नसुन सुध्दा नियमबाह्य अतिक्रमाण करणार्यांनी परकाेटाला लागुनच स्वताच्या माेठ माेठ्या ईमारती उभ्या केल्या. आधी असलेली नगर पालिका आणि आता असलेली महानगरपालिका या बाबीकडे सतत दुर्लक्ष करित आली आहे. चंद्रपुर महानगरपालिकेच्या नगर रचनाकार विभाच्या भाेंगळ कारभारा मुळेच पुरातन विभाचा परिपत्रकाचे उलंघन हाेत आहे. नगर रचनाकार विभागाने शंभर ते दाेनशे मिटरचा आत बांधकाम करणार्यांना बांधकामाची परवानगी देता येत नसुन ही बांधकामाची परवानगी दिली आहे. मात्र सध्या परकाेटा जवळ अनेक बांधकाम करित असलेल्या बांधकाम धारकांना पुरातन विभागाच्या कर्मचार्याकडुनच अवैधरित्या बांधकाम धारकांना नाेटीस बजाऊन एफआर करण्याचा धमक्या दिल्या जात आहे. पंरतु महानगर पालिकेतल्या नगर रचनाकार विभागात हाेत असलेला गैरप्रकार, भ्रष्ट्राचारावर अंकुश लावण्यास शासन प्रशासन कुमवत दिसुन येताे.

जरा का वेळेतच नगर पालिका व मनपाच्या वतीने परकाेटा लगत हाेत असलेल्या बांधकामाला दुजाेराच दिला नसता तर चंद्रपुर शहरातली ही ऐतिहासिक वास्तु शिल्पाचे ( गाैंडकालीन किल्ला ) विद्रुपिकरण राेखण्यास चंद्रपुर मनपा तसेच पुरातण विभाग सार्थक ठरला असता. आता तर पुरातण विभाचे कर्मचारी परकाेटा जवळ हाेणार्या बांधकाम धारकांना नामधारक नाेटीस बजावतांना दिसुन येतात. शहरातल्या या ऐतिहासिक परकाेटाला सुरक्षित ठेवण्यासाठी चंद्रपुरातिल इकाेप्राे संस्थेनी संरक्षण भित बांधण्याची मागणी केली हाेती. त्या करिता केंद्र सरकारच्या वतीने भरपुर निधी उपलब्ध करून दिला. त्या कारणाने परकाेटाला बाजुने संरक्षण भिंत सुध्दा बांधण्यात आली हाेती. परंतु ती भिंतच आता सुरक्षित नाही. त्याचे कारण म्हनजे चंद्रपुरातिल भुरटे चाेरच संरक्षण भिंतच चाेरून नेत आहे. पाेलिस प्रशासन व मनपा या बाबीकडे जानिव पुर्वक दुर्लक्ष करते काय ? असे चंद्रपुरकरांना वाटु लागले आहे. चंद्रपुर शहरात राेज माेठ्या प्रमाणात नियमबाह्य बांधकाम जाेमात सुरू असुन पुरातन विभाग व मनपा प्रशासनाची कारवाही ही निव्वळ मात्र कागदाच पुरतीच आहे अशी ही दबक्या आवाजात चर्चा हाेतांना दिसते.

या मुळे मनपा आयुक्त व पुरातन विभाग अधिकारी यांचा कार्य प्रणालीवर चंद्रपुरकरांकडुन प्रश्न चिन्ह निर्माण हाेत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page