Friday, April 17, 2026
Google search engine

वरोरा नाका चौकातील अपघातप्रवण स्थळ

चंद्रपुर शहरातील हिन्दुह्दयसम्राट माननिय बाळासाहेब ठाकरे उड्डाण पुल (वरोरा नाका चौक) परीसरातील मुल रोड आणी चंद्रपुर शहरात जाणारी वाहतुक वेगळी करण्याकरीता रस्त्याच्या मधोमध डिवायडर निर्माण केले आहे.

ति व्यवस्था योग्य जरी असली तरी त्यात सुरक्षेच्या इतर व्यवस्थेचा अभाव असल्यामुळेच शेवटच्या क्षणी अचानकपणे लक्षात येत असलेल्या त्या डिवायडरला वाहने धडकुन वारंवार अपघात घडत असतात.

ज्यामुळे वाहनांसाठी तसेच जिवीतासाठी ते अत्यंत धोकादायक स्थळ ठरले आहे.

हे सततचे अपघात प्रवण स्थळ असुन त्यावर तातडीने खालील उपाययोजना होणे गरजेचे आहे.

1) त्या डिवायडर पुर्वी जवळपास 30 मीटर अंतरावर योग्य मोजमापात “गतीरोधक” निर्माण करणे गरजेचे आहे. जेणेकरुन त्या ठिकाणापुर्वीच वाहनाची गती कमी करता येईल. त्यामुळे वाहनघारकांना योग्य दिशेने वाहन वळविण्याचा विचार करण्याबाबतचा योग्य निर्णय घेण्यास जरा जास्त सेकंदाचा वेळ मिळेल. त्यातुन अपघाताचे मुख्य कारण टाळता येईल

2) डिवायडर असल्याची माहिती वाहनधारकांना सहज समजेल असे बोर्ड वरच्या बाजुस अंधातरी तसेच इतर योग्य पध्दतीने लावणे गरजेचे आहे.

3) रोडवर मध्यभागी अनपेक्षीतपणे येणारे डिवायडर समोर आहे हे वाहनधारकांना सहजपणे समजण्याकरीता तेथे रिफ्लेक्टर बसविण्या सोबतच तशा प्रकारचे प्रकाशमय ईलेक्ट्रीक लाईट लावणेही अत्यंत गरजेचे आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या उपाययोजनांवर विचार करुन त्यावर तातडीने अंमलबजावणी करावी अशी आमची मागणी नितिन उदार,
संस्थापक अध्यक्ष, जाणता राजा पक्ष यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page