दिनांक ०८.०६.२०२४ ला सकाळी १०:३० ते ११:०० वाजता चे दरम्यान तक्रारकर्त्याला पोलीस स्टेशन कोरपना येथे बोलावुन आई बहीणीची शिवीगाळ करून काही कारण नसतांना पांढर्या पट्याने पोलीस स्टेशन कोरपना येथील ठाणेदार एकाडे यांनी तसेच त्यांचे सहकारी मेजर मंचक देवकते यांनी ठाण्यात बाेलवुन तक्रारकर्त्याला जब्बरन मारहाण केल्या संदर्भात बाबीची सविस्तर सखाेल चाैकशी करून ठाणेदार तसेच मेजर यांना निलंबित करण्याची जिल्हा पाेलिस अधिक्षक यांना तक्रार निवेदन देवुन तक्रार करण्यात येणार आहे.

सविस्तर बातमी वृत्त असे आहे की,
दिनांक ०७.०६.२०२४ ला संध्याकाळी सुमारे ७ वाजता कोरपना पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री.एकाडे तसेच एक ट्राफीक पोलीस शिपाई व एक महिला पोलीस घेवुन तांडा नबर १ वर गेले.
तेथे रमेश सिंगटराव मुनावत रा. तांडा नंबर १ यांचे दारूचे दुकान आहे. त्या अनुषंगाने घर तपासण्यासाठी ठाणेदार व सहकारी त्यांचा घरी गेले. त्यावेळेस तक्रारकर्त्याची लहान बहीनच घरात होती. असे असतांना तक्रारकर्यांनी एकाडे साहेबाला घरी कुणीच नसल्याची माहिती दिली.

परंतु तेव्हा तक्रारकर्त्याला सरकारी कामात अडथळा आनु नको म्हणुन पाेलिसांन मार्फत धमकवण्यात आले. त्यानंतर त्यांनी रमेश सिंगटराव मुनावत यांचे संपुर्ण घर तपासुन काढले. घर तपासले असतांना घरात काहीच दारूचा मुद्देमाल मिळाला नाही. मात्र तेथे उपस्थित असलेले तक्रारकरते त्यांना तुझे घर कुठे आहे म्हणून त्याला विचारणा केली गेली.

तक्रारकर्त्यांनी स्वताचे घर दाखविले त्याचा सुध्दा घराची झळती घेण्यात आली. तीथे ही तपास करतांना शाेधुन ही काहीच मिळाले नाही. ठाणेदार एकाडे तक्रारकर्त्याला तुझावर मागील गुन्हयाचा तपास बाकी आहे. असे म्हनुन दिनांक ०८.०६.२०२४ ला ठाण्यात ये नाहीतर बघ असा दम देत तक्रारकर्त्याला धमकी देण्यात आली.
दिनांक ०८.०६.२०२४ ला अंदाजे साडेदहा वाजता तक्रारकर्ता पोलीस स्टेशनला पाेहचला. परंतु स्टेशनच्या आत जाण्यापुर्वी काही तरी अनुचित प्रकार घडण्याचा संशय झाला असतांना त्यांनी आपल्या माेबाईलची रेकार्डींग सुरू ठेवली. ठाणेदार एकाडे यांनी आपल्या केंबिनमध्ये बोलावुन सोबत श्री. मंचक देवकते मेजर याला पट्टा घेवुन बाेलवत ५० पट्टे मारायला लावले त्या अगाेदर तक्रारकर्त्याला शिवीगाळ केली. देवकते मेजरच्या हातांनी सलग अमानुष पणे अर्धा तास पट्या पट्ट्यांनी सुज येत पर्यंत हाता पायावर तक्रारकर्त्याला मारहाण करण्याचा प्रकारचा आडियाे माेबाईलवर रेकार्ड झाला.
मारहाण करतांना ठाणेदार श्री.एकाडेनी मी तुझ्या बहिनीला झवले का ? तुझा मायला झवले का ? अशी शिवीगाळ केली व त्यानंतर हाता पायाला सूज येत पर्यंत सतत मारहाण करण्यात आली. याबाबतची ऑडिओ क्लीप तक्रारकर्त्याला कडे पुरावा म्हनुन आहे. त्यावेळेस तु दवाखाण्यात गेला आणि मेडीकल केलास तर पुन्हा तुला मारहाण करून तुझ्यावर खाेटा गुन्हा दाखल करताे अशी धमकी देखुन तक्रारकर्त्याला दम देवुन गावाला परत पाठविले.

या पुर्वी ही ठाणेदारा बद्दल अनेक तक्रारी असल्याचे परिसरात बाेलले जात आहे. या पुर्वी असलेले पाेलिस अधिक्षकांची कृपा व डाेक्यावर हात असल्याने ठाणेदार एकाडे यांनी काेरपणा येथे ठाणा मिळवल्याची चर्चा हाेत आहे. या सर्व प्रकारची रितसर चौकशी करून ठाणेदार श्री.एकाडे व मेजर मंचक देवकते यांच्यावर याेग्य ती कारवाही करून यांना तात्काळ निलंबित करण्यात येण्याची लेखी तक्रार द्वारे मागणी करण्यात आली आहे.



