Friday, April 17, 2026
Google search engine

मानसुन येण्याचा काही दिवसापुर्वी गटर नाल्याची सफाई केल्याने मनपावर नागरिकांचा राेष.

मनपा तर्फे पावसाळ्या पुर्वी शहरातल्या माेठ्या गटर नाल्याची सफाई करण्यात येत आहे. गटर नाल्यात प्रचंड प्रमाणे प्लास्टिक पेयच्या बाटल्या आढळुन येत आहे. वर्षातुन एकचदा मानसुन येण्याचा आधी ही सफाई करण्यात येत असते. त्यामुळे शहरातल्या गटर नाल्या पुर्ण पणे साफ हाेत नाही.

म्हनुन शहरात सलग एक दाेन तास जास्त पाणी आल्यास गटराचे पाणी रसत्यावर येवुन रस्ते जलमय हाेवुन वाहतुक विस्कळीत हाेते. आयुक्तानी किमान वर्षातुन तिनदा तरि माेठ्या गटर नाल्याची सफाई करण्याचा मानस घ्यावा.

नाही तर हेच म्हनावे लागेल. “लबाड लांडग साेंग करतय की ढाेंग करतय” पाऊस सरू हाेण्याचा काही दिवसा पुर्वीच नाल्या सफाईचे करण्याचे यांना शाहनपण सुचते तरि कसे? हे तर झाले माेठ्या गटर नाल्या परंतु चंद्रपुर शहरातल्या प्रत्येक प्रभागाच्या नाल्याची सहानिशा केल्यास त्या कचर्यानी तुळुंब भरलेल्या दिसुन येतिल.

असे असतांना जर का वरचा पाऊस सलग काही तास पडला तर शहरातला काही भागात पुर आल्यासारखी परिस्थिती आढळुन येते. यंदा हवामान खात्याचा माहिती नुसार १००% टक्क्याचा वर पाणी पडण्याची माहिती पुढे आली आहे.

असे असतांना चंद्रपुर मनपाची पुरपिडीत परिसरात अर्धवट तयारीच दिसुन येत आहे. यावेळेस पुरपिडीत भागात मनपा कर्मचारी, अधिकारी यांना चांगलिच तार्यावरची कसरत करावी लागणार आहे हे नक्की तुर्तास ऐवढेच…..

टिप – शासन प्ररासनाच्या काही तक्रारी असल्यास 9371321070 या क्रमांकावर संपर्क करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page