Friday, April 17, 2026
Google search engine

चंद्रपुर WCL चे अधिकारी हर्षल दातार, यांचे वेकाेलि अधिका-या मार्फत हाेणा-या चाेरीकडे जानिव पुर्वक दुर्लक्ष

चंद्रपुर WCL चे अधिकारी हर्षद दातार, यांचे वेकाेलि अधिका-या मार्फत हाेणा-या चाेरीकडे जानिव पुर्वक दुर्लक्ष !

अधिका-यांन मार्फत हाेणा-या काेळसा चाेरीची माहीती असुन सुध्दा GM हर्षल दातार यांनी जानिव पुर्वक लक्ष न दिल्याची कुजबुज थेट वेकाेलीच्या कर्मचा-यातच हाेतांना दिसुन येते.

रेल्वे साइडिंग लालपेठ येथे ऑन रेकार्ड काेळसा शिल्लक नसतांना ही जागेवर मात्र हजार टन काेळसा दिसुन येत असताे.

लालपेठ, दुर्गापुर, डि.आर.सी, नांदगांव या खदाणीतुन दराेज हजाराे टन काेळसा निरंतर काढला जाताे. ताे काेळसा रेल्वे साइडिंग वरून सि.टि.पी.एस येथे पुरवण्यात येत असताे.

मात्र जेवढा काेळसा रेल्वे सायडिंगवर येताे तेवढाच काेळसा बाहेर जाताे तरि सुध्दा रेल्वे सायडिंगवर माेठ्या प्रमाणात काेळसा शिलक्क राहताे कसा हा प्रश्न उदभवताे ?

त्या मुळे CSTPS ला जाणारा काेळसा परस्पर अधिका-या मार्फत विकला जाताे की काय असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

यात WCL अधिकारीच चाेर असल्याची धक्कादायक बाब आता समाेर येत आहे. रेल्वे साईडिंगवर ऑन रेकार्ड काेळसा नसतांना साईडिंगवर एवढ्या माेठ्या प्रमाणात काेळश्याचा साठा आहे.

या बाबतची सर्व माहिती वर्षातुन एकदा सर्वे करणा-या विजिलिएंस समितीला देखिल माहित असुन ती समिती सुध्दा याकडे दुर्लक्ष का बर करत आहे हे न समजण्या पलिकडे दिसुन येते.

यात विजिलिएंस समिती अधिकारी व वेकाेलि चे अधिका-यांची संगमत तर नाही ना असे वाटल्यास नवल हाेणार नाही.

वेकाेली अधिका-या मार्फत ही चाेरी अशीच निरंतर सुरु आहे असे जानवल्याचे परिसरातल्या तथा वेकीली कर्मचा-यात कुजबुज सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page