Sunday, April 19, 2026
Google search engine

काही वर्षांमध्ये अधिकाधिक घरांमध्ये आर्थिक स्थिती बिघडण्याची प्रमुख कारणे..


(मंदी जाणवण्याची कारणे)

✍….nilesh thakre

1. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे दुचाकी वाहन,स्मार्ट फोन असने व प्रत्येक वर्षी नवीन घेणे.
2. वाढदिवस, ॲनिवर्सरीमध्ये, घर वास्तु, आणि आता वाटेल तेव्हा अधुन मधुन घरी पुजा ठेवण्याच्या नावाने अनावश्यक खर्च व नुसता दिखावा करने.                                    
3. दैनदिन जीवनशैली बदलामुळे खर्चाचे प्रमाण भरमसाठ वाढले.
4. मुलांचं शिक्षण, शाळा, क्लास फी यामध्ये सतत वाढ. ( 1ली पासूनच डॉन्स, संगीत, स्पाेर्ट, शिक्षणाचे क्लास लावणे ही फॅशनच मुळात जीवघेणी आहे )
5. घरातील जेवणापेक्षा प्रत्येक हफ्त्यातुन दाेनदा बाहेरील हॉटेलात जावुन भाेजन करने न गेल्यास ऑनलाईन ऑडर करून खाद्य पदार्थावर खर्च करने. यात निव्वळ खोटी प्रतिष्ठा.
6. व्यक्तिगत खर्च, ब्यूटी पार्लर, सलून, ब्रँडेड कपडे, पार्टी, गेट टूगेदर इत्यादी.
7. लग्न तर आहेच, त्यात मेहंदी, हळद, संगीत, प्रतिष्ठेसाठी साखरपुड्यावरही भरमसाठ खर्च करने.  
8. प्रत्येक बाबी घेण्यास कर्ज घेवुन त्यावर कर्जांचे निरंतर व्याज फेडणे.
9. खाण्यापिण्यात अती बदलामुळे मेडिकल खर्चात दुप्पट नव्हे तर तिप्पट वाढ. यामुळे अनावश्यक खर्चात वाढ होऊन, पगार व व्यवसाकमी खर्च जास्त होत करने. परिणामी, नुसता डाेक्यावर तणाव तणाव तणाव?
10.लोक, नातेवाईक काय म्हणतील या भीतीपायी कर्तव्य पार पाडण्याचे साेंग करून भावनेपाई पैशाचा नुसता चुराडा करने.
11. पार्टी कल्चरमुळे अक्षरशः लाखो तरुण, कुटुंबे जिवंतपणी नरक भोगताहेत. (उदा. घड्याळ घेतलं-द्या पार्टी, गाडी घेतली-द्या पार्टी, सायकल घेतली-द्या पार्टी, कपडे, दागिने, काेनतीही वस्तू घेतली-द्या पार्टी, वाढदिवस किंवा  लग्नाचा वाढदिवस आहे द्या पार्टी थाेड्या पगार सुध्दा वाढ झाली-द्या पार्टी,)
12. आपण दुसऱ्यावर पैसे खर्च नाही केले किंवा वेळ दिला नाही तर मला खांदा द्यायची वेळ येईल तेव्हा कोण येईल मदतीला? या एका भीतीपायी सामान्य माणूस आयुष्यभर, पिढ्यानपिढ्या राेज  कुजतोय व अक्षरषा मरताेय आहे.
केवल मात्र नाही ते दाखवण्याठी राेज झुरताे आहे.

म्हणुन अनावश्यक खर्च कमी करा. गरज अन्न, वस्त्र, निवारा आहे आणि इच्छा स्वप्नं अनंत… आहेत त्यांचा कधी ही अंत नाही…
आधी लिमिटेड होतं तेच बरं होतं.
पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा…..

टी.व्ही.वर 1-2 channels होती व तीपण लिमिटेड वेळेसाठी. रात्री ठराविक वेळेनंतर बंद व्हायची व घरातील लोकं एकतर झोपायला जायची, नाहीतर छान गप्पा मारायची.

दोन चाकी वाहनांचे उत्पादन लिमिटेड होते, बुकिंग केल्यावर वर्षादीड वर्षाने वाहन मिळायचे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या लिमिटेड होती सेवानिवृत्त झाल्या नंतरच आधी घर व्हायचे. परंतु आता नाैकरीवर लागुन एक वर्ष हाेत नाही किंवा व्यवसाय सुरू हाेत नाही तर बँकेच्या लाेन सुविधेमुळे सर्वच वस्तुचा उपभाेग प्रत्येक मानुस घेत आहे.
आणि सुखद प्रवासाचा आनंद मिळायचा.

गोडाधोडाचे पदार्थ फक्त सणासुदीला असायचे, तेपण लिमिटेड. त्यामुळे स्थूलतेचे प्रमाण आधी फार कमी होते. शाळांमध्ये लिमिटेड अभ्यास असायचा. त्यामुळे मुलांना खेळायला वेळ मिळायचा व मुलांची मानसिक व शारीरिक जडण घडण नीट व्ह्यायची.

बहुतांश ठिकाणी वर्किंग अवर्स लिमिटेड होते, संध्याकाळी ५-६ च्या दरम्यान ऑफिसेस बंद व्हायची व माणसे वेळीच घरी पोहोचून कुटुंबासाठी वेळ द्यायची.
अशा अजून अनेक गोष्टी आहेत ज्या लिमिटेड होत्या. त्यामुळे आपले आयुष्य खूप सुखी होते.
पण आता सगळंच अनलिमिटेड झालंय…आणि त्यामुळे जीवनातील सुख मात्र खूपच लिमिटेड राहलंय.

तुमच्या लहानपणी आणि आता आमच्या लहानपणी काय काय बदल झालेले वाटतात?

काळ खूप बदलला बघा… तेव्हा पोरांच्या छातीच्या बरगड्या दिसायच्या आणि पोट अगदी पाठीला टेकलेले दिसायचे. आता चौथीपाचवीच्या पोरांचीपण सुटलेली पोटे दिसतात.

तेव्हा पोरं दिवसभर खेळून खेळून रात्री बिछान्यावर अंग टाकले की गाढ झोपत हाेते. आता पोर दिवसभर बसून ‘कॉम्प्युटर, माेबाईलवर गेम्स’ खेळून रात्री late night movies एन्जॉय करत जागत बसतात. तेव्हा आमच्या घरात फक्त आजी आजोबांना यांनाच डोळ्याला चष्मा असायचा. आता दुसरीची मुलं नाकावरील चष्मे सावरत शाळेत बसतात.

तेव्हा वडिलांचा आम्हाला फार धाक असायचा. आता पोरं नाराज होऊ नयेत म्हणून त्यांचे डॅड त्यांना ते म्हणतील तेव्हा हॉटेलात नेऊन ते म्हणतील ते खाऊ घालतात. तेव्हा आम्हाला कधीतरी सणावाराला केलेली पुरणपोळी गोड लागायची. आता मुलांना दररोज झोपेतून उठल्यावर आई मागे लागून खाऊ घालते ते अंजीर, पिस्ते, मनुका पण बेचव लागतात.
तेव्हा आमच्या वाढदिवसाला आई एखादा बेसनाचा लाडू हातावर ठेवायची. आता मुलांच्या वाढदिवसाला तोंडाला फासण्यासाठी एक आणि खाण्यासाठी एक असे दोन मोठे केक्स लागतात.

मुळात काय की, तेव्हा आम्हाला फार काही मिळत नसतानाही आपल्याला आनंदात जगता यायचं. पण आता बरंच काही मिळत असूनही आनंदी जीवन कसे जगावे यांवरील सेमिनर्स’ अटेंड करावे लागतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page