Saturday, April 18, 2026
Google search engine

घुग्घुस नगरपरिषदेला हक्काची जागा मिळावी. माजी उपसरपंच सुधाकर बादुरकर यांची मागणी

कल्याण सोदारी,

घुग्घुस (प्रतिनिधी): घुग्घुस येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) घुग्घुस आबादी विकासाकरिता जिल्हा परिषद चंद्रपूरला हस्तांतरित केलेल्या जागेवर घुग्घुस नगरपरिषदेचा हक्क असून, ती जागा ताब्यात घेण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी माजी उपसरपंच सुधाकर बादुरकर यांनी केली आहे.

नगररचनाकार विभागाने तयार केलेल्या नकाशानुसार, घुग्घुस गावात विविध विकास प्रकल्पांसाठी जागा राखीव ठेवण्यात आली होती. यामध्ये प्राथमिक शाळा, बालवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बस स्थानक, पोलीस स्टेशन, पशुवैद्यकीय केंद्र, वाणिज्य विभाग तसेच रस्ते आणि रेल्वे भुयारी मार्ग यांचा समावेश होता. त्या वेळी जिल्हा परिषदेला ही जागा हस्तांतरित करण्यात आली होती आणि त्यानंतर अनेक विभागांना त्यांच्या गरजेनुसार जागा देण्यात आल्या.

दरम्यान, घुग्घुस येथे एसीसी सिमेंट कंपनीच्या स्थापनेनंतर प्राथमिक शाळा व बालवाडीची जागा एमआयडीसीने कंपनीला लीजवर दिली. मात्र, गेल्या कित्येक वर्षांत या ठिकाणी कोणतेही औद्योगिक बांधकाम झालेले नाही. सध्या अडाणी सिमेंटच्या ताब्यात असलेल्या या जागेवर घुग्घुस नगरपरिषदेचा हक्क असून, ती जागा पुन्हा नगरपरिषदेला हस्तांतरित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

घुग्घुस आता ग्रामपंचायत न राहता नगरपरिषद बनली आहे, त्यामुळे नगरपरिषद हद्दीत नागरिकांसाठी आवश्यक सुविधांसाठी जागेची कमतरता भासत आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासक व मुख्य अधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यवाही करून संबंधित विभागांकडे ही जागा हस्तांतरित करण्याची मागणी करावी, असे आवाहन माजी उपसरपंच सुधाकर बादुरकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page