
अधिकारी लाच मागतोय, मग अशी करा तक्रार..!
कोणताही शासकीय कर्मचारी नागरिकांच्या कामासाठी निर्लज्जपणे लाचरुपी भिक मागतं असेल तर अशी तक्रार करा आणि असा लाचखोर चोर, दरोडेखोर, लुटारू सन्मानाने लाचलुचपत विभागाच्या स्वाधीन करा.
आपल्या कष्टाचा एक रुपयाही याला लाचखोर चोरांना देऊ नका.
एखाद्या अधिकारी अथवा शासकीय कार्यालयामध्ये कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत तक्रार कोठे करायची, याची अनेकांना माहिती नसते. त्यामुळे तक्रारदार मागेल तेवढे पैसे अधिकाऱ्यांना देतात; परंतु लाच देणे आणि घेणे हा सुद्धा गुन्हा आहे. अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. या विभागात तक्रार करण्यासाठी काही जुजबी माहिती प्रत्येकाला असणे आवश्यक आहे.

समजा एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये कोणी लाचेची मागणी केली, तर संबंधित व्यक्तीने तातडीने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा. तुम्हाला लाचलुचपत विभागाकडून प्रतिसाद आल्यानंतर प्रत्यक्षात लाचलुचपत कार्यालयात बोलावून घेतले जाते किंवा अधिकारी तुमच्यापर्यंत येतात.
तुमच्या तक्रारीचे स्वरूप, तुमचे कोणते काम आहे याची माहिती घेऊन लाचलुचपतचे अधिकारी तक्रारदाराकडे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस देतात. या डिव्हाइसमध्ये आपण जे बोलतो ते सर्व रेकॉर्ड होत असते. हे डिव्हाइस तक्रारदाराला दिल्यानंतर तक्रारदार जो अधिकारी पैसे मागील त्याच्याकडे जातो.

तेथे गेल्यानंतर लाचेच्या मागणीसंदर्भात पुन्हा चर्चा करतो. पैसे किती द्यायचे, यावर शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या तोंडून तो पुन्हा वदवून घेतो.
अशी नोंदविता येते तक्रार…
• कोणत्याही नागरिकास कोणत्याही लोकसेवकाने त्यांच्या कामासाठी पैशाची अथवा मौल्यवान भेटवस्तूंची मागणी केली असता नागरिक पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात संपर्क करू शकतात.
acbmaharashtra.gov.in तसेच
जेणेकरून त्यांच्याकडून लाचेची मागणी होत आहे याचा पुरावाच जमा केला जातो. रेकॉर्ड केलेला डिव्हाइस लाचलुचपतचे अधिकारी ऐकून घेतात. त्यानंतर पुढील सापळ्ळ्यासाठी कारवाईची प्रक्रिया सुरू होते.
अधिकाऱ्यांना पुन्हा भेटून अथवा फोन करून पैसे अमुक दिवशी घेऊन येतो असे सांगितले जाते. त्या दिवशी लाचलुचपतचे अधिकारी तक्रारदारासोबत ठरलेल्या ठिकाणी जातात. तक्रारदार पैसे घेऊन संबंधित अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर अधिकारी बाहेर दबा धरून बसलेले असतात. शासकीय अधिकाऱ्याने

याशिवाय २४ तास सुरू
असलेल्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर अथवा ०२५६२ २३८१३९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून अथवा कार्यालयात समक्ष येऊन तक्रार नोंदवता येते.
www.acbmaharashtra.net वर नागरिकांना आपल्या तक्रारी नोंदविता येतात.
पैसे स्वीकारताच तक्रारदार अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलेल्या सांकेतिक खुणा करतो. त्यानंतर अधिकारी क्षणाचाही विलंब न करता तेथे जाऊन अधिकाऱ्याला किंवा लाचखोराला रंगेहाथ पकडतात. त्यानंतर संबंधित पोलिस ठाण्यात लाच स्वीकारल्याचा गुन्हा दाखल केला जातो.
त्यामुळे संबंधित अधिकारी खूप पोहोचलेला आहे, त्याच्या खूप ओळखी आहेत. आपल्या तक्रारीमुळे काय होणार आहे? असा प्रश्न मनातही न आणता तक्रार देण्याची गरज आहे. कितीही मोठा अधिकारी असला तरी तो त्यातून सुटू शकत नाही.



