Saturday, April 18, 2026
Google search engine

पत्रकारिता   

                                                                              
                                                                                               प्रामाणिक पत्रकारिता सध्या मोठ्या कठीण परिस्थितीतून जात आहे. जे पत्रकार स्वता आपला संसार सांभाळून प्रामाणिक पत्रकारिता करीत आहेत. अश्या पत्रकारांना काम करत असलेल्या वृत्तपत्र, चँनल तर्फे काही सवलती मिळत नाहीत. मासिक मानधन मिळत नाही किंवा सरकारकडून फारशी पुरेशी मदत सुध्दा मिळत नाही. म्हणजे प्रामाणिक पणे काम करणारे पत्रकार असले, तर त्यांचा प्रभाव भ्रष्ट्राचाराने मलिन असलेले प्रशासकिय अधिकारी, राजकिय नेते यांच्यावर फारसा पडत नसुन हा ताे केवळ मात्र सामान्य जनतेवर निश्चितच पणे पडतांना दिसुन येताे.

पण मायबाप सरकार आणि मोठमोठी वृत्तपत्रे, माेठ्या चँनलचे ओनर, चिफ ऐडिटर आणि त्यांच्या विद्वान चाटुकारीता करणारे संपादक, तसेच पत्रकारांपुढे आमचा प्रामाणिक पणे काम करणारा पत्रकार हा कुठे तरि हताश निराश आयुष्य जगतांना दिसुन येताे. प्रामाणिक पत्रकार हा जनतेचे कितीही महत्त्वाचे प्रश्न शासन, प्रशासन दारी किती ही मांडत असेल किंवा विचारत असेल, हाेत असलेल्या  गैरप्रकार, भ्रष्ट्राचार ताे उघडकिस आनत असेल तरी त्याचा गवगवा कुठे ही कधी होतांना दिसुन येत नाही. त्याला थोडेफार बाेटावर माेजण्या ईतके अपवाद वगळता चाटुकारीता, वसुलीबाज, भ्रष्ट्राचार करणारा अधिकारी वर्ग तसेच राजकिय नेत्यांचा उदाेउदाे करणार्या पत्रकारांनाच शासन, प्रशासन राजकिय नेते, अश्यांना मान सन्मान देवुन त्यांचा गाैरव करतांना दिसुन येत असल्याचे स्पष्ट चित्र सध्या तरि दिसुन येत आहे.

    

                                      

अनेक शोधवार्ता, जनसामान्यांच्या समस्या तसेच मुलभुत गरजेवर लिखान करणार्या पत्रकारांना मात्र नेहमिच डावलण्यात येत असते. तसेच प्रामाणिकरित्या आपले काम बजावणार्या पत्रकारांनकडे मुद्दामुन दुर्लक्ष करण्यात येते, ज्यांनी अतिशय मेहनत घेऊन व्यवस्थे विरूध्द प्रश्न मांडले. पण अश्या पत्रकारांना विद्यमान सरकारने शासन दरबारी कधीच दाद दिली नाही. प्रामाणिक पत्रकार हे फार महत्त्वाची भूमिका बजावतात असतात. पत्रकारांना आपल्या भागातील ज्वलंत समस्या घेऊन, कशाचीही अपेक्षा न करता काम करावे लागते.

प्रशासनाच्या मनात कितीही असले तरी अशा या बहाद्दर पत्रकारांना आम्ही यथोचित मान आणि मानधन देऊ शकत नाही हे सांगण्यास कुनाला ही जराही लाज वाटत नाही. जी वस्तुस्थिती आहे ती आपल्यासमोर मांडणे, हे प्रामाणिक पत्रकारांचे कर्तव्य आहे.  

                                     
नियमबाह्य चुकीचे अवैधरित्या काम करणार्यांच्या  वाटेवर जाताना, प्रेमाने परिवाराला सांभाळून तसेच दादागिरी करणाऱ्या महाबिलंदरांकडून आपला स्वताचा जीव वाचवीत, प्रामाणिक पत्रकार आपला पत्रकारितेचा झेंडा बुलंद करीत आहेत. अंधार कितीही असला तरी एखादा दिवाच त्या अंधाराला भेदू शकतो. प्रामाणिक पत्रकारांनी असा दिवा लावून आणि आपल्या जीवालाही सांभाळून आपले कर्तव्य पार पाडावे. एवढेच आम्हाला सांगुन ईतर पत्रकारांना तुम्हीही असेच मिनार बना. तुर्तास ऐवढच सांगायचे आहे.   

‘एक टहनी टूटकर पतवार बनती है,

एक चिंगारी दहक कर अंगार बनती है,

रौंदी गई बेबस समझकर,

वहीं मिट्टी एक दिन मिनार बनती है’
                                               

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page