
कासव गतीने चालणारा कॉंग्रेसचा उमेंदवार भाजपच्या उमेंदवारा पेक्षा प्रचंड मत घेईल असा मतदारांचा पक्षा दावा.
चंद्रपुर मतदारांनी दिले संकेत.
संध्या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या 20 नाेव्हेंबर 2024 राेजी निवडणुका हाेत आहेत. चंद्रपुर विधानसभा क्षेत्र 71 मधुन अनेक उमेंदवार उभे असुन खरी लढत मात्र आता कांग्रेस पक्षाचे उमेंदवार प्रविण पडवेकर व भाजपचे उमेंदवार किशाेर जाेरगेवार यांच्यातच हाेण्याचे संकेत चंद्रपुरातिल मतदारांनी दिले आहे.


एकीकडे कॉंग्रेस व भाजप पक्षानी टिकिंट न दिल्याने दाेन्ही पक्षातिल उमेंदवार ब्रिजभुषण पाझारे आणि राजु झाेडे यांनी बंडखाेरी करत स्वतंत्र निवडणुक लढण्याचा निर्धार केला आणि मागील निवडणुकी सारखाच यंदा सुध्दा अपक्ष उमेंदवार निवडुण येईल असा विश्वास या दाेन्ही उमेंदवारांना आहे.


परंतु राष्ट्रीय पक्षांचे बंडखाेरी करणारे उमेंदवार ते माेजकेच मत घेतिल असे मतदारांचे म्हणने आहे. तरि सुध्दा खरी लढत ही प्रविण पडवेकर आणि किशाेर जाेरगेवार यांच्यातच दिसुन येत आहे असे मतदारांचे मत आहे. राजु झाेडे हे बल्लारपुर तर ब्रिजभुषन पाझारे हे नकाेडा, घुग्घुस येथिल असल्याने चंद्रपुरातुन त्यांना जास्त प्रमाणात मत मिळतील काय? ते किती मत घेतील? हे आत्ताच काही सांगता येणार नाही. कारण चंद्रपुर विधानसभा क्षेत्रात शहरात जास्त मत प्रवाह असल्यामुळे आणि एकीकडे किशाेर जाेरगेवार हे विद्यमान आमदार व प्रविण पडवेकर चंद्रपुर येथिल स्थानिक आहेत हे विसरून सुध्दा चालणार नाही.
या निवडणुकीत उमेंदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखे पर्यंत कुनाला पक्ष श्रेष्ठी उमेंदवारी देईल हे नक्की सांगता येत नव्हत. परंतु कॉंग्रेसचे उमेंदवार व भाजपचे उमेंदवार काेन असेल यात शंका कुशंका ह्या सुरवाती पासुनच दाेन्ही पक्षात याची कुजबुज सुरू हाेतीच.
जाेरगेवार हे भाजप कडुन निडणुक लढतिल हे जवळ पास निच्छित झाले हाेते. मात्र कॉंग्रेस पक्षाची उमेंदवारी घाेषित हाेताच, स्वताचा विजई झाल्याचा विश्वास बाळगत जाेरगेवारांनी ससा आणि कासवाच्या कथे प्रमाणे सस्या सारखी उंच झेप घेत प्रचार, प्रसारात मुसंडी मारत आपनच पुढे असल्याचे दाखवुन दिले. हि निवडणुक पुन्हा मिच जिंकेल म्हणुन “विश्वास जुना” “जाेरगेवार पुन्हा” असा स्वताची जाहीरात करताना स्लाेगन देवुन स्वतावर अती आत्मविश्वास असल्याचे दाखवले.
परंतु हा अती आत्मविश्वास त्यांना चांगलाच भाेवताे की काय? अशी ही चर्चा चंद्रपुर येथिल विधानसभा 71 क्षेत्रातल्या मतदारात हाेतांना दिसुन येत आहेत. मात्र या शर्यतित कासवगती ने चालणा-या प्रविण पडवेकरांनी “आवाज़ जनसामान्याचा” हे स्लाेगन देवुन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करून आपला प्रचार प्रसार हळुहळु मतदारांच्या मनात रूजवले. ते यात यशश्वी हाेवुन आमदारकीची माळ आपल्या गळ्यात नक्की टाकतील असल्याचा दावा कॉंग्रेस पक्षातिल पदधिकारी, कार्यक्रत्यांनी केला आहे.
सध्या तरि चंद्रपुरात जाेरगेवारांकडुन प्रत्येक प्रभागात स्नेह मिलन साेहळ्यांच्या माध्यमातुन भाेजनाचे कार्यक्रम राेज राबवले जात आहेत. संपुर्ण विधानसभा क्षेत्रात त्यांचा हॉयटेक प्रचार ही जाेमात सुर असल्याचे दिसुन येते. जाेरगेवारांकरिता माेठ्या नेत्यांचे सभेची आयाेजन ही माेठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.
मात्र दुसरीकडे प्रविण पडवेकर यांच्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे कार्यक्रते पदाधिकारी यांनी चांगलीच कंबर कसली असुन स्वयंमफुर्तीने सामाण्य कार्यक्रते प्रचार प्रसाराच्या कामाला लागले आहेत.
ससा आणि कासवात्या शर्तीत कासवाचाच विजय हाेण्याचे संकेत संध्या तरि चंद्रपुरातील मतदारांनी दिले आहे. यंदा पडवेकरांचाच विजय हाेणार असे चंद्रपुर येथिल मतदार वर्गात बाेलल्या जात आहे. जाेरगेवार ही दुस-यांदा आमदारकी मिळवण्यास बारशिंग बांधुन तयारच आहेत. पक्षातुन बंडखाेरी करणारे सुध्दा या शर्यतित मागे नाही?
निवडणुक पार पाडल्या नंतर एक्जिट पाेल, राजकारणातिल अभ्यासक आपल्या तर्क बुध्दीने आपले मत मांडतिलच पण खरी लढत ही दाेन राष्ट्रीय पक्षात हाेईल निवडणुकीचा निकाल 23 नाेव्हेंबरलाच पुढे येईल हे मात्र खरे…..



