
सुत्रांकडुन मिळालेल्या माहिती द्वारे नुकतेच कॉंग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेंदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात जवळ पास २७ उमेंदवारांनी मुलाखाती दिल्या. त्यात कॉंग्रेस पक्षाचे अनेक वर्षा पासुन असलेले कार्यकर्ते तथा पदाधिकारी यांचा ही समावेश आहे. मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पुर्वी इतर सामाजिक संघटनेतुन व पक्षातुन आलेल्या नेत्यांनी सुध्दा पक्ष प्रवेश करित यंदा आपलीच दावेदारी मजबुत आहे हे दाखवुन मुलाखती दिल्या.
आमदार अभिजित वंजारी यांनी या मुलाखतीची निरिक्षकाची भुमिका बजावली. हि मुलाखत घेतांना चंद्रपुर जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धाेटे, जिल्हा शहर कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष रामु तिवारी तसेच खासदार प्रतीभा धानाेरकर प्रामुख्याने उपस्थीत हाेत्या. त्या नंतर कॉंग्रेस पक्षाच्या चंद्रपुर विधान सभेकरिता उमेंदवारीसाठी मुंबई करिता पाठवण्यात आलेल्या पाच नावा पैकी एक ही पुर्ण पणे कॉंग्रेस पक्षाचा सभासद नाही असे विश्वसनिय सुत्रा कडुन माहिती समाेर आली आहे.
चार उमेंदवारांन पैकी तीन उमेंदवारांनी निवडणुकी पुर्वी पक्षात प्रवेश केले. व जाेमात बैनर पाेस्टरबाजी करित चंद्रपुर विधानसभेत स्वता उमेंदवार असल्याची जाहीरात करण्यास सुरवात केली. एक उमेंदवारांनी आपल्या जुन्या पक्षाला नुकताच राजीनामा दिल्याची माहीती पुढे येवुन अजुन पर्यंत तरी त्या उमेंदवाराचा कॉंग्रेस पक्षात पक्ष प्रवेश झाला नाही. उर्वरीत एक उमेंदवार कॉंग्रेसी पक्षातील एक गटाचा सक्रिय सद्यस असुन मधल्या काळात काही दिवसा करिता बिजेपी पक्षाची वारी करित पुन्हा कॉंग्रेस पक्षात हळु हळु सक्रिय हाेवुन उमेंदवारीच्या स्पर्धेत मि पण मागे नाही म्हणुन यंदा आमदार मिच हाेणार असा दावा करतांना दिसुन येताे.
सुत्राकडुन मिळालेली माहीती ही पुर्ण पणे खरी असेल हे नक्की काही सांगता येत नाही. परंतु जास्तीत जास्त नगर सेवक आमदार व्हायचे “मुंगेरीलाल के हसिन सपने” बघत आहेत. याचे मुख्य कारण गेल्या पाच वर्षात कॉंग्रेस पक्षाने आपल्या निष्ठावान कार्यकर्त्या पैकी एक ही नेतृत्व करणारा उमेंदवार तयार केला नाही असे निर्दशनास येते. चंद्रपुर ७१ विधानसभेच्या निवडणुकीत पक्षात वेळेवर येणा-या आयाराम उमेंदवारांनाच कॉंग्रेस पक्ष आमदार हाेण्याची संधी देईल असेच सध्याच्या विद्यमान परिस्थीतीथ जानवते.
मग अनेक वर्षा पासुन पक्षात काम करत असलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांचे काय? आंदाेलने, धरणे, माेर्चे, सभा या करिता दिवसरात्र परिश्रम घेत पक्षाकरिता आपल्या नावे गुन्हे दाखल करून घेणा-यांना नेहमी प्रमाणे पक्षाच्या वतीने यंदा ही लॉलिपॉपच दिल्या जाते की काय? असा संदेह निर्माण हाेवुन ही बाब कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या चर्चेत दिसुन येते. मग जर का? वेळेवर येणा-या आयारामांनाच बारशिंग बाधुन कॉंग्रेस पक्षात नवरदेव केल्या जात असेल तर मग पक्षासाठी वर्षाणुवर्ष प्रामाणिक पणे काम करणा-या निष्ठावान कार्यकर्त्यांनी आमदार व्हायचे स्वप्न बघायचे नाही का? अशी भावना एका कार्यकर्त्यानी न्युज ब्लास्टला बाेलतांना व्यक्त केली.
मग ऐन निवडणुकी पुर्वी आलेल्या आयाराम नेत्यांनाच आपला नेता म्हणुन आम्ही स्विकारायच किंवा नेत्यांच्या पाल्यांनाच त्यांच्या नातेवाईकांनाच आपला नेता म्हणुन डाेक्यावर बसवुन ताई, दादा, भाऊ, भय्या, म्हणुन मिरावयच हेच आम्हा कार्यकर्त्यांच्या नसीबी आहे समझायच अशी खंत आमदारकीचे स्वप्न बघणा-या तथा पक्षा अंतर्गत माेहभंग झालेल्या कार्यकर्त्यानी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ज्यांचा कॉंग्रेस पक्षाच्या आता पर्यंत कुठल्याच कार्यक्रमात सहभाग नाही त्यांनाच उमेंदवारी जर का पक्ष देत असेल तर कार्यकर्त्यांच मनाेबल खचणारच की, परंतु त्यांची चिंता पक्षांच्या नेत्यांना नसते. वेळेवर येवुन नेत्यांची मन धरणी करणा-या इतर पक्षातुन व संघटनेतुन आलेल्या व पैश्यानी बलाढ्य असल्याचा कागावा करत पक्षाच्या नेत्यांचे बैनर पाेस्टर लावुन नेत्यांना मिरवणा-यांच संधी मिळणार ही माहीती आता सुत्रांकडुन पुढे येत आहे.
असाे हे राजकारण आहे याला मतदारच अजुन पर्यंत समजु शकला नाही. तर प्रामाणिक पक्षात काम करणारा कार्यकर्ता काय समजु शकेल.आता चंद्रपुर येथिल मतदारांना जागृत हाेण्याची नितांत गरज आहे. साेहळे, महाेत्सव, खाेटे आश्वासन देणारे नेते अल्प कालावधीतच स्वताचा विकास करण्यात मस्तमाैला दिसुन येत असतील तर अश्या उमेंदवाराला घरी बसवुन आपल्या क्षेत्राचा विकास करणारा उमेदवार असेल, जाे आपल्या क्षेत्रातील तरूण युवक युवतींना राेजगार उपलब्ध करून देईल, आपल्या क्षेत्रातिल समस्याचे निवारण करेल, प्रदुर्षित शहराला प्रदुर्षन मुक्त करेल, जाे नेहमी जनतेच्या हिता करिता लढेल, आपल्या क्षेत्राला स्वच्छ ठेवण्यास पुढाकार घेईल अश्याच उमेंदवारांची पक्ष न बघता उमेंदवाराकडे बघुन मतदारांनी दखल घेवुन मतदान करायला हवे. तरच कुठे तरी राजकारणात बद्दल हाेईल तेव्हा कुठे प्रामाणिक, निष्ठावान कार्यकर्ता हा आमदार, खासदार हाेईल…



