
चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष आणि लॉयड मेटल कंपनीची मनमानी.
प्रदूषणामुळे पर्यावरणाच्या नैसर्गिक संतुलनात बदल घडत असते. जेव्हा आपल्या सभोवतालच्या वातावरणात काहीतरी जोडले जाते ज्यामुळे त्याची गुणवत्ता खराब होते, त्या कारणाने प्रदूषणात सतत वाढ हाेत आहे.
चंद्रपुर जिल्हा हा औद्यगिक जिल्हा म्हणुन ओडखला जाताे. त्यात संपुर्ण देशातुन प्रदूषनात अग्रस्थानी असलेल्या क्रमवारीत सुध्दा चंद्रपुर जिल्ह्याचा समावेश आहे.
चंद्रपुर जिल्ह्यातिल काही तालुक्यात प्रदूषण ही एक मोठी समस्या बनली आहे, ज्यामुळे येथिल जनतेचे आरोग्य, जीवनशैली आणि नैसर्गिक संसाधनांवर माेठ्या प्रमाणात परिणाम होत असुन आराेग्याचे देखिल नुकसान होत आहे.

सर्वत्र प्रदूषण
जिल्ह्यातच घुग्घुस, चंद्रपुर, दुर्गापुर,राजुरा, गढचांदुर,बल्लारपुर शहरात आपण जिकडे पाहतो तिकडे फक्त प्रदूषण दिसते. त्यामुळे धूर, वायू आणि रासायनिक पदार्थ येथिल हवेत मिसळतांना दिसुन येतात.
या धुराने नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. हाच धुर वायु मार्फत घरगुती, औद्योगिक आणि कृषी कचरा, तेल, डिटर्जंट, खनिजे आणि सेंद्रिय पदार्थ पाण्यात मिसळताे.
ज्यामुळे शहरातिल पाण्याची शुद्धता दिवसेन दिवस निरंतर खराब होत आहे.
प्रदूषनामुळे अनावश्यक आणि विघटनशील पदार्थ, प्लास्टिक, कागद, कचरा आणि किरणोत्सर्गी पदार्थ पृथ्वीवर पसरतात.
ज्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे.
प्रदूषणाचे प्रकार
वायू प्रदूषण, जलप्रदूषण, औष्णिक प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, प्रकाश प्रदूषण, जमीन प्रदूषण, आण्विक प्रदूषण, जैविक प्रदूषण इत्यादी प्रदूषणाचे अनेक प्रकार आहेत.
या प्रकारचे परिणाम आपल्या पर्यावरण, प्राणी, वनस्पती, हवामान, जलचर, स्थलीय, वनस्पती, खनिजे, ऊर्जा आणि इतर संसाधनांवर परिणाम करित आहेत.
प्रदूषणाची अनेक कारणे आहेत त्यापैकी काही प्रमुख आहेत:

लोकसंख्येची अत्याधिक वाढ लोकसंख्येच्या अत्याधिक वाढीमुळे लोकांच्या गरजा आणि इच्छा देखील वाढतात. यासाठी ते जास्त माल घेतात आणि जास्त प्रदूषण करतात.
औद्योगिकीकरण आणि विकासाच्या नावाखाली लोक अनेक प्रकारची उत्पादने बनवतात आणि त्यांचा व्यापार करतात. या प्रक्रियेत ते धूर, वायू, रासायनिक द्रव, घनकचरा इत्यादी अनेक प्रकारचे प्रदूषक वातावरणात सोडतात.
लॉयड मेटल कंपनी द्वारे हाेत असलेल्या प्रदूषणा कडे चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जामिव पुर्वक दुर्लक्ष हाेत आहे म्हणुन लॉयड मेटल कंपनीची मनमानी दिसून येत आहे.
कंपनी तर्फे मोठ्या प्रमाणात प्रदूषण पसरवले जाते. शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान लॉयड मेटल कंपनीतून मोठ्या प्रमाणात प्रदूषण पसरवले जात होते. लोकांनी हे दृश्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आणि अनेकांनी ते कॅमेऱ्यात कैद केले. या प्रदूषणाचा फटका येथील नागरिकांना माेठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनी विरूध्द ठाेस पाऊले उचत याेग्य ती कारवाही करायला हवी. व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी तालुक्यातिल नागरिकांनी केली आहे.



