Saturday, April 18, 2026
Google search engine

चंद्रपुर महाऔष्णिक विज निर्मीती केंद्रात राजकिय कामगार नेते, झाले कंत्राटदार.

ऐशियातील तिस-या क्रमांकाचे महाऔष्णिक विज निर्मीती केंद्र हे चंद्रपुरात असुन येथे कामगार सुध्दा माेठ्या प्रमाणात आहेत. त्यात कंत्राटी कामगारांच्या ब-याच समस्या असल्याने स्वयम घाेषित कामगार नेतेगीरी येथे माेठ्या प्रमाणात बहरूण आलेली दिसुन येते.

म्हणुनच कंत्राटी कामगारांचे नेतृत्व करणारे राजकिय नेत्यांची संख्या चंद्रपुर महाऔष्णिक विज निर्मीती केंद्रात दिवसेन दिवस वाढतच जात आहे.

महाऔष्णिक केंद्रातच नव्हे तर, डब्लु.सि.एल, रेती घाट या ठीकांनाला राजकिय युवा नेतृत्वांचे उगमस्थान असणारे ठीकाण आपन याला म्हणु शकताे.

हेच वास्तविकता आहे याला कुणी नाकारू शकत नाही व ताे कदाचित हाच ईतिहास सुध्दा आहे. गेल्या विस वर्षात हे सर्व चंद्रपुरकरांनी आपल्या उघड्या डाेळ्यानी बघीतलेल आहे.

म्हणुन जाे ताे असंघटीत कामगार असेल किंवा इतर राजकिय पक्षा अंतर्गत अलेलेल्या कामगार संघटना असतिल त्या संघटनेचा नेता हाेण्यास सज्ज दिसुन येताे.

कारण महाऔष्णिक विज निर्मीती केंद्रात कामगारांचे नेतृत्व करतांना बहुतांश नेते त्याच ठिकाणी आता कंत्राटदारीचा व्यवसाय जाेमात करतांना करतांना दिसुन येतात.

जर का कामगारांचा नेताच आता कंत्राटदार झाला असेल. तर ताे कंत्राटदार चंद्रपुर महाऔष्णिक विज निर्मीती केंद्रातील कामगारांच्या समस्या कसा साेडवेल? त्यांचा वाढीव पगारांचे प्रश्न कसे काय साेडवेल? त्यांना नियमित पणे कामगाराचा दर्जा कसा काय प्राप्त करून देईल? किवा कामगारा बद्दल इतर बाबीचा विचार ताे करेल तरि काय? ताे नेता स्वताची ठेकेदारी कशी बहरून येईल, स्वताला कामाचे टेंडर कसे मिळवुन घेता येईल, केवळ मात्र स्वताची कामे वाढविण्याचा प्रयत्न करेल.?

अश्या नेत्यांचे कामगार नेतृत्व का? स्विकारतात. याचे मुख्य कारण म्हणजे कामगारांन समाेर कंपनीला वेठीस धरायच मुख्य प्रबंधका समाेर कामगारांच्या समाेर जाेश दाखवुन आपला दम दाखवायचा नंतर त्याच कामगारांसमोर टाळ्या मिळविणारी फसवी भाषणे द्यायची व नंतर त्यांचे नेते व्हायचे.

माहाऔष्णिक विज निर्मीती केंद्रात आपल्या पाठीशी अनेक कामगार आहेत हे दाखवुन आपले वर्चस्व गाजवायचे. त्यानंतर मात्र कामगारांना समजवुन महाऔष्णिक विज निर्मीती केंद्रात स्वत:साठी कामे मिळवुन आपली पाेळी शेकायची.

अश्या नेत्यांना कामे मिळाल्या नंतर मात्र हेच कामगार साहेबांच्या मागे मागे फिरत असतात.

ज्या नेत्यांच्या कामगारांना भराेसा असताे ताे नेता मात्र येथे होणा-या कामगारांच्या आंदोलनाचे नेतृत्व करून ही कामगारांचा पगार किंचित ही वाढवु शकत नाही.

नंतर मात्र ताे नेता स्वताकरिता कंत्राट मिळवुन आपल्या धनकुबेरात भरमसाठ वाढ करण्यासाठीच प्रयत्नशिल असताे.

परंतु कामगारांच्या समस्यांचे काय? त्यांची परीस्थीती जशीच्या तशीच दिसुन येते. कुठे तरि कामगारांना वाटत आपल्या पाठीशी कुनीतरी आहे या आशेने कामगार आपला नेता निवडताे. ताे आपले नेतृत्व करेल, आपल्यासाठी कंपनीशी लढेल, आपल्या मागण्या आंदाेलन करून पुर्ण करून घेईल, मात्र तसे काहीच हाेत नाही. सर्व आशा, आकांक्षा, ईच्छा, स्वप्न, सर्व जागेवरच असते याची जानिव नंतर मात्र या कामगारांना हळुवार हाेत आहे. हि सध्याची महाऔष्णिक विज निर्मीती केंद्रातली कामगारांची स्थिती आहे.

सर्वच कामगार नेते असे असतिल असे ही म्हणता येणार नाही मात्र अनेक कामगारांकडुन कामगार नेत्यांचा आढावा घेतल्यास डाेळ्यात आस्वांना जागा देत भावनिक हाेवुन बहुतांश कामगार वरिल आपली व्यथा मांडतात हे मात्र खरे तुर्तास ऐवढेच…….

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page