
डॉक्टर म्हटल की आजारी असनार्यांची सेवा करनारे पण आता डॉक्टरां मध्ये सेवा भाव राहलाच कुठे. ” कुनी ही करा निंदा” “पैसा कमवने हाच माझा धंदा” केवळ पैसा कमवने हाच एक उद्येश डॉक्टरांचा राहीलेला आहे.
हेच सर्वत्र हेच बघायला मीळते आहे. म्हनुनच आजचा घडीला डॉक्टरांच्या संपत्तीत दिवसेन दिवस भरमसाठ वाढ हाेतांना दिसायला लागली आहे. हेच बघा न प्रापर्टी च्या धंद्यात सुध्दा कित्येक डॉक्टरच दिसतील.

फार्म हाऊस, मेडिकल फार्मा कंपनी, ले -आऊट, अपार्मेंट, कॉप्लेक्स, नर्सिंग कॉलेज, इतर अनेक बिझनेस यांचेच असुन. ज्या मध्ये माेठ्या प्रमाणात डॉक्टर आता व्यवसाय करताना दिसुन येतात. आता तर काही डॉक्टरांना राजकारणाचे वेड लागले आहे. अनेक डॉक्टर निवडणुकी पुर्वीच राजकारणात सक्रिय झाले आहेत. शहरातच नव्हे तर विधानसभा क्षेत्रातल्या प्रत्येक भागात बैनर पाेस्टर लावुन काही डॉक्टरांनी आपला प्रचार, प्रसार देखिल जाेमात सुरू केला आहे. ज्याना रूग्णसेवा कधी प्रामाणिक पणे कधी जमली नाही. अश्यांनी आता जनसेवा करण्याचा मानस असल्याचे दिखावे करण्याचा जणु चंगच बांधला की काय? अशी दबक्या आवाजात जनतेत चर्चा हाेतांना दिसते.

सगळेच डॉक्टर असे असतील अस्स ही म्हनता येणार नाही. पण काही डॉक्टर तर नक्कीच आहेत.
ते ही माेठ्या प्रमाणात आहेत याला नाकारता सुध्दा येणार नाही. त्याचे कारण ही तसेच आहे अश्या डॉक्टरांना लाल दिव्याच्या गाडीचे दिवसाच स्वप्न पडु लागले आहे अशी जनताच म्हणायला लागली.
मनुष्याचे प्राण वाचवणारे दैवत म्हणुन डॉक्टरांकडे बघितले जाते. मात्र काही डॉक्टरांमध्ये रूग्णसेवा आता राहीली कुठे डॉक्टर आता पुर्ण पने व्यवसायीक झाले आहेत. हा यांचा व्यवसाय माेठ्या जाेमात आणि जाेरात सुरू आहे.

मल्टिस्पेशलीटी हॉस्पीटलच्या आणि ICU चा नावा खाली आणि वेंटीलेटर ची भीती दाखवुन मेलेल्या पेशंटच्या नातेवायकांकडुन डॉक्टर मार्फत ज्यादा पैसे घेतानाचे अनेक प्रकार उघडीस आले आहेत. त्यात स्वताचेच मेडिकल आता प्रत्येक डॉक्टरांनी आपल्या रूग्णालयात थाटले असुन ऐडमिट हाेतांना जेवढी रक्कम माेजावी लागत नाही तेवढी रक्कम मेडिकल मधुन औषधीच्या नावाने वसुल करण्यात येते. दर्शनिय स्थळी दरपत्रक लावण्याचा कायदा असुन ही अनेक रूग्णालयात दरप्रत्रक लावल्या गेले नाही. म्हणुन रूग्णाच्या नातेवाईकांकडुन माेटी रक्कम वसुल करण्यात काही डॉक्टरांचा हातकंठाच आहे. म्हणुन कित्येक पेशंट आणि त्याचा परीवारांची डॉक्टरांच्या वतीने आर्थिक पिळवनुक केली जाते. परंतु हे सगळ हाेताना प्रशासनाला दिसुन सुध्दा प्रशाषन मात्र उघड्या डाेळ्यानी केवळ बघ्याची भुमीका घेत असताे.

एखाद्या डॉक्टरांची पाेलिसात तक्रार आली तर ते शहरातिल प्रतिष्ठीत नागरिकांचा त्यांना लेबल असल्या कारणाने त्यांच्या मार्फत गुन्हा हाेवुन सुध्दा FR दाखल न करता प्रकरणाला सावरण्याचा प्रयत्न केला जाताे. असे प्रकरण शहरातिल जनतेने स्वता अनुभवले आहेत. अश्या डॉक्टरांसाठी सुध्दा एक कळक कायदा असलायला हवा. जेने करुन गाेर गरीब औषधी उपचार घेणार्याना माेठा दिलासा मीळेल हे नक्की……



