Friday, April 17, 2026
Google search engine

योजनेमुळे बहीण खुश, मात्र अटी-शर्थीमुळे नाखुश

राज्य शासनाकडून २१ ते ६० वर्षे वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महिलांना खुश करणारी योजना जाहीर करण्यात आली. त्यामुळे राज्यातील महिलावर्ग खुश झाल्या असला तरी कागदपत्रांच्या अटी व शर्तीमुळे अनेक बहिणी या योजनेपासून वंचित राहणार, असे चित्र शहरासह ग्रामीण भागात दिसत आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेचे निकष पूर्ण करण्यासाठी महिलांना जन्म दाखला, डोमिसाइल सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्डमध्ये नाव, आधार लिंक मोबाउल नंबर, रहिवासी दाखला, तहसीलदार यांचा अडीच लाख उत्पन्न असल्याचा दाखला, विवाहित स्त्री असल्यास मॅरेज सर्टिफिकेट, गॅझेट, फोटो, बँकेत महिलेचे खाते, रहिवासी दाखला, हमीपत्र इतकी कागदपत्रे लागणार आहेत. ही कागदपत्रे जमवण्यासाठी महिलांची धडपड सुरू झाली आहे.

अनेक महिला या शासनाच्या माझी लाडकी बहीण योजनेत विविध दाखल्यांच्या अभावमुळे वंचित राहतील, अशी भीती आहे. कारण अनेक महिलांची जन्माची नोंद मिळणे कठीण होईल. काही महिला शाळेतच गेल्या नाहीत. काहींचे आजही बँकेत खाते नाही, तर अनेकांच्या आधारकार्डला मोबाइल नंबर लिंक नाही, अशा अनेक समस्या महिलांना सतावत आहेत.

दरम्यान, विविध दाखले जमा करण्यासाठी होणारी कसरत पाहता अर्ज करण्याची मुदत वाढविण्याची मागणी माेठ्या प्रमामात करण्यात आली हाेती.

आता राज्य सरकारच्या वतीने या याेजनेकरिता मुद्दत वाढ देण्यात आली आहे. परंतु विराेधी बाकावरून आणि जनतेतुन लाडकी बहिण ही याेजना विधानसभा निवडणुकी पुर्वी महिला मतदारांना दिलेला लॉलीपॉप असल्याचे सांगण्यात येते.

हि याेजना लवकरच बंद पडेल असे ही बाेलल्या जात आहे. तसे ही समाेर येणा-या निवडणुकी बघता राजकिय पक्षा कडुन अश्या याेजना आनल्या जातात, व काही कालावधी करिता राबवल्या सुध्दा जातात हे काही मतदारांसाठी नविन नाही. असे मतदार वर्गात या बाबतची कुजबुज सुरू आहे.

या पुर्वीच्या ही अनेक याेजना केंद्र व राज्य सरकारच्या वतीने सुरू आहेत. परंतु अश्या याेजनेचा लाभ ख-या अर्थाने लाभार्थ्यांनाच मिळत नसताे याचा विचार मात्र सत्तेत असलेली सरकार करत नाही हे देखिल तेवढेच सत्य आहे.

टिप :- शासन प्रशासनाच्या काही तक्रारी असल्यास 9371321070 या क्रमांकावर संपर्क करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page