Friday, April 17, 2026
Google search engine

अनुकंप तत्वावरील पोलीस शिपाई पदाची १८ पदावर नियुक्ती…

पोलीस अधीक्षक चंद्रपूर कार्यालयाचे आस्थापनेवरील अनुकंप तत्वावरील पोलीस शिपाई पदाची १८ पदावर नियुक्ती…

नुकतेच पोस्टे चंद्रपूर शहर हद्दीतीत घटनेतील मृत पोलीस अंमलदार यांचे पत्नीची सुध्दा नियुक्ती…

पोलीस अधीक्षक चंद्रपूर कार्यालयाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदाची रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक ९ एप्रिल, २०२५ रोजी शारिरीक मोजमाप करीता अनुकंपा तत्ववारील उमेदवारांना बोलाविण्यात आलेले होते. सदर उमेदवारांपैकी जेष्ठतेनुसार एकुण २१ उमेदवार नियुक्तीस पात्र ठरल्याने, त्याची शासकीय नियमांच्या अटी व शर्तीचे अधिन राहुन एकुण १८ उमेदवार यांना पोलीस शिपाई या पदावर नियुक्ती पत्र आज दि.२३ एप्रिल, २०२५ रोजी श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी दिली आहे.

सदर उमेदवारांमध्ये नुकतेच पोस्टे चंद्रपूर शहर येथील दिनांक ७ मार्च, २०२५ रोजी घडलेल्या घटनेतील मृतक पोलीस अंमलदार नामे दिलीप सुभाष चव्हाण यांच्या पत्नी श्रीमती पुजा चव्हाण हयांना सुध्दा पोलीस अंमलदार म्हणुन सेवेत नियुक्त करण्यात आले आहे.

नियुक्त उमेदवारांची नांवे :-

(१) कुणाल रमेश पढाल, (२) रजनी सुनिल खरोले (३) आर्या जयंत बल्लावार (४) रिषभ सुधीर तिवारी (५) रुपमाला गुरुदास आत्राम (६) सचिन शंकर रौतुलवार (७) स्मृती शंकर आत्राम (८) रितेश अनिल पारोधी (९) नैत्युल विनोद झाडे (१०) प्रथम प्रभाकर उमरे (११) आकाश मधुकर सिडाम (१२) पियुष अंबादास अलोणे (१३) सुषमा मंगेश कुरसंगे (१४) सौरभ मधुकर आत्राम (१५) पुजा दिलीप चव्हाण (१६) अनिकेत विठ्ठल भांदककर (१७) मृणाली परशुराम वेलादी (१८) पालीता मयुर तेलंग

अश्या एकुण १८ उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले असुन उर्वरीत ३ उमेदवारांचे वैद्यकीय तपासणी अहवाल व इतर कार्यवाही पुर्ण होताच त्यांना सुध्दा नियुक्ती देण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page