Saturday, April 18, 2026
Google search engine

अवैध धंद्याचे आव्हान ठाणेदार साहेब स्वीकारतील का?

अवैध धंद्याचे आव्हान ठाणेदार साहेब स्वीकारतील का?

अवैध धंदे पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत खुलेआम पोलिसांच्या नजरेखाली सुरु

ब्रह्मपुरी –

ब्रम्हपुरी लुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या अ-हेर नवरगाव या गावामध्ये अवैध दारू विक्री खूप मोठ्या प्रमाणात चालत असून या बीडचे बीट जमादाराच्या आशीर्वादानेच अवैध दारु, सट्टा, जुगारांना जणू सर्व रानच मोकळे करून दिले की काय? असा प्रश्न या गावातील विद्यार्थी व नागरिक करीत आहेत. ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यांतर्गत १४० गावांचा समावेश आहे. ब्रह्मपुरीच्या परिसरात अवैध दारुविक्री व वाहतूक, मटका, गांजाविक्री, जुगार, इतर अवैध धंदे पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत खुलेआम पोलिसांच्या नजरेखाली सुरु आहेत. या अवैध धंद्यांवर पाच महिने अगोदर आलेले नवीन ठाणेदार प्रमोद बानबले अंकुश लावणार कि सुरु ठेवणार ? किंवा यापैकी कोणते धोरण अवलंबितात याकडे सर्व नागरीकांचे लक्ष लागले आहे.

ब्रह्मपुरी पोलिस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार अनिल जीट्टावार यांनी अवैध धंदे करणाऱ्यांना सळो की पळो करुन सोडले होते. यामुळे अनेक अवैध धंदे करणाऱ्यांनी ते बंद करुन दिले होते. मात्र त्यानंतर ठाणेदार प्रमोद बानबले येताच अवैध धंद्यांना ऊत आल्याचे दिसत आहे. ही परिस्थिती ब्रह्मपुरी परिसरात पहावयास मिळत आहे ‘घाम न गाळता सर्वांना हवाय मेवा’. यामुळे तरुण पिढी या अवैध धंद्यात गुंतली असून मटका, जुगार, दारु, गांजासारख्या अंमली पदार्थांचे व्यसन तरुण, वयोवृद्धांसह लहान लहान मुलांना लागले आहे.

अनेक ठिकाणी दहशतवाद्यांच्या रडारवर
व्यसनाकरीता ते काहीही करायला तयार होतात. यामुळे ते स्वत: व आपल्या कुटुंबाला संकटाच्या दारात उभे करीत आहेत. अनेक ‘फार्म हाऊस’ जुगारांचे मोठमोठे अड्डे बनलेले आहेत. पोलिसांनी जर मनावर घेतले तर अवैध धंदे कुणी करणार नाही, तर परिसरात एकही अवैध धंदे करणारा आढळून येणार नाही. ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात नवीन ठाणेदार म्हणून आलेले प्रमोद बानबले ब्रह्मपुरी शहरात आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील सुरु असलेले अवैध धंदे सुरु ठेवणार कि यावर कारवाही करणार किंवा यापैकी कोणते धोरण अवलंबिणार? हा प्रश्‍न पुढील काळात दिसून येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page