
गल्लीबोळात बोकाळलीय अवैध सावकारी
• तक्रारदारच पुढे येत नसल्याने अवैध सावकारांवर वर्षभरात हाेतात फार कमी गुन्हे दाखल
• अत्यंत कमी सावकारांकडे सावकारीचा आहे परवाना.
राज्यातच नव्हे तर इतर जिल्ह्यातही माेठ्या प्रमाणात अवैध सावकारी जाेमात सुरू आहे. त्यात फार कमी सावकारच परवानाधारक आहेत. मात्र, गल्लीबोळांतून अवैध सावकारांची सावकारी गेल्या अनेक वर्षांपासून बिनदिक्कतपणे सुरू आहे. याची दखल मात्र पोलिस प्रशासन बराेबर घेत नाही. अवैध सावकारी मोडून काढण्याचा विडा आता पाेलिसांनी उचलुन धरायला हवा. ‘ऑपरेशन सावकारी’ ही विशेष मोहीम मा.जिल्हा पाेलिस अधिक्षक मुक्कमा सुदर्शन यांनी आता स्वताच्या हाती घ्यायला हवी.

सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक अडचणी व दुर्बलतेचा फायदा घेत शहरात फोफावत चाललेली अवैध सावकारी अनेकांच्या संसाराची राखरांगोळी करीत आहे. दिलेल्या रकमेवर व्याजाच्या मोबदल्यात दहापट पैसे वसूल केले, तरी या सावकारांची भूक काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. अनेकांनी नैराश्यातून आत्महत्येचा मार्गसुद्धा स्वीकारला आहे.
अवैध सावकारांची कुंडली तयार करून त्यांच्या मालमत्तेची चाैकशी ह्वायला हवी.

पाेलिस प्रशासनाने आता अवैध सावकारीविरोधात आपला माेर्चा वळवायला हवा. चंद्रपुर येथिल आर्थिक गुन्हे शाखेचे उप निरिक्षक सचिन यादव व त्यांच्या चमुने मा.जिल्हा पाेलिस अधिक्षक तसेच उप मा.जिल्हा पाेलिस अधिक्षक रिणा जनबंधु, मा.उप विभागीय अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात नुकतेच चंद्रपुर येथिल दाेन अवैध सावकारांचे एक माेठे प्रकरण उघडीस आनले असुन दाेन्ही सावकार सध्या फरार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यात काल दिनांक 27 मार्चला मुख्य सावकाराच्या आई आणि मुलीला अटक करण्यात आली असुन यात पुन्हा दाेन आराेपिंना ही जेरबंद करण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रपुर जिल्ह्यातिल अवैध सावकारांचे चांगलेच धाबे दणाललेले दिसुन येत आहे.
चंद्रपुर येथे अवैधरित्या सावकारी करणारे प्रशासकिय अधिकारी, कर्मचारी, व्यवसाईक, व्यापारी, राजकिय नेते, तसेच दबंगगीरी करणारे सुध्दा माेठ्या प्रमाणात आहेत. त्यानुसार पोलिसांनी अधिकृत सावकारी करणार्या सावकारांसोबतच अवैध पद्धतीने सावकारी करणार्यांची माहिती जमा करण्यास सुरुवात केली पाहिजे. पोलिसांच्या पुढाकारातून तक्रारदारांसाठी हेल्पलाइन मोबाईल क्रमांक सेवा ही सुरु करण्यात यावी अशी मागणी नागरीकांनकडुन हाेत आहे. जेने करून अवैध सावकारी करणा-यांच्या तक्रारी पुढे येथिल.
महिला व पुरूष बचत गटांकडूनही हाेत असते सावकारी.

घरकाम करणार्या महिलेपासून ते अनेक व्यापारी, उद्योजकही खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतात. मात्र त्यांच्या व्याजाचा दर एवढा प्रचंड असतो की, कर्जदार अक्षरश: वाकून मरून जातो. शेवटी मोठी रक्कम हवाली करूनही कर्ज फिटत नाही आणि सावकाराचा तगादाही संपत नाही, अशी स्थिती येते. शहरातील सर्व झोपडपट्ट्या, गल्ली-बोळात, व्यापारी पेठांत अवैध सावकारांचा सुळसुळाट झाला आहे. किरकोळ विक्रेत्याला सकाळी पाचशे रुपये व्यवसायाला दिले की, रात्री व्यवसाय संपल्यावर त्याच्याकडून सहाशे ते सातशे रुपये गोळा करणारे सावकार सुध्दा चंद्रपुरात आहेत. भिशी, लिलाव भिशी, बचत गटाच्या माध्यमातूनही खासगी सावकारी शहरात फोफावते आहे.
गुन्हेगार पंटरकडून हाेत असते व्याजवसुली.
मुद्दल न फिटता व्याजानेच कर्जदार मेटाकुटीला येतो आहे. पाच लाखांपासून कोटी रुपये देणारेही बडे सावकार आहेत. त्यासाठी कोरा स्टँप, जमिनी, बंगले नावावर करून घेतले जातात. दर महिन्याला व्याजवसुलीसाठी गुन्हेगार पंटर नेमले जातात. व्याज न दिल्यास संबंधित व्यक्तीच्या घरातील साहित्य फेकून देणे, कर्जदाराला ताब्यात घेऊन मारहाण करण्याचे प्रकार सुध्दा अश्या अवैध सावकारांकडुन घडत आहेत.

”अवैध सावकारीतून नागरिकांची पिळवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, आता अशी बेकायदेशिर सावकारी थांबवण्यासाठी नागरिकांनीदेखील न घाबरता समोर येऊन तक्रार करण्याची नितांत गरज आहे.”
सावकारीचा कायदा?
• बेकायदा सावकारीला आळा घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश 2014 हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला.
• नवीन नियमानुसार विनापरवाना सावकारी करणार्या व्यक्तीला होऊ शकते पाच वर्षांपर्यंत कैदेची शिक्षा किंवा 50 हजार रुपयांपर्यंतचा दंड.
• परवानाधारक सावकारांनाही कायदा आणि नियमाचे पालन बंधनकारक.
• सावकाराने जर शेतकर्याला तारण कर्ज दिले, तर ते वार्षिक 9 टक्के दराने देणे बंधनकारक आहे.
• शेतकर्याला विनातारण कर्ज दिले तर ते 12 टक्के व्याजदर लावू शकतात.
• इतर व्यक्तींसाठी तारण कर्जावर सावकार वार्षिक 15 टक्के व्याजदर, तर विनातारण कर्जावर वार्षिक 18 टक्के व्याजदर घेऊ शकतो. त्यापेक्षा अधिक व्याजदर घेणे कायद्याने गुन्हा आहे.
• दरवर्षी सावकारी परवान्याचे नूतनीकरण करणे बंधनकारक आहेत.



