Saturday, April 18, 2026
Google search engine

राजकिय नेत्यांचे पाठबळ मिळाल्या शिवाय एकहाती मुजाेरी करने हे प्रशासकीय अधिका-यांना शक्यच नाही?

राजकिय नेत्यांचे पाठबळ मिळाल्या शिवाय एकहाती मुजाेरी करने हे प्रशासकीय अधिका-यांना शक्यच नाही?

सध्या चंद्रपुर महापालिकेत प्रशासकराज असल्यामुळे मनपा अधिका-यांचे मनमानी कारभाराबाबत काहीच लपलेले नाही. आयुक्त महाेदय तर चक्क हुकुमशाही गाजवत असल्याचे अनेक कर्मचारी वर्गाकडुनच दबक्या आवाजात बाेलल्या जात आहे. आयुक्त महाेदय कुणाच्या ईशा-या वर नाचत असतात हे वेगळ सांगायची गरज नाही हे चंद्रपुरकरांना चांगलेच ठावुक आहे.

चंद्रपुर येथिल जनतेच्या कोट्यवधी रुपयांचे मोठे नुकसान नगरपालिका असतांना भुयारी गटार योजनेच्या नावाखाली 110 कोटी रुपयांची उधळपट्टी केल्या गेली हाेती. या नासाडीची चौकशी करण्याचीही गरज तेव्हा पत्रकार लाेकप्रतीनीधी, सामाजिक कार्यक्रते यांना तेव्हा वाटली नाही. आधी केलेल्या गटार योजनेचे काम न करू शकलेल्या कंत्राटी कंपनीला काम पुर्णता झाले नसतांना सुध्दा महापालिकेने शंभर कोटी रुपये का दिले हाेते यांचे उत्तर तेव्हा ही कुणी विचारले नव्हते. मलनिस्सारण ​​व्यवस्था उभारणीसाठी चंद्रपुर शहरातील चांगले रस्ते त्यावेळेस खोदण्यात आले हाेते. चंद्रपुर शहरातील जनतेला तेव्हा धूळ, मातीच्या प्रदुषनाच्या समस्येने चांगले ग्रासले हाेते.

कालांनतराने नंतर पुन्हा अमृत याेजनेकरिता चंद्रपुरातिल सर्व प्रभागातले सुसज्य झालेले रस्ते खाेदकाम करण्यास आले. प्रभागातले रस्ते विद्रुप हाेवुन ही त्या रसत्यांना साधी डागडुगी सुध्दा करायला महापालिकेकडे वेळ नव्हता. अमृत याेजना घराे घरी पाेहचली म्हणुन मनपाच्या वतीने दिंडाेरा पिटला गेला. मात्र अनेक भागात अमृत याेजने पाणी अजुन ही पाेहचले नसतांना अमृत याेजना 2 साठी आणि नवे सिवरलेज करिता पुन्हा शहरातिल मुख्य रसत्याचे खाेदकाम केले गेले आहे. हे खाेदकाम त्या करिता आहे की, इतर कामाकरिता ते तर मनपा आयुक्त महाेदयच सांगु शकतात. मनपा क्षेत्रात अनेक समस्या (पार्किंगची ) असतांना, गरज नसतांना ही चाैकाचाैकात पुतळे उभारून त्या पुतळ्याला धुर खात ठेवत साेंदर्यीकरणाच्या नावानी पुन्हा जनतेच्या पैश्याची उधडपट्टी आयुक्तांनी जाेमात सुरू ठेवली आहे. एकीकडे शहरातिल काही भागात अवैधरित्या अतिक्रमाण व अवैध बांधकाम हाेत असतांना ते महत्वाचे नसुन आयुक्त, उप-आयुक्तानी चंद्रपुर महापालिकेच्या सर्व कर्मचा-यांना सध्या मालमत्ता कर ( टेक्स ) वसुलीच्या कामात व्यस्त केले आहे. महापालिकेचे आयुक्त व उपआयुक्त यांनी जणु प्रत्येक झाेनच्या सह- आयुक्तांना फरमानच काढुन सांगीतल असावे की काही करा पण (टेक्स ) मालमत्ता कर जबरन वसुल करा. टेक्स स्वरूपात महापालिकेला जनता कर देते त्या स्वरूपात जनतेला महापालिके कडुन ज्या सुविधा मिळायला हव्या त्या सुविधा न देता जनतेकडुन जबरन टेक्स वसुल करायचा आयुक्त विपीन पालिवाल आणि उपयायुक्त मंगेश खवले यांनी सैर सपाटाच सुरू केलेला दिसुन येताे.

हा सर्व प्रकार महापालिकेत प्रशासक कारभार सुरू असल्याचा प्रताप आहे, मनपा अधिकारी यांच्या विराेधात नुकतेच शहर कॉग्रेस पक्षाच्या वतीने शहर कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष रामु तिवारी यांच्या नेतृत्वात धरने आंदाेलन सुध्दा करण्यात आले. त्यात अनेक विषयावर प्रकाश टाकत निवेदन सुध्दा देण्यात आले. परंतु मनपा अधिका-यांना याचा काहीच फरक पडलेला नाही?

विलंबानी घर टेक्स भरणा-यांन वर व्याज लावुन मालमत्ता कर भरण्यास सक्ती करण्यात येत आहे. याेजनेच्या माध्यमातुन व्याजावर 50℅ शितीलता देवुन जनतेवर काही महापालिका उपकार करत नाही? पुन्हा एकदा चंद्रपुरकर मनपा आयुक्ताच्या मुजाेरीमुळे सध्या चंद्रपुरकर महानरात प्रदुषनामुळे त्रस्त आहेत. नुकत्याच झालेल्या खाेदकामामुळे चंद्रपुर शहरात जागाेजागी पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटलेली असुन गढुळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हाेत असुन चंद्रपुर येथिल जनतेच्या आराेग्यास धाेका निर्माण झाला आहे. शहरातिल मुख्य रस्ते धुरमय आणि चिकलमय झालेले दिसुन येत आहे, स्वच्छतेचा प्रथम पुरस्कार प्राप्त करणारी चंद्रपुर मनपाने जाहीरातीवर कराेडाे रूपये जनतेचे खर्च केले. पण स्वच्छता शाेधुन ही कुठेच दिसुन येत नाही. शहरातिल वॉल कंपाऊंडवर चित्र रेखाटुन तथा बैनर, पाेस्टरवर मनपाचे काैवुतुक करण्याची जाहिरात करत जनतेच्या कराच्या पैश्याची उधडपट्टी करून स्वताचीच पाठ थाेपवण्याची प्रथा आयुक्त विपिन पालिवाल व उपायुक्त मंगेश खवले हे राबवत असल्याचे चित्र स्पष्ट पणे दिसुन येत आहे.

मनपात नगर रचनाकार विभागाचा भाेंगळ कारभार तर जाेमात सुरू आहे. चंद्रपुर येथिल प्रसिध्द असलेले चार इंजि, आर्किटेक्ट मनपा अधिका-यांशी संगमत करून अवैधरित्या बांधकाम व्यवसाईक व बिल्डरांना बांधकाम परवाना मिळवुन देण्यात मुस्तेद आहेत. हे आयुक्त महाेदयाच्याच कृपेने हाेत असल्याचे ही बांधकाम परवाना मिळवणा-यांकडुन बाेलले जाते. शहरात पुरातण कायदा अस्तित्वात असतांना ऐतिहासिक गाैंडकालिन वास्तु शिल्पाच्या जवळ माेठ्या इमारतीचे अवैधरित्या बांधकाम हाेत असल्याच्या ब-याच तक्रारी येवुन ही मनपा आयुक्त मात्र बघ्याची भुमिका घेत असतात. लाेक प्रतीनीधींना मंत्री महाेदय यांच्या प्रथम आगमना प्रित्यर्थ स्वागत समाराेह कार्यक्रम राबवत स्वताचा गाजावाजा करण्यापासुन वेळच मिळत नसल्याने जनतेच्या समस्याकडे ते सुध्दा जानिव पुर्वक दुर्लक्ष करित आहेत.

आयुक्तांच्या कामावर अनेक आराेप प्रत्याराेप हाेत असुन विभागीय आयुक्त तसेेच आयाेगाकडे मनपा आयुक्तांच्या तक्रारी जावुन सुध्दा आपल्या कुर्सीवर थांड मारून बसणारा आयुक्त चंद्रपुरच्या ईतिहासात प्रथम चंद्रपुरकरांनी अनुभवलेला आहे, असे जनतेचे म्हणने आहे. राजकिय नेत्यांचे पाठबळ असल्या शिवाय एकहाती मुजाेरी करने हे प्रशासकीय अधिका-यांना जमत नसते हे वेगळ सांगण्याची गरज नाही त्यात मनपा आयुक्तांनी प्राविण्य मिळवलेल असावे अशी चर्चा पुर्वी पासुनच चंद्रपुरकरात माेठ्या प्रमाणात हाेतांना दिसते हे मात्र खरे….

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page