Saturday, April 18, 2026
Google search engine

लाईट गेल्यावर नुकसाभरपाई मिळू शकते

मुळात लाईट गेल्यावर नुकसाभरपाई मिळू शकते हे ग्राहकांना, नागरिकांना माहिती आहे का?

कोणत्याही शासकीय, निमशासकीय कार्यालयांना नियमांच्या चौकटीत राहून कामकाज करावे लागते. त्यानुसार महावितरण कंपनीला देखील ग्राहकांना सेवा देण्यासाठी नियमांचे पालन करावे लागते. परंतु ग्राहकांना याबाबतची पुरेशी माहिती नसल्याने याबाबतचा दावा केला जात नाही.

नियामक आयोगाने महावितरणला प्रत्येक कामासाठी वेळेची मर्यादा घातली आहे.

वेळेत काम न झाल्यास ग्राहकाला महावितरणने नुकसान भरपाई देणे अपेक्षित आहे. वेळेत लाईट आली नाही अथवा उपकरण जळाले तर काही प्रमाणात नुकसान भरपाई मिळते याची माहितीच जनजागृती अभावी ग्राहकांना नाही.

महावितरण आणि ग्राहकांचे अधिकार तुम्हाला माहिती आहेत का?
लाईट गेल्यावर पुढील चार तासाने प्रत्येक तासाला पन्नास रुपये इतकी भरपाई मिळते
.

राज्यांना वीज निर्मितीवरती कर आकारणीचा अधिकार नाही.

वीज नियामक आयोगाने महावितरणला प्रत्येक कामासाठी वेळेची मर्यादा घातली आहे.

वास्तविक ग्राहकांना निर्धारित वेळेत वीज सेवा मिळाली नाही तर ग्राहक महावितरणकडून भरपाई मागू शकतात.

वेळेत काम न झाल्यास ग्राहकाला महावितरणने नुकसान भरपाई देणे अपेक्षित आहे. वेळेत लाईट आली नाही अथवा उपकरण जळाले तर नुकसान भरपाई मिळते ही माहितीच ग्राहकांना नाही.

अनेकदा ग्राहकांवर अन्याय होत असुनही दाद मागितली जात नाही. त्यामुळे व्यवसायाकांकडुन नेहमीच अशा फसवणुकीच्या घटना सुरु असतात. त्यामुळे पुढे अनेकांची फसवणूक होत राहते.

अलिकडे याबाबत काही प्रमाणात जनजागृती झाल्याने तक्रारी होत आहेत. पण त्यांचे प्रमाण नगण्य आहे.
याबाबत नागरिकांकडुन प्रतिसाद मिळण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे.

विमा देताना गोड, गोड बोलणाऱ्या पण, भरपाई देताना वाईट वाटणाऱ्या लबाड लांडग्यापासून सावध रहा!

चुकीच्या, एकतर्फी अटी आणि शर्ती टाकून आपला विमा दावा नाकारल्यास ग्राहक मंचात जावे!

हा एक खूप मोठा फ्रॉड असून यामध्ये काही कंपन्या अशी फसवणूक करण्यामध्ये सध्या आघाडीवर आहेत!

सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारं हक्काचे ठिकाण, म्हणजे जिल्हा ग्राहक आयोग..!

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page