Saturday, April 18, 2026
Google search engine

उसगावमध्ये जमिनीच्या व्यवहारात काळा पैसा. कोट्यवधींचा गैरव्यवहार,

उसगावमध्ये जमिनीच्या व्यवहारात काळा पैसा! कोट्यवधींचा गैरव्यवहार,

ED आणि इनकम टॅक्सची चौकशी आवश्यक!

कल्याण सोदारी प्रतिनिधी – चंद्रपूर तालुका

घुग्घुस:घुग्घुस आणि उसगाव परिसरात प्रदूषणकारी कंपनीकडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी केली जात आहे. विशेष म्हणजे, या जमिनीची सरकारी रजिस्टरमधील किंमत फक्त ५ ते ७ लाख रुपये प्रति एकर दाखवली जात असली, तरी प्रत्यक्ष व्यवहारात ३५ ते ४० लाख रुपये प्रति एकर रोख स्वरूपात दिले जात आहेत.

(कोट्यवधींच्या काळ्या पैशाचा गैरव्यवहार!)

या व्यवहारात मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचा वापर होत असल्याची शक्यता आहे. कारण ज्या शेतकऱ्यांनी आपली जमीन विकली, ते इतर भागांमध्ये १५ ते २० लाख रुपये प्रति एकर या सरकारी दराने नवीन जमीन खरेदी करत आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा की, जमिनीच्या व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा गुंतवला जात आहे.

(हा पैसा येतो कुठून?)

कंपनीकडून शेतकऱ्यांना दिला जाणारा नगद पैसा कोणत्या स्रोतामधून येतो?

ही बेनामी ट्रान्झॅक्शन आहे का?

यामध्ये करचुकवेगिरी आणि अघोषित संपत्तीचा व्यवहार होत आहे का?

या प्रकारामुळे सरकारला कोट्यवधी रुपयांच्या कराचे नुकसान होत आहे. त्यामुळे प्रवर्तन निदेशालय (ED) आणि आयकर विभागाने तातडीने चौकशी करणे गरजेचे आहे. जमिनीच्या व्यवहारातील हा गडबडझोळ बाहेर काढण्यासाठी कडक कारवाईची गरज आहे!

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page