
आजकाल समाजात एक मानसिकता खोलवर रुजली आहे – “स्वतःचं घर किंवा फ्लेट असलाच पाहिजे”
ही मानसिकता कधी कधी स्वाभिमानाची नसून केवळ समाजाच्या दबावातून घेतलेला निर्णय असतो.
“लग्न जमवताना स्थैर्य दाखवण्यासाठी,” “मुलीच्या पालकांना इंप्रेस करण्यासाठी,” किंवा “काहीतरी आपलंसं असावं” म्हणून अनेक जण लाखोंचं कर्ज काढून महाग जागा घेवुन घर बांधतात किंवा मग शहरातिल बिल्डर करुन फ्लेट घेतात.
मात्र, या निर्णयामुळे खरंच आयुष्य सुखाचं होतं का? की तो केवळ एक मोठ्ठा आर्थिक सापळा ठरतो? याचा विचार तरण फार महत्वाचे आहे?
1. फ्लॅट म्हणजे इन्व्हेस्टमेंट – एक मोठा गैरसमज.
10-15 वर्षांपूर्वी घेतलेले फ्लॅट आता प्रचंड महाग झालेत. त्यामुळे “घर घेणं म्हणजे इन्व्हेस्टमेंट” ही गैरसमजूत लोकांच्या मनात अजूनही पक्की आहे.
पण प्रत्यक्षात बघितलं तर भाड्याने राहणं आणि फ्लॅट खरेदी करणं याचं गणित पूर्णतः वेगळं असतं.
खरं चित्र मग काय असेल ते खाली लिहल आहे एकदा नक्की वाचा.
👇👇👇👇👇
✔ 1 कोटीचा फ्लॅट घेताना 40-50 लाख डाउन पेमेंट + 50-60 लाख कर्ज घेतलं जातं.
✔ 20-25 वर्षांचा गृहकर्जाचा हप्ता (EMI) हा 35,000 ते 50,000 पर्यंत असतो.
✔ त्यावर दरवर्षी मेंटेनन्स, प्रॉपर्टी टॅक्स आणि रिपेअर्सचा खर्च असतो.
✔ फ्लॅट विकायचा म्हटलं तरी बाजाराचा उतार-चढाव असतो, विक्री झटपट होत नाही.
आणि दुसरीकडे…
जर तोच पैसा योग्य ठिकाणी गुंतवला, तर महिन्याला सहज 30,000 – 40,000 उत्पन्न मिळू शकतं!
त्यातून आपण हवे तिथे भाड्याने राहू शकतो आणि पैशावर कर्जाचा ओझाही येत नाही!

👉 मग फ्लॅट घेणं खरंच फायद्याचं आहे का? की केवळ मानसिक समाधान आणि समाजाचं अप्रुव्हल मिळवण्यासाठी आपण स्वतःच आर्थिक अडचणीत सापडतो?
2. “मुलाकडे स्वतःचं घर असलं पाहिजे” – चुकीची अट
आजही मुलीच्या पालकांना मुलाकडे “स्वतःचा फ्लॅट असावा” ही अट असते.
पण…
स्वतःचा फ्लॅट म्हणजे आर्थिक स्थैर्य याचा अर्थ नाही!
मुलाने 60 लाख कर्ज घेतले असेल आणि आयुष्यभर त्याचे हफ्ते फेडत असेल, तर त्याचं सर्व पैसा केवळ बँकेच्या ताब्यात आहे!
भाड्याने राहणारा मुलगा कमी स्थिर असतो?
समाजात अजूनही अशी समजूत आहे की “स्वतःचं घर असणारा मुलगा जबाबदार असतो.” पण जर तोच मुलगा हुशारपणे गुंतवणूक करत असेल, तर तो खूप सुरक्षित ठरतो.
EMI पेक्षा आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे!
घर घेतल्यावर, कर्जाच्या जोखडामुळे इतर कुठल्याही मोठ्या संधीचा फायदा घेता येत नाही.
उद्या एखादी उत्तम नोकरी दुसऱ्या शहरात मिळाली, तर तिथे जाणं कठीण होतं कारण “EMI भरण्यासाठी सध्याच्या नोकरीत चिकटून राहावं लागतं.”
पालकांनी काय समजून घ्यायला हवं?
✔ स्थैर्य फक्त “स्वतःच्या घरावरून” ठरत नाही, तर त्याच्या एकूण आर्थिक शहाणपणावर ठरतं.
✔ भाड्याने राहणारा माणूसही शहाणपणाने गुंतवणूक करून अधिक सुरक्षित जीवन जगू शकतो.
✔ कर्जामध्ये बुडालेला नवरा चांगला संसार करतोच असं नाही!
3. “स्वतःचं घर हवं” ही भावना योग्य, पण योग्य वेळ ठरवा!
स्वतःचं घर असणं ही वाईट गोष्ट नाही, पण योग्य वेळी आणि योग्य नियोजनाने घेतलं तरच ते फायदेशीर ठरतं.
घाईघाईने घेतलेला फ्लॅट भविष्यात आर्थिक संकटांचा बोजा वाढवू शकतो.
घर कधी घ्यावं?
सुरुवातीच्या टप्प्यात फ्लॅट घेण्याची घाई करू नका.
EMI, भाडं आणि गुंतवणूक याचं गणित बरोबर जुळलं तरच घर खरेदी करा.
फ्लॅट घेण्याआधी पुढील 10-15 वर्षांचं आर्थिक नियोजन करा.
4. घर का घ्यावं? – योग्य कारणं हवीत.
चुकीची कारण
👇👇👇👇👇
“समाजात स्टेटस मिळावा म्हणून!”
“लग्नासाठी ठरवलेल्या अटी पूर्ण करण्यासाठी!”
“फ्लॅटच्या किमती वाढणार आहेत म्हणून!”
योग्य कारण
👇👇👇👇👇
माझी आर्थिक क्षमता आणि भविष्याचं नियोजन जुळतंय.
मी यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेणार नाही.
माझं उत्पन्न स्थिर आहे आणि मी जोखमींचा विचार केला आहे.
5. कर्जाचं ओझं टाळा, आर्थिक स्वातंत्र्य मिळवा!
एकदा का घराचं कर्ज घेतलं, की पुढची 15-20 वर्षं तुम्ही बँकेचे गुलाम बनता.
आणि या काळात अनेक मोठ्या संधी तुमच्या हातातून निसटतात.
EMI मध्ये अडकण्याआधी गुंतवणुकीचे पर्याय पहा.
कर्जाच्या ओझ्यामुळे तुमचं जगणं निर्बंधित होणार नाही याची काळजी घ्या.
तुमच्या निर्णयामुळे आर्थिक स्वातंत्र्य मिळतंय का याचा विचार करा!
विचारपूर्वक निर्णय घ्या.
➡ भावनिक निर्णय न घेता, वास्तविक परिस्थिती समजून घ्या.
➡ फ्लॅट ही गुंतवणूक नसून जबाबदारीही असते. त्यामुळे नको तिथे फसून जाऊ नका.
➡ समाजाच्या अपेक्षेपेक्षा स्वतःच्या आर्थिक स्थैर्यावर लक्ष केंद्रित करा.
➡ लग्नासाठी, समाजासाठी किंवा केवळ स्टेटससाठी कर्जाच्या ओझ्याखाली जाऊ नका.
आर्थिक स्थैर्य हवं? मग निर्णय डोक्याने घ्या, भावनांनी नाही!



