
चंद्रपुरातील दाेन अवैध सावकार ऋषिराज सोमानी, अजय संघवी यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखा पाेलिसांन मार्फत गुन्हा दाखल.
(अनेक कर्जदार कास्तकारांची व जमिन,प्लाट व्यवसाईकांची केली आर्थिक फसवणुक )
संजय दिगांबर रत्नपारखी यांनी जिल्हा पाेलिस अधिक्षक यांच्याकडे केली हाेती तक्रार.

चंद्रपुर –
महाराष्ट्र राज्यात सावकारी कर्जाच्या पाशात अनेक शेतकरी अडकलेले आहेत. त्यात चंद्रपुरातले दाेन भागीदार असलेल्या अवैध सावकारांनी शंभर ते दिडशे एकरचा वर शेतक-यांच्या व व्यवसाईकांच्या शेत्या बळकवल्या आहेत.
सावकार कर्जात अडकलेल्या शेतकऱ्यांचा व काही व्यवसाईकांचा जमिनी हळपुन कर्ज स्वरूपात घेतलेली रक्कम परत करून सुध्दा सावकाराकडे गाहाण ठेवलेल्या जमिनी परत करत नव्हते ते दाेन्ही सावकार शेतकऱ्यांचे व काही व्यवसाईकांचा आर्थिक-मानसिक छळ करत हाेते.
एवढेच नव्हे तर कर्ज घेतलेल्या व्याजाची रक्कम वसुल करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीसह इतरही मालमत्ता अवैधरीत्या ते हडप करत हाेते.
परंतु अनेक ठिकाणी अशा बेकायदेशीररीत्या (Illegal Property Seized) त्यांनी हडप केल्या मात्र मालमत्तेसंबंधीत प्रकरण असल्यानी शेतकरी किंवा व्यवसाईक तक्रार करण्यास पुढे येत नव्हते.
ऐवढ्या माेठ्या प्रमाणात आर्थिक गुन्हा हाेत असतांना काही ठिकाणी तक्रारी करण्यास तक्रार करते पुढे आले, मात्र आर्थिक गुन्हे शाखा पाेलिस यंत्रणेकडून योग्य ती कायदेशीर कारवाई होत नव्हती. त्यामुळे शेतकरी व व्यवसाईक न्यायापासून वंचित हाेते.
राज्यात वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे सावकारी कर्जाचा पाश हेच मुख्य कारण आहे. असे असले तरी अवैध सावकारी निरंतर बोकाळतच जात आहे.

अश्याच प्रकारे चंद्रपुर जिल्ह्यात सुध्दा अवैध सावकारांचा धंदा जाेमात पणे सुरू आहे हे मात्र खरे….
सावकारी कर्जाच्या फेऱ्यात अडकलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेत्या या दाेन भागीदार असलेल्या सावकाराकडे गाहाण स्वरूपात ठेवलेल्या आहेत. हे सावकार कर्ज देतांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अवैध सावकार परस्पर आपल्या नावाने किंवा आपल्या कुटुंबातिल सदस्य यांच्या नावाने रजिस्ट्री करून घेत हाेते.
मुळात शेतकरी सावकारांच्या दारी का जातो, याचे उत्तर शोधले पाहिजे. राज्यात शेतीसाठी संस्थात्मक कर्जपुरवठ्याची स्थिती फारच बिकट आहे.
रिझर्व्ह बॅंकेचे आदेश तसेच राज्य सरकारच्या वेळोवेळीच्या सूचना यांना धुडकावून लावत बॅंका शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यात कमालीची उदासीनता दाखवतात. त्यात बॅंकांकडून शेतीसाठी कर्जपुरवठ्याचे उद्दिष्टच कमी ठेवले जाते.
या उद्दिष्टाच्या ५० टक्केहून कमी कर्जपुरवठा बॅंकांकडून शेतकऱ्यांना होत असताे. त्यातही शेतकऱ्यांच्या नावाखाली ग्रामीण कृषी उद्योजकांनाच अधिक कर्जपुरवठा होतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने खूपच कमी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा होतो. म्हणुन बहुतांश शेतकऱ्यांना कर्जासाठी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागतात.

राज्यातच नव्हे तर चंद्रपुर जिल्ह्यात देखिल परवानाधारक तसेच अवैध सावकार माेठ्या प्रमाणे आहेत. त्यांनी सावकारी नियम कायद्याच्या अधिन राहून नियमाने कर्जपुरवठा करणे अपेक्षित असते.
परंतु बहुतांश परवानाधारक व अवैध सावकार सुध्दा नियमांचे उल्लंघन करीत कर्जपुरवठा करतात. कर्जावर अव्वाच्या सव्वा व्याज आकारतात. बिना परवानाधारक सावकार तर शेतकऱ्यांची व शेती असलेल्या व्यवसाईकांची फारच पिळवणूक करतात.
सावकार हे त्या भागातील धनदांडगे, राजकीय वरदहस्त असलेले असतात. त्यांची पोलीस व प्रशासनातील अधिकाऱ्यात उठबस असते. त्याचा ते गैरफायदा घेतात.
त्यामुळे कर्ज देताना गरजवंताला कागदोपत्री अडकवतात, शिवाय कर्जवसुलीसाठी दंडेलशाही करतात. त्यांच्या विरोधात नाडलेला कर्जदार भीतीपोटी पाेलिसात तक्रार देत नाहीत. आणि एखाद्याने दिलीच तर त्याची पाेलिसांकडुन गांभीर्याने दखलच घेतली जात नाही.
राज्यात पूर्वी १९४६ चा सावकारी नियमन कायदा होता. या कायद्यात वेळोवेळी कितीही सुधारणा केल्या तरी तो कालबाह्य ठरत असल्याने शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नव्हता.
त्यामुळे नवा सावकारी नियमन कायदा अडथळ्यांची शर्यत पार करून २०१४ पासून अमलात आला आहे. यानुसार फक्त नोंदणीकृत व्यक्तीलाच कायद्याने ठरवून दिलेल्या कक्षेत सावकारी करता येऊ शकते.

चंद्रपुरातिल या दाेव्ही सावकारांनकडे कुठलेच सावकारी परवाना नाही हे विशेष
परंतु चंद्रपुरातिल दाेन ( भागीदार असलेले ) सावकार अवैधरित्या अनेक वर्षा पासुन सावकारी करत आहेत.
चंद्रपुर,बल्लारपुर, राजुरा, व ईतर तालुक्यातिल शेतकऱ्यांच्या व व्यवसाईकांच्या शेती, जमिनी, प्लाट आपल्या नावे करून घेतले. परंतु कर्जाची व व्याजेची रक्कम निरंतर देवुन सुध्दा पुन्हा तुमच्याकडे रक्कम थकित असल्याचे कारण सांगत या दाेन्ही सावकाराने अनेकांची शेती, जमिनी, प्लाट बळकावुन घेतले आहेत.
या दाेन सावकारा पैकी एक सावकार वयाच्या पन्नासी जवजळ पास असतांना वकीलीची सनंद घेवुन शंभर एकरचा वर शेतक-यांच्या शेत्या गिळुण सध्या न्यालयात वकिल म्हणुन मिरवतांना दिसुन येताे. आपल्या कर्जदारांना न्यायालईन भिती दाखवत माझ कुणी ही काही करू शकत नाही अश्या धमक्या देत असल्याचे या सावकारामुळे त्रस्त असलेला कर्जदार सांगताे.
त्यात स्वताहुन पिळवणुक केलेले शेतकरी तथा व्यवसाईकांनी आमच्यावर दबाव टाकण्यास व न्यालालयाचे फे-या मारण्याकरिता या सावकाराने वकिलीची सनद घेतल्याचे ते बाेलुन दाखवतात.
कर्जदाराच्या स्थावर मिळकतीचा विक्री, गहाण, लीज, अदलाबदल असा व्यवहार करू नये. परवानाधारक सावकाराने हिशेब पत्रके, नोंद वह्या अद्ययावत ठेवण्याचे सावकारांना बंधनकारक असते. सावकाराने कर्जदार शेतकऱ्यांकडून निर्धारित केलेल्या व्याजदराचीच वसुली करायची असते. सावकार अव्वाच्या सव्वा व्याज आकारणी करत असेल किंवा कर्जाच्या कालावधीत घोळ करीत असेल तर, कर्जदारास त्याच्या हिशेबाप्रमाणेच रक्कम कोर्टात भरण्याची तरतूद आहे.
एवढेच नाही तर अनाधिकृत सावकारीसाठी दंड आणि कारावासाची शिक्षेची देखील सोय आहे. असे असताना या कायद्याची देखील राज्यात व ईतर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही.
अवैध सावकारांच्या पाशात अडकलेल्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या, त्याची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी योग्य ती कायदेशीर कारवाई केली तर सावकारांनी बळकावलेल्या जमिनीसह इतरही मालमत्ता त्यांना परत मिळू शकते.
कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीनेच अवैध सावकारांच्या मुसक्या आवळून शेतकऱ्यांची त्यांच्या पाशातून सुटका करता येऊ शकते, हे राज्य शासन-प्रशासनाने लक्षात घ्यायला हवे. त्या करिता अश्या वैध असाे किंवा अवेैध सावकारांच्या पिळवणुक झालेल्यानी आर्थिक गुन्हे शाखेत जावुन तक्रार नाेंदवायला हवी.
महत्वाचे म्हणजे भविष्यात शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडे जाण्याची वेळच येऊ नये, अशी शेतीसाठीच्या कर्जपुरवठ्याची व्यवस्था शासनाने करायला हवी. अश्या सावकारांच्या मुसक्या आवरून त्यांना तुरूगात टाकायला हवे. तेव्हा कुठे सावकारांची सुरू असलेली माेनाेपल्ली संपुष्टात येईल.
आता मात्र अश्याच चंद्रपुरातील दाेन अवैध सावकार ऋषिराज सोमानी, अजय संघवी यांच्यावर जिल्हा पाेलिस अधिक्षक मुक्कमा सुदर्शन, उप- जिल्हा पाेलिस अधिक्षक रिना जनबंधु तसेच उप विभागीय पाेलिस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात आर्थिक गुन्हे पाेलिस शाखेचे उप- निरीक्षक सचिन यादव व त्यांची टिम त्यात संदीप वासेकर, पुरूषाेत्म गीते यांनी प्रकरणाची सखाेल चाैकशी करून बहुतांश पुरावे गाेळा केले आहेत व पुढील तपास करित आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे टिमच्या अथक परिश्रमाणे चंद्रपुरातिल दाेन मुख्य सावकार ऋषिराज सोमानी, अजय संघवी सह रोहीत सोमानी, राधिका सोमानी, प्रिती मनोजसंघवीइतर सहकारी त्यांचे एजंट यांच्यावर कलम 420,465,476,471,474,34, 120-B, 39, 45,82(क) 3 रामनगर पाेलिस स्टेशन चंद्रपुर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकर यात शामिल असलेल्या आराेपींना तसेच गुन्हेगारांना सुध्दा अटक हाेण्याचे संकेत आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आले आहे. चंद्रपुरातिल हे सावकारी प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रातिल अवैधरित्या सावकारी करणा-या करिता एक ऐतिहासिक उदाहरण व चाेप बसणारे असेल हे मात्र नक्की….



