Saturday, April 18, 2026
Google search engine

म्हाडाच्या अधिका-याच्या संगनमताने नविन चंद्रपुरात अवैध गुंठेवारी

नविन चंद्रपुर शहर क्षेत्रात सुरु असलेल्या “अवैध गुंठेवारी प्रकरणावर” प्रतिबंधात्मक कारवाई व्हायला हवा.

जाणता राजा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नितिन उदार यांची मागणी

चंद्रपुर शहरातील वाढत्या लोकसंख्येला नियोजीतपणे सर्व नागरी सेवा पुरविता याव्या या करीता नगर रचना नियमानुसार पुर्ण नियोजीतपणे "नविन चंद्रपुर शहराची" उभारणी करण्यात येत आहे.

 त्याकरीता या नविन चंद्रपुर शहरात सर्वसामान्य शहरासाठी आवश्यक असणा-या सर्व नागरी सुविधांसाठी सुध्दा क्षेत्र निश्चीत करुन त्याकरीता आरक्षित केलेले आहे. 

या सोबतच निवासी क्षेत्राचा सुध्दा नियोजीतपणे आणि शिस्तबध्दपणे विकास केला जात आहे.

असे असतांना महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधीकरणाची कोणतीही परवानगी न घेता  "नविन चंद्रपुर" शहराच्या क्षेत्राअंतर्गत तेथील अनिवासी क्षेत्रात सुध्दा अवैध गुंठेवारीने निवासी भुखंड म्हणुन विकण्याचे "बेकायदेशीर व्यवहार" देखिल  शहारातिल माेठ्या व्यवसाईकांनकडुन मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे आढळुन येत आहे.

योग्य माहिती अभावी यात सर्वसामान्यांची मात्र आर्थिक फसवणुक होण्यासोबतच नविन चंद्रपुर शहराचे योग्य “नियोजनही” पार अस्ताव्यस्त होवुन जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तेव्हा नविन चंद्रपुर शहर परीसरातील काही सर्वे क्रमांकामध्ये याबाबत संशयास्पद अश्या हालचाली आढळुन येतील, प्लाटला परिवर्तित नकरता अवैधरित्या प्लाट विकणा-या त्या सर्व्हे क्रमांकाच्या मालकांना याबाबतचे स्पष्टीकरण मागणा-या नोटीस तात्काळ जारी करण्यात यायला हवे.

संबंधित संशयास्पद सर्व्हे क्रमांकावर निवासी वापरास प्रतिबंथीत असल्याबाबतचे बोर्ड सुध्दा सार्वजनिकपणे लावण्याची व्यवस्था करण्यात यायला हवी.

ज्या सर्व्हे क्रमांकात अवैध गुंठेवारी निर्माण करण्याकरीता गैरहेतुने अनेक व्यक्तीच्या समुहाला "सामुहिकपणे" विकण्याचा प्रयत्न होण्याची साशंकता असेल तर, अशा सर्व्हे क्रमांकानुसार

त्याबाबत खरेदी – विक्रीची नोंदणी करणा-या माननिय नोंदणी निंबंधक कार्यालयात कायद्यात असलेल्या तरतुदीनुसार महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) कडुन प्रतिबंधात्मक तक्रारी दाखल करुन ठेवणे गरजेचे आहे.

जेणेकरुन खरेदी विक्रीची नोंदणी करण्यापुर्वी त्यांना याबाबतची अधिक चौकशी करणे गरजेचे राहिल. त्याबाबतची कार्यवाही देखिल अश्या ले-आऊट धारकांवर करायला हवी..

प्रसिध्दी माध्यमातुनही नविन चंद्रपुर शहरातील अवैध निवासी गुंठेवारी भुखंड विक्रीबाबत असलेल्या प्रतिबंधात्मक बाबीची माहिती बातम्या स्वरुपात देण्याची उपाययोजना देखिल करणे गरजेचे आहे.

जेणेकरुन सर्वसामान्य प्लाट घेणा-या ग्राहकांची त्यातील फसवणुकीपासुन बचाव हाेईल. विशेष म्हणजे या प्रकरणात माडा येथिल अधिकारी यांच्या सुध्दा सहभाग असल्याचे बाेलल्या जात आहे. यात सहभागी हाेणा-या सर्वांवर रितसर चाैकशी करून याेग्य ती कारवाही करावी अशी मागणी जाणता राजा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नितिन उदार यांनी माननिय उपअभियंता साहेब, विशेष नियोजन प्राधीकरण, (महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण) नविन चंद्रपुर शहर माननिय अधिक्षक, यांना निवेदन देवुन करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page