Saturday, April 18, 2026
Google search engine

नगर परिषद घुग्घुसच्या पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष.

गावकऱ्यांची , मुख्याधिकाऱ्यांनी दखल घेणार का?


कल्याण सोदारी प्रतिनिधी चंद्रपूर तालुका

घुग्घुस: येथील बाहादे ले-आउट परिसरात प्रभाग क्रमांक ०९ दिनांक १फेब्रुवारी २०२५ रोजी नळ व्हाल दुरुस्तीचे काम करण्यात आले होते तब्बल अखंड परिश्रम करून पाईपलाइन व्हाल लिकेज दुरुस्त करण्यात आली, मात्र त्यानंतरही पाणीपुरवठा विभागाने योग्य देखरेख केली नाही.परत तेच व्हाल अव्वग्या ४तास लिकंजे झाले आरोग्य पाणीपुरवठा अभियंता यांना फक्त मोबाईल फोन वरून माहिती घेतात
आणि नागरिकांच्या आरोग्यावर जीवनाशी खेळ चालू आहे
गावकऱ्यांच्या मते, आरोग्य आणि पाणीपुरवठा अभियंता मुख्यालयात वास्तव्यास नसून शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. शासनाकडून मिळणाऱ्या राहणीमान भत्त्याचा गैरवापर होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

गावकऱ्यांची मागणी – संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?

गावातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील अनियमिततेमुळे नागरिक त्रस्त झाले असून, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नगर परिषद मुख्याधिकारी यांनी त्वरित लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जातील का? घुग्घुसकर याकडे उत्सुकतेने पाहत आहेत!

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page