
विश्रामगृहातील कार्यक्रम भाजपचा तर प्रियदर्शिनी तील जोरगेवारांचा… !
चंद्रपूर :- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला चंद्रपुरात दोन गोष्टीची चर्चा होती, त्यामध्ये एक पालकमंत्री अशोक उईके यांच्या आगमनाची व प्रियदर्शनी सभागृह व शासकीय विश्रामगृहातील कार्यक्रमाची… प्रियदर्शनी सभागृहातील कार्यक्रम किशोर जोरगेवराचा की भारतीय जनता पार्टीचा…, याची चर्चा काल सकाळपासून सुरू होती.
भाजप एक व कार्यक्रम दोन अशी रंगलेली चर्चा व त्यामध्ये शासकीय विश्रामगृहातीलच कार्यक्रम अधिकृत असल्याचे भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती वरून जाणवले. भारतीय जनता पार्टीचे संघटन पर्व संपूर्ण देशभरात साजरे केले जात आहे. त्याच अनुषंगाने प्रियदर्शनी सभागृहात संघटन पर्व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता परंतु या कार्यक्रमात जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना कोणतेही स्थान नसल्याचे दाखविण्यात किशोर जोरगेवार यांनी कोणतीही कसं सोडली नाही.
चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे ग्रामीण व शहर असे दोन जिल्हाध्यक्ष आहे हेही बहुतेक आमदार किशोर जोरजेवर आमदारकीच्या तोऱ्यात विसरले आणि त्यांनी कार्यक्रम पत्रिकेमध्ये या दोन्ही जिल्हाध्यक्षांचे नाव गहाळ केले. दुसरा एक कार्यक्रम शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमाला राजुरा विधानसभा आमदार देवराव भोंगळे वरोराचे आमदार करण देवतळे यासोबतच असंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली. महत्त्वाचे म्हणजे चंद्रपूर विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीच्या छोट्या मोठ्या सगळ्याच कार्यकर्ते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शविली. तर आमदार किशोर जोरगेवार यांनी आयोजित केलेल्या प्रियदर्शनी सभागृहात फक्त भाजप सोडून जोरगेवरांच्या यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा “बडे जाव” प्रामुख्याने दिसून आला. या दोन्ही कार्यक्रमात किशोर जोरगेवार हे भाजपचे आमदारकी यंग चांदा ब्रिगेडचे याची विशेष चर्चा आज चंद्रपूर जिल्ह्यात होत आहे. आता जोरगेवार यांनीच ठरवावे की ते भाजप वाढविण्यासाठी चंद्रपुरात निवडून आले आहेत की यंग चंदा ब्रिगेडला महत्त्व देण्यासाठी…. यापूर्वी जिल्ह्याच्या इतिहासात असे कधी घडले नाही त्या जोरगेवार यांच्या कार्यकाळात होत आहे.
आपण लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहे व भाजपचे आमदार आहोत हे ही जोरगेवार यांच्या विस्मरणात गेले आहे असे दिसत असल्याची चर्चा आज शहरात मोठ्या स्तरावर सुरू आहे..



