Saturday, April 18, 2026
Google search engine

बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे राजकारण न करता महापरिनिर्वाण दिनाचे पावित्र्य जपणे आवश्यक….

बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे राजकारण न करता महापरिनिर्वाण दिनाचे पावित्र्य जपणे आवश्यक….

चंद्रपुर –

६ डिसेंबर हा दिवस प्रत्येक आंबेडकर अनुयाई यांच्या करिता शाेकाकुल दिवस असताे. या दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. म्हणुन या दिवशी पुर्णाकृती पुतळ्याचे राजकारण न करता महापरिनिर्वाण दिनाचे पावित्र्य जपणे आवशक आहे.

हा दिवस आंबेडकरी अनुयायांनी शांततेने आणि गांभीर्याने पाळायला हवा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे चतुरस्र् व्यक्तिमत्त्व हाेते. आजही आपणा सर्व भारतीयांना सदैव स्फूर्ती देणारे व दिशादर्शक तसेच प्रेरणादायी आहेत. भारताच्या सर्वागीण विकासासाठी लोकशाहीप्रणीत भारतीय संविधान निर्माण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जनतेवर कधीही न फिटणारे उपकार केले आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक व इतर विविध क्षेत्रात अतुलनीय मौलिक कार्य करून त्यांनी आपले खरे राष्ट्रप्रेम दाखवून दिले.

जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धांची गरज आहे, असे विश्वशांतीचे विधान करणारे विद्वान म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव समस्त जगाला माहीती आहे. ‘ज्ञानाचे प्रतीक’ असा त्यांचा गौरव केला केला जाताे.

त्यामुळे भारत देशासह विदेशातही चारित्र्यसंपन्न आणि नि:स्वार्थी लोकसेवेमुळे एक आदर्श व प्रेरणादायी व्यक्ती म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाे सन्मान जागतीक पातळीवर मीळताे ताे अजुन कदाचित जगात कुणाला ही मीळाला नसेल.

चंद्रपुरात मागील कित्येक वर्षापासून सर्व आंबेडकरी अनुयाई तसेच चळवळीतील कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन हा शाेकाकुल हाेवुन चंद्रपुरातिल बाबासाहेबांच्या पुर्णकृती पुतळ्या जवळ येवुन बाबासाहेबांना विनम्र अभिवादन व मान वंदना देण्यास एकत्रीत हाेत असताे.

आधी यापुर्वी प्रत्येक वार्डातल्या बाेैध्द विहारातुन भिम ज्याेत काढुन पुतळ्या जवळ येत असे. त्या नंतर ही भीम ज्याेत पुर्णाकृती पुतळ्या पासुन तर दिक्षाभुमी पर्यंत जातांना “जयभीम” “युध्द नकाे बुध्द हवा” या घाेषनेने शहरात संदेश दिला जात हाेता. अंधारमयातुन प्रकाशाकडे घेवुन जाणारी हि, भीम ज्याेत बघण्यास रसत्यावर चिक्कार गर्दी असायची व ती भीम ज्याेत बघण्यास शहरातिल प्रत्येक नागरिक उत्सुक असायचे.

बौद्ध समाज, मानव प्रेम, मैत्रीभाव आणि समाजहित व शांती भावनेचा पुरसकर्ता आहे. परंतु काही वर्षा पासुन   समाजकारण करता करता आता पुर्णाकृती पुतळ्या जवळ कुठे तरि राजकारण हाेत आहे. तीथे दर वर्षी महापरिनिर्वाण दिनी कार्यक्रम आयाेजीत केले जात आहेत. समाजकारण करून राजकारण करायच असेल तर ते करायला कुणाची काही हरकत नाही. बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्या जवळ बाबासाहेबांची जयंती तीथे जल्लाेषात साजरी करावी. संविधान दिन असेल एवंम बुध्द जयंती, धम्म चक्र परीवर्तन दिनाचा सुध्दा कार्यक्रम जाेमात करावा त्याला कुणाचा विराेध ही नसेल.

मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्या जवळ 6 डिसेंबर या शाेकाकुल दिनी भाषन, प्रबाेधात्मक किंवा गीत संगीतचा कार्यक्रम तसेच मेळावा भरवण्याच काम काही वर्षा पासुन निरंतर सुरू आहे. या कार्यक्रमामुळे या पुर्वी निघणारी भीम ज्याेत जे माेठ्या स्वरूपाची निघत हाेती ती भीम ज्याेत आता त्या स्वरूपाची निघत नसुन ती भीम ज्याेत ईतिहासात जमा झाल्याचे दिसुन येत आहे..

त्यामुळे अश्या कार्यक्रमाला 6 डिसेंबर राेजी महापालीका, पाेलिस प्रशासनानी सुध्दा बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्या जवळच्या कार्यक्रमाचा परवानगी नाकारायला हवी असे आंबेडकर अनुयाई यांचे मत असुन या करिता आंबेडकरी सामाजीक संघटनेनी या दिनाचा कार्यक्रमाचा विराेध करायला हवा.

या दिवशी आधी केवळ बाबासाहेबांना पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून सायंकाळी भिमज्याेत निघुन ही भीमज्याेत प्रत्येक वर्षी दिक्षाभुमीला जायची. मागील काही वर्षात माेजकेच अनुयाई दिक्षाभुमीवर जातात व काही बाबासाहेबांच्या पुर्णकृती पुतळ्या जवळ येवुन अभिवादन करून तीथे आयाेजीत असलेल्या कार्यक्रमाचा आस्वाद घेत असतात.

दिक्षाभुमी ही कुनाची खाजगी मालमत्ता नसुन ते आम्हा सर्व आंबेडकरी अनुयाई यांची आहे. त्या दिक्षाभुमीवर डॉ.बाबासाहेबांचे चरण स्पर्श झाले असुन ती ऐतीहासीक भुमी आहे. म्हनुन त्या भुमीला अनुयाईचा मनात एक मानाच स्थान आहे. कुनाच्या सांगण्यावरून जर अनुयाई दिक्षाभुमीला जात नसतील तर ही एक माेठी शाेकांतिकाच म्हनावे लागेल. असला प्रकार येत्या काही वर्षा पासुन निंरंतर सुरू आहे. भीम ज्याेत घेवुन येणा-या आंबेडकरी अनुयाईंनी पुर्णाकृती पुतळ्या जवळ न थांबता दिक्षाभुमी पर्यंत त्याच ताठमानेने पुन्हा आधी सारखी भीम ज्याेत शहरातुन काढायला हवी या करिता चंद्रपुरातिल बाैध्द मंडळांचे अध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतल्या सर्व संघटनेच्या अध्यक्षांनी त्या करिता यंदा प्रयत्न केले पाहीजे. या करिता नुकतेच 6 डिसेंबर 2024 ला चंद्रपुरातिल सर्व बाैध्द मंडळांनी व आंबेडकरी अनुयाईंनी आपल्या वार्डातुन भीमज्याेत काढवे तसेच बाबासाहेबांच्या पुतळ्या जवळ 6:00 वाजे पर्यंत एकत्रीत येवुन नंतर दिक्षाभुमी पर्यंत एकरूप अशी माेठ्या स्वरूपाची भीम ज्याेत काढण्याचे आव्हान व विनंती चंद्रपुर येथिल सर्व समता सैनिक दलांनी एक विचाराने केले आहे.

महापरिनिर्वाण हा दिवस आंबेडकरी अनुयाई करीता अत्यंत शाेकाकुल असल्यामुळे बाबासाहेबांना मानाचा मुजरा करून सर्वानी १५ मिनिटांकरिता मौन पाळून, बुद्धवंदना म्हणून, मानव समाजाप्रती शिस्तबद्ध मंगलमैत्री करून हा आगळा वेगळा महापरिनिर्वाण दिन या वर्षापासून आयोजित केला पाहीजे. महापरिनिर्वाण दिन हा दु:खद दिन असल्याने हा दिवस सा-यांनी गांभीर्यपूर्वक व अष्टशील उपोसथेने पाळावा. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे चिंतन तसेच आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस आहे. या दिवशी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून शांततेने आणि श्रद्धेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून सदाचारी जीवन जगण्याचा संकल्प करावा. सामुदायिक वंदना म्हणण्याची प्रथा सुरू करावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे, त्यागाचे स्मरण करावे, हीच त्यांना महापरीनिर्वाण दिनी खरी आदरांजली असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page