
रुपेश देशमुख ब्रम्हपुरी
मुंबई- विधानसभा निवडणुका घोषित होताच राष्ट्रीय काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीनुसार सर्व स्टार प्रचारकांच्या भरपूर सभा राज्यभारत लावण्यात आल्या, या साठी हेलिकॉप्टर चे नियोजन पक्षाने करून दिले होते.
मात्र विजय वडेट्टीवार हे ब्रम्हपुरी सोडायला तयार नाहीत. वडेट्टीवर हे ब्रम्हपुरी लगतच्या मतदार संघात प्रचारासाठी काही वेळ सहभागी होतात व सभा आटपून ताबळतोब ब्रम्हपुरीत दाखल होतांना दिसत आहे.पक्षाने दिलेला हेलिकॉप्टर सुद्धा जास्तीत जास्त वेळ रिकामा उभा आहे त्याचा अतिरिक्त खर्च काँग्रेस पक्षावर होत आहे. पक्षाने ठरवून दिलेल्या अनेक दौरे वाडेट्टीवारांनी रद्द केले आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील उमेदवार तसेच पक्ष कमालीचा नाराज आहे.
ब्रम्हपुरी विधानसभेत यंदा वडेट्टीवारांना कळवे आव्हाहण मिळाले आहे. त्यामुळे विजेय वडेट्टीवार, आपला मतदार संघ सांभाळण्यात व्यस्त झाले आहेत.त्यांची पत्नी व मुलगी सुद्धा ब्रम्हपुरीत गल्लो गल्लीत आणि गावोगावी प्रचारात उतरल्याचे पहिल्यांदाच दिसून आले.भारतीय जनता पक्ष तर्फे स्थानिक शेतकरी उमेदवार क्रिष्णा सहारे यांना उमेदवारी दिली असून यंदा ब्रम्हपुरीत काट्याची टक्कर असल्याचे बोलले जाते.



