Saturday, April 18, 2026
Google search engine

पर्सनल लोन मध्ये महाराष्ट्रात मागच्या तीन वर्षात तब्बल ६० टक्यांनी वाढ.

पर्सनल लोन मध्ये महाराष्ट्रात मागच्या तीन वर्षात तब्बल ६० टक्के वाढ झालेली आहे.

म्हणजे नेमक काय झालेलं आहे ? लोकांच उत्पन्न आहे तेवढच आहे किंवा घटलेल आहे मात्र महागाई वाढलेली आहे. आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करायला लोकांना पगार पुरत नाहीत. लोकांची बचत, अडनिड भागवायला केलेली अल्पमुदतीची गुंतवणूक केव्हाच संपलेली आहे.

कोविड नंतरच्या काळात विस्कळीत झालेलं चक्र महागाईने आणि बेरोजगारीने आणखी बिघडून ठेवलेलं आहे. यामध्ये सुधारणा होण्याची लोकांना कुठलीही आशा दिसत नाही. सरकारच्या पातळीवर हि स्थिती सुधारायला, महागाई कमी करायला, रोजगार वाढवायला, लोकांची क्रयशक्ती वाढवायला, उत्पन्न वाढवायला, काहीही हालचाल केली जात नाहीये.

सरकार मग करत काय ? तीर्थयात्रा करायला जा ,
दीड हजार महिना घेऊन त्यात जगायची व्यवस्था करा, हिंदू मुस्लीम बायनरी खेळत बसा, सन, साेहळे, उत्सव साजरे करा, मिरवणुका काढा, डीजे लावा आणि राजकारणी लोकांच्या पैशाने मज्जा करा.

लोकांना व्यक्तिगत कर्ज घेऊन उदरनिर्वाह चालवायला भाग पडणे हि अतिशय भयावह अवस्था आहे. जीडीपी आणि विकासाचे वाजवले जाणारे ढोल म्हणजे “Jobless Growth” आहेत.

रोजगार आणि उत्पन्नाचा आलेख असाच ढासळत राहिला तर हि अव्वाच्या सव्वा घेतलेली कर्जे फेडण्याची लोकांची क्षमता राहणार नाही.

कर्जफेड झाली नाही तर बँका घाईला येतील.

वसुली एजंट, त्यांचा तगादा ,नोटीसा, बदनामी या भीतीने कीती तरी शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या तश्या शहरात कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकांच्या सुध्दा आत्महत्या झाल्या आहेत व त्या अश्याच्य सुरु राहतील.

एका बातमीचे एवढे अर्थ आणि परिणाम आहेत.


हे अतिरंजित वाटत असेल तर आपल्या भवताली पर्सनल लोन, व्यक्ती लाने, शैक्षणिक लाने, वाहन लाेन घेतलेल्या लोकांशी थाेड बाेलुन पाहा जेनेकरून थाेड्या फार कर्ज घेतलेल्या ग्राहकांच्या हाेणा-या आत्महत्या वाचवता येईल. एकीकडे माेठ्या उदयाेजकांचे राजकारण्यांन साेबत असणारे आर्थिक हित संबंध असल्याने काेट्यवधी लाेन माफ केले जाते. मात्र प्रामाणिक कर्ज धारकांना बँकेकडुन कर्ज भरण्यास छड करत आत्महत्यास प्रवृत्त केल्या जात आहे. ही बाब खाेटी असेल तर स्वता बँकांशी बोलून पहा.

अर्थात कुणाला ही या आर्थिक स्थितीशी काही देणघेण नाहीये, आपल्याला हिंदू मुस्लीम कांड जिरवता आले पाहीजे म्हणजे झाल ? त्यातच आपला देश पुढे जात आहे. म्हणुन निवडणुकीत विचार करून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावुन मतदान करायलाच हवा. नाही तर पुन्हा गुन्हेगारीत निपुन असलेले लाेक सत्ता काबीज करायला माेकळे असतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page