
आपल्या मार्गदर्शनात नेतृत्व गुण, काैशल्य असणा-या व्यक्तींना तयार करणारे व्यक्ती महत्व म्हनजे मा.विजय सुर्यवंशी सर
पत्रकार हा देशाचा चाैथा स्तंभ आहे आणि ताे देशसेवे करिता निस्वार्थपणे आपली भुमिका बजावत असताे. परंतु दिवस रात्र राब राब राबणा-या पत्रकारांना आपल्या न्याय हक्कासाठी लढाव लागत हे अस्वस्थ बघुन पुराेगामी महापुरूषांच्या विचारांना मनात ठेवुन पुराेगामी विचारांना तळागळात रूजवण्याचा निच्छय करत सुर्यंवंशी सरांनी पुराेगामी पत्रकारांची संघठनेची स्थापन केली. हे ध्येय व लक्ष गाठणारे व त्यास यशाच्या शिखरा पर्यंत पाेहचवणारे मा.विजय सुर्यवंशी सर यांनी पुराेगामी पत्रकार संघाचे सुरवातीला एक छाेटसे राेपटे लावले. एक दिवस त्या राेपट्याला हळु हळु माेठ्या वटवृक्षात रूपांतर करण्याचे ध्येय मनात बाळगुण तसेच स्वताच्या आत्मविश्वासाने जिद्दीने पुराेगामी पत्रकार संघाची स्थापन करणारे संस्थापक अध्यक्ष मा.विजय सुर्यवंशी सर यांना सर्व पत्रकार बंधु आणि भगिनीकडुन मानाचा मुजरा.
सामाजिक/राजकीय चळवळीचे नेतृत्व करणे म्हणजे लोकांच्या संघासह कार्य करणे आणि त्यांच्या जटिल वैयक्तिक आणि सामूहिक गरजा पूर्ण करणे. तसेच उत्कट, सर्जनशील लोक ज्यांच्यावर खोल विश्वास आहे ते संघर्षाचा अनुभव घेत असताना उत्कटतेने, सर्जनशीलतेने आणि खात्रीने वागत असतात. नेतृत्व या नात्याने आपण स्वत:ला आणि ज्या लोकांसोबत आपण काम करतो त्या लोकांसोबत विश्वास आणि संघर्ष मार्गी लावण्यास इच्छुक आणि सक्षम असणे आवश्यक असणारे व्यक्ती महत्व म्हणजे राष्ट्रीय पुराेगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.विजय सुर्यवंशी सर आहेत.
पत्रकारांनाच नव्हे तर तळागळातील प्रत्येक वर्गांना संघा मार्फत न्याय मिळवुन देण्याचा त्यांनी निच्छय केला हाेता. म्हणुन त्यांनी पुराेगामी पत्रकार संघाती २०१७ ला स्थापन केली हाेती. ऐवढेट नव्हे तर पत्रकार संघा साेबतच इतर समित्या सुध्दा स्थापन केल्या.
ज्या मध्ये शेतकर-यांच्या समस्याचे निवारण करता यावे म्हणुन बळीराजा समिती स्थापन केली. तसेच प्रत्येक खेड्यातल्या गावा गावात “गाव तीथे शाखा” ही समिती स्थापन केली. याच समितीच्या माध्यमातुन गावातील लाेकांच्या संपर्कात राहता यावे म्हणुन संपुर्ण राज्यात हा उपक्रम पुराेगामी पत्रकार संघाच्या मार्फत राबवला.

किरकाेळ व गंभीर गुन्हा घडत असताे त्यात अनेकांनच्या मद्यस्थीने एकमेकाला मदत करता यावी म्हणुन सुर्यवंशी सरांनी “पाेलिस मित्र समिती” सुध्दा स्थापन केली.
महिलांवर हाेणारे अन्याय, अत्याचार या करिता लढा देण्यास स्वता महिलांनी सक्षम व्हावे आणि महिलांचा आत्मविश्वास वाढावा व महिला स्वयंमपुर्तीने लढा देण्या सज्ज व्हावे हा संकल्प करून संपुर्ण राज्यात पुराेगामी पत्रकार संग्लित महिला, अन्याय, अत्याचार निवारण समिती गठीत केली. सुर्यवंशी सरांच्या मार्गदर्शनात ही समिती व त्यात कार्य करणा-या महिला जाेमात कार्य करत आहेत.
देशात कवी, लेखक, साहित्यीक, यांना एक महत्वाच स्थान दिल्या जाते.परंतु आधुनिक काळात त्यांना आपली कला सादर करण्यास व्यासपिठ मिळने अशक्य झाले हाेते अश्याच मान्यवरांना व्यासपिठ मिळाव म्हणुन “पुराेगामी साहित्य संसदचे” व्यासपिठ उपलब्ध करून दिले.
कलावंतांच्या ही अनेक समस्या आहेत. मात्र ख-या अर्थाने त्यांच्या कलेला न्याय व वाव मिळत नसल्याने पुराेगामी पत्रकार संघाच्या वतीने कला, क्रिडा, विश्व समिती गठीत करून कलावंतांच्या न्याय हक्कासाठी कलावंताच्या पाठीशी पुराेगामी पत्रकार संघ निरंतर लढा देण्यास सज्ज आहे असा कलावंतांना विश्वास तथा संदेश दिला.
__________________________________________________
पुराेगामी पत्रकार संघा साेबत असलेल्या प्रत्येक पदधिकारी, सभासदांना व इतरांना सरांचे मार्गदर्शन मिळत असुन संघासाठी काम करण्यास, प्रेरित करण्यास आणि नवे ध्येय गाठण्यास, नव्या बाबी शिकवण्यास सर्व संघातिल प्रत्येक सदस्य आज सक्षम दिसुन येताे, ज्यामुळे सरांच्या आशिवार्दाने पुराेगामी पत्रकार संघ हा २०१७ पासुन हळु हळु यश प्राप्त करित असुन सुर्यवंशी सरांमुळे मार्गदर्शनात सर्वांना प्रोत्साहन मिळत आहे.
नेतृत्व कौशल्ये हे गुण जे एखाद्या व्यक्तीला प्रभावशाली भूमिकांमध्ये काम करण्यास मदत करतात. या कौशल्यांच्या मदतीने एखादी व्यक्ती जे करू शकते ते दुसरे कुणी नसुन मा.विजय सु्यवंशी सर आहेत.

सरांच्या मार्गदर्शनात विचार केल्यास आम्ही काय करू शकताे. हे नक्की बघा.
👇👇👇👇👇
• कार्ये निर्देशित आणि पूर्ण करू शकताे.
• पुढाकारांना समर्थन देऊ शकताे.
• संघात एकतेची भावना निर्माण करू शकताे.
• प्रक्रियांचे निरीक्षण करू शकताे.
• उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नेऊ शकताे.
• संघाला देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, गांवात पाेहचवु शकताे.
सरांचे नेतृत्व कौशल्याशी संबंधित काही खास गोष्टी.
👇👇👇👇👇
• सरांचे नेतृत्व कौशल्ये सॉफ्ट स्किल्स आहेत.
• सरांनी नेतृत्व कौशल्यांचा वापर लोकांना एकत्रित करण्यासाठी समान ध्येयासाठी कार्य करण्यासाठी केला.
• नेतृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी, सर नेहमी मार्गदर्शन करित सल्ला देत असतात.
• प्रामाणिकपणा हा चांगल्या व्यक्तींचा गुण आहे. प्रामाणिक व्यक्ती पारदर्शी असतात आणि दिलेली आश्वासने पाळतात त्यातले सुर्यवंशी सर आहेत हे मला नक्की सांगावस वाटत.
• सरांना पुराेगामी विचारांचा वारसा पुढे नेण्यास पुराेगामी पत्रकार संघातला व्यक्ती हा राजकारणात आपले महत्वांचे स्थान निर्माण केलेले बघायचे असुन ते त्यांचे एक स्वप्न पुर्ण व्हावे म्हणुन प्रयत्नशिल आहेत. पत्रकार मधुन झालेला नविन नेता हा पत्रकार बांधवांच्या तसेच जनतेच्या समस्या सोडवू शकतात हा त्यांचा विश्वास संघातिल कार्य करणा-या प्रत्येक व्यक्तीवर आहे. म्हणुन मा.विजय सुर्यवंशी सर व त्यांना सुरवाती पासुन साथ देणारे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त करणारे मा.बाळासाहेब अंडांगडे माझ्या मते तरि माझ्यासाठी तसेच सर्वांसाठी आदर्श आणि मार्गदर्शन स्थानी असतील.
निलेश ठाकरे
राज्य सचिव
राष्ट्रीय पुराेगामी पत्रकार संघ



