Saturday, April 18, 2026
Google search engine

शंभर, दोनशेचे मुद्रांक बंद, घ्यावा लागणार पाचशेचा मुद्रांक. सामान्यांना बसणार तीव्र आर्थिक फटका

शंभर, दोनशेचे मुद्रांक बंद, घ्यावा लागणार पाचशेचा मुद्रांक. मंत्रिमंडळाचा निर्णय, सामान्यांना बसणार तीव्र आर्थिक फटका.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकार लाडकी बहीणसारख्या लोकप्रिय योजनांचा पाऊस पाडत असल्याने आर्थिक घडी विस्कटल्याने १००, २०० रुपयांचे मुद्रांक बंद करण्याचा निर्णय शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने घेतला आहे.

परिणामी शंभर रुपयांच्या मुद्रांकावर होणाऱ्या कामासाठी आता चक्क ५०० रुपयांचा मुद्रांक खरेदी करावा लागणार आहे. परिणामी एका मुद्रांकामागे ४०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. महायुतीच्या लोकप्रिय योजनांची सपाट्याची थेट झळ सामान्यांच्या खिशाला बसत असल्याचे समोर येत आहे.

त्यामुळे एकीकडे लाडकी बहिण याेजना व इतर याेजनेचे निवडणुकी पुर्वी सुरवळीत सुरू ठेवण्यासाठी आधी सुरू असलेल्या याेजनेचेचे फंड याकडे वळवुन मुद्रांक शुल्कात ही वाढ करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री लाडका भाऊ, आनंदाया शिथा, मुख्यमंत्री अन्नपूर्ण अशा योजना सरकार राबवत आहे. यासाठी दर महिन्याला कोठावधींचा बोजा हा राज्य सरकारवर वाढत जात आहे.

या पुर्वी मुद्रांक दरवाढीचा वर्षनिहाय आलेख असा आहे.

१९९७ म्ध्ये ५ रु. २००० साली १० रु. २००१ वर्षी २० रु.
२००८ साली १०० रु. आणि आता २०२४ अपेक्षित नव्हते ते ५०० रु. करण्यात आले आहे.

चंद्रपुर जिल्ह्यात दर महा हजाराहून अधिक मुद्रांक लागत असतात.

कशासाठी लागतात मुद्रांक?

प्रतिज्ञाप संधकारपत्र, वाटणीपत्र, पतसंस्था कामी, लग्न नोंदणीवेळी, भाडे करारनामा, सामंजस्य करार प्रतिज्ञापत्र, खरेदी विक्री व्यहाराचे प्रतिज्ञापत्र, करारपत्र, बैंकींग कामाकरिा तसेच न्यायालय कामकाजासाठी. मुद्रांक लागत असताे.

• जिल्ह्यातिल अनेक दस्त लेखनिक आहेत. जिल्ह्यातील दस्त लेखनिक यांच्याकडून रोज शंभर रुपयांचे मुद्रांक घेऊन जाणा-यांची संख्या माेठ्याप्रमाणात आहे व मुद्रांक घेवुन जात असतात. याशिवाय बँका व इतर ठिकाणाहूनही मुद्रांक खरेदी केल्या जाते. रोज सुमारे किती तरी शंभर रुपयांचे मुद्रांक विकत घेऊन वापरले जातात. परंतु आता ५०० रुपयाचे मुद्रांक खरेदी करावे लागले तर ४०० रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत.

मुद्रांकाचा दर शभर रुपयांवरून पाचशे रुपये केल्यामुळे सामान्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. वाड चारपटीने करण्यात आली आहे आहे. ती कमी असायला हवी हाेती परंतु राज्यातिल या सरकारनी कसला ही विचार न करता यात भरमसाठ वाढ केली. आधी आवश्यकतेनुसार १००, २०० रुपयांचे मुद्रांक शुल्क भरून दस्तावेज नोंदणीकृत करता येत होता. आता पाचशे रुपये मोजावे लागणार आहेत.

निवडणुकी पुर्वी राज्यातिल जनतेला याेजनेचे लॉलिपॉप देवुन पुन्हा सत्ता स्थापन करण्याचे सरकारचा  विचार दिसुन येताे. त्यामुळे राज्य सरकारता तिजोरीवर भर पडत पडत आहे. परिणामी निधींची कमतरता पाहत असल्याने सरकार उत्पन्न वाढीसाठी विचार न करता विविध निर्णय घेत आहे.

मात्र उत्पन्नवाढीसाठीच शासनाने आता १०० आणि २०० रुपयांचे मुद्रांक बाद ठरवत ५०० रू. मुद्रांक घेण्याचा आदेश जारी केला आहे. कोणतेही व्यक्तिगत किंवा अन्य दस्त नोंदणीसाठी आता ५०० रूपयाचाच मुद्रांक घ्यावा लागणार असल्याने नागरीकात राेष व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page