Saturday, April 18, 2026
Google search engine

घुग्घस लायड्स मेटल्सच्या प्रस्तावित प्रकल्पाला नागरीकांनी विराेध करायला हवा.

घुग्घस लायड्स मेटल्सच्या प्रस्तावित प्रकल्पाला विराेध करा.

आधिच चंद्रपुर जिल्ह्यातिल नागरिकांचे प्राण प्रदुषनामुळे धाेक्यात असंतांना लाईट्स मेटलच्या नविन प्रकल्प सुरू झाल्यास पुन्हा प्रदुषनात नक्कीच वाढ हाेईल. वायू प्रदूषणात धोक्याची पातळी गाठेल याला नाकारता येत नाही. घुग्घुस येथे लॉयड मेट्ल्सचा ४० लाख टन प्रतिवर्ष क्षमतेचा विस्तारीत प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला जिल्ह्यातील पर्यावरणवाद्यांनी तीव्र विरोध जरी दर्शविला असला तरि ही सामान्य नारिकांनकडुन ही विराेध व्हायला हवा.

घुग्घुसचा श्वास कोंडणार

३० सप्टेंबरला या प्रकल्पासंदर्भात जनसुनावणी होणार आहे. परंतु जनसुनावनीत हाेत काहीच नाही हे या पुर्वी सुध्दा सिध्द झाले आहे. प्रकल्प सुरू करतांना राजकिय पुढारी, पर्यावरणवादी, तसेच मिडियातिल पत्रकारांना कसे मॉयनेज करता येत हे कंपनीच्या अधिका-यांना चांगलेच ठावुक आहे. म्हणुन या प्रकल्पाला विराेध करण्यास प्रकल्प परिसरातिल जनतेनी रसत्यावर उतरून पुढे येवुन विराेध करने अत्यंत गरजेचे आहे.

या प्रकल्पाला मान्यता मिळाल्यास घुग्घुस आणि परिसरातील नागरिकांना जगणे कठीण होईल. हवा, पाणी आणि जमीन प्रदूषित होईल. त्यामुळे तेथिल वातावरण दुषित हाेवुन नागरिकांच्या आराेग्यावर नक्कीच परिणाम हाेईल यात कुठलिच शंका नाही. विशेषत म्हनजे घुग्घुस आणि उसेगावचा श्वास पुर्ण पणे काेंडला जाईल हे सांगायची कुनाला ही गरज नाही. आजच्या घडीला युष्युस येथील लाइस मेटल्स प्रकल्पात  पाचशे मेट्रीक टन प्रति स्पीज आपरनचे उत्पादन राेज घेतले जाते. आता या प्रकल्पाची क्षमता वाढली आणि उत्पादन दोन लाख ७० हजार मेट्रिक टनापर्यंत पोहोली आहे. आधीच याच प्रकल्पामुळे प्रदूषणाची समस्या तीव्र हाेवुन वाढलेली दिसुन येत आहे.

प्रदुषन नियंत्रन मंडळ व पर्यावरणाच्या माहिती नुसार या परिसरात २०२४ या वर्षात प्रदूषण निर्देशांक ६३.६३ एकदा नोंदविला गेला. तो धोक्याच्या पातळीजवळ पोहचला असल्याची माहीती आहे. २०१३ मध्ये घुग्घुस प्रदूषणचा (वायू जल आणि जमिनीचे प्रदूषण) निर्देशांक ८१.९० इतका होता. यावरून येथील प्रदूषणाची तीव्रता किती माेठ्या प्रमाणात आहे हे लक्षात येईल. विशेष म्हणजे स्पाज आयरनच्या प्रकल्पांमुळे हाेणा-या प्रदूषणामुळे देशातच नव्हे तर जगभरात विरोध हाेत आहे.

घुग्घुस, उसेगाव परिसरातील प्रस्तावित प्रकल्प ४.० दशलक्ष टन प्रती वर्ष क्षमतेचे अतिरिक्त पॅलेट प्लांट,
०.८४ दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेचे अतिरिक्त क्षमतेचे ब्लास्ट फर्नेस ०.४ दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेचे अतिरिक्त कोक ओव्हन, ६७० टन प्रति दिवस क्षमतेचा अतिरिक ऑक्सिजन प्लांट, १० मेगावॉट पावर क्षमतेचा अतिरिक्त थर्मल पावर प्रोजेक्ट. १. ०५ दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेचा रोलिंग मिल ०. २१६ दशलक्ष टन प्रती वर्ष क्षमतेची कोल वॉशरी • कोल वॉशेरीला जोडून ८५ मेगावॉट क्षमतेचा पावर प्लांट होते. अनेक प्रकल्प बंद पाडले, मात्र, आता लाईट्स मेटल कंपनी द्वारे घुग्घुस येथे या प्रकल्पाचा विस्तार करण्याचा घाट घालता जात आहे.

प्रकल्प हाेत असलेल्या चारही बाजूला असलेली गावे आधीच प्रदूषित आहेत. त्यातही उसेगाव हे गाव आधिपासुनच प्रदूषणाचे केंद्रबिंदू मानले जाते. मेटल्सला लागणारे कच्चा लोखंड जिल्ह्याबाहेरून आणला जातो. चंद्रपूर गडचिरोली जिल्हातील भामरागड, अहेरी, सिरोंचा या भागातील रस्ते त्या कारणाने अवजड वाहन येजा करत असल्याने पूर्ण पणे खराब झालेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सुध्दा रस्ते त्याच कारणाने खराब हाेत चालले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्याच्या या गावातील कापसाची शेती पुर्णता उद्‌ध्वस्त झाली आहे. सुरजागड येथिल कारणामुळे शेजारील गावाचे रंग लाल झाले आहे.

श्वसनाचे आजार वाढले

घुग्घुसचे प्रदूषण आधीच कोळसा खाणीमुळे वाढलेले आहे. या परिसरात धर्मल, मायनिंग आणि स्पाज आयरन प्रकल्प आहे. आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. घरोघरी श्वसनाचे आजार जडले आहे. जगभरातील स्पॉज आयान प्लांट्सला कोळसा आधारित आणि गॅस आधारित अशा दोन प्रकारांत विभागले जाते. नैसर्गिक वायूवर आधारित प्लांट्स हे प्रदूषणाच्या संदर्भात इको फ्रेंडली समजले जातात. परंतु घुग्घस येथील प्लांट हा कोळशावर आधारित आहे. त्यामुळे प्रदूषणाची तीव्रता आणखीनच वाढणार आहे.

नद्यांतील पाण्याचा रंग लाल झाला आहे. त्यामुळे एका कारखान्यासाठी अनेक गावे प्रदूषित होऊ लागली आहेत. अपघात वाढले आहे. त्यामुळे या प्रस्तावित प्रकल्पाला विरोध अनेकांचा विराेध हाेत आहे. ३० सप्टेंबर हाेणा-या जनसुनावणीला जाऊन अनेक नेते व पर्यावरणवादी यांनी विरोध केला केला. जरि असला तरि ही आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी या प्रकल्पाला विरोध या परिसरातील नागरिकांन कडुन हाेने गरजेचे आहे.

लायड्स बंद करण्याचे आदेश

सन २०१८ मध्ये प्रदूषनच्या नियम अटीचे उल्लंघन केले हाेते. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणात सर्वांत मोठा वाटा याच कंपनीचा आहे असे गृहीत धरून घुग्घुस येथील लायड्स मेटल प्रकल्प बंद करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला होता. पण तसे झाले नाही मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आर्शिवादानेच पुन्हा  प्रदूषणात भर घालणारा हा उद्योग आता विस्तारीत प्रकल्पाच्या तयारीत आहे. परंतु आता हा प्रकल्प हाेता कामा नये म्हणुन नागरिकांनीच आता या विस्तारित प्रकल्पाला विराेध करायला हवा. तुर्तास ऐवढेच.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page