Saturday, April 18, 2026
Google search engine

कामगारांना जबरण नाेटीस दिल्याने विजयाक्रांती कामगार संघटना व इंटक काँग्रेसच्या माध्यमातून कंपनीला दिला तिव्र आंदाेलन करण्याचा इशारा

कामगारांना जबरण नाेटीस दिल्याने विजयाक्रांती कामगार संघटना व इंटक काँग्रेस च्या माध्यमातून कंपनीला दिला तिव्र आंदाेलन करण्याचा इशारा

महामिनरल्स माईनिंग बेनिफीकेशन प्रायवेट निमीटेड उसगाव यांनी दिलेल्या 22/9/2024 च्या नोटीस नुसार कंपनीने येथील सर्व कामगारांंना दिवाळीच्या महत्वाच्या सनाच्या ताेंडावर सर्व कामगारांच्या ड्युडीत कपात करून दिनांक 1/10/2024 पासुन 15 दीवसाचे रोटेशन मध्ये ड्युवट्या देण्याचे जबरण नोटिस कंपनीच्या नोटीस फलकावर लावले.

त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला असुन याच्या बाबीचा विरोधात विजयक्रांती कामगार संघटना व इंटक कांग्रेसच्या माध्यमातुन कंपनीला दिनांक 28/9/2024 रोजी लेखी निवेदन देण्यात आले. तरी सुध्दा कंपनी प्रशासन कामगारांच्या समस्या ऐकायला तयार नाही?

विजयाक्रांती कामगार संघटनेच्या अध्यक्षा शिवानीताई वरेट्टीवार यांच्या मार्गदर्शना खाली विजयाक्रांती कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष तथा राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) चे चंद्रपूर जिलाध्यक्ष मा. प्रविण भाऊ लांडगे यांच्या नेतृत्वात दिनांक 30/9/2024 रोजी सर्व कामगारां सोबत कंपनी प्रशासनाची भेट घेऊन कामगारांच्या 15 महिण्या पासुन न भरलेल्या थकीत PF व ESIC बद्दल तसेच 15 दीवसाच्या रोटेशन बदल खडसावून जाब विचारला व कंपनीने जर 28/10/2024 पर्यल थकीत PF व ESIC चे पैसे मजुरांच्या खात्यात न भरल्यास तसेच 15 दीवसाचे रोटेशन थांबवून पुर्वरत कामगारांना 26 दीवसाच्या ड्युटी न दिल्यास कंपनी बंद तिव्र आंदोलनाचा इशारा विजयक्रांती कामगार संघटनेचे कार्यध्यक्ष तथा इंटक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. प्रविनभाऊ लांडगे यांनी दिले असता.

कंपनी प्रशासनानी 15 दीवनाचे रोटेशन थांबवून कामगारांना पुर्ववत 26 दीवसाच्या ड्युट्या सुरू केल्या. 28/10/2024 पर्यंत जे 130 कामगारांचे PF व ESIC भरण्याचे आश्वासन सुध्दा यावेळेस देण्यात आले. त्या मुळे सर्व कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण हाेवुन कामगारांनी आनंद साजरा
केला.

या प्रसंगी उपस्थीत विजयाक्रांती कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष तथा राष्ट्रीय मजदुर काँग्रेसचे (इंटक) चे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष मा. प्रविणभाऊ लांडगे, महासचिव मंगेश आसुटकर, उपाध्यक्ष प्रदीप ठाकरे, उपाध्यक्ष मिलिंद कांबडे, प्रदिप डाखोरे, गणपत दुर्वे, राजु आसुटकर, मनोज दरेकर, जावेद शेख इत्यादी. कामगार या पाठीशी खंबीर पणे उभे राहुन कंपनीला कामगारांच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page