जाे कुणी म्हनताे यंदा पक्षाची टिकीट माझ्याच खिशात.

चंद्रपुर विधानसभा ७१ ही अनुसुचित जाती करिता राखीव आहे. या विधानसभा क्षेत्रात दाेनदा बीजेपी पक्षाचा आमदार हाेता. परंतु मागिल विधानसभेची ही जागा कुठल्याच पक्षाला मिळवता आली नव्हती. मागील विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष आमदारांनी प्रचंड मत घेत चंद्रपुर विधानसभेची जागा आपल्या नावावर केली.
नुकत्याच झालेल्या लाेकसभेत मात्र बिजेपी पक्षाला प्रत्येक विधानसभेत, तसेच बुथवर भरपुर मत घेवुन कॉंग्रेस पक्षानी आघाडी मिळवीत अडीज लाखचा वरिल लिड घेतली आणि विद्यमान आमदार तथा राज्याच मंत्री जिल्ह्याचे पालक मंत्रींना यांना मात दिली. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाच्या मार्फत उमेंदवारी मागणा-यांच्या संख्येत दिवसेन दिवस वाढ हाेतांना दिसुन येत आहे.
अवसे नवसे गवसे यांना सुध्दा लागले आमदार व्हायचे डाेहाळे.
त्यामुळे अवसे गवसे नवसे यांना सुध्दा आमदार व्हायचे डाेहाळे लागले आहेत. असे स्पष्ट चित्र आता चंद्रपुर विधानसभा ७१ येथे बघण्यास मिळत आहे. जवळ पास २५ च्या घरात उमेंदवार कॉंग्रेस पक्षाकडुन उमेंदवारी मागण्यास सज्ज दिसुन येतात व प्रतीकक्षेत आहेत. आप आपल्या परिने दिल्लीची वारी करीत फिल्डींग लावली असे सांगत, त्यात काही भावी आमदार हाेण्याचे “मुंगेरीलाल के हसिन सपने” बघत यंदाची कॉंग्रेस पक्षाची टिकीट चक्क आपल्याच खिशातच आहे. अशी बर्तावनी करतांना आढळुन येत आहेत. जाे ताे यंदाची कॉंग्रेस पक्षाची टिकीट आपल्याच मिळेल असा दावा करित स्वताहुन मिरवत आहेत.
मात्र कॉंग्रेस पक्षातुन स्थानिक व पक्षाच्या कार्यक्रत्यामधुनच असलेल्या उमेंदवारालाच पक्षानी टिकीट द्यावी अशी मागणी कार्यकर्ते करतांना दिसत आहेत. कॉंग्रेस पक्षातले कार्यकर्ते तसेच नेत्यांचा एकच सुर दिसुन येताे. परंतु पक्ष श्रेष्ठी कुनाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकेल हे काही आत्ताच नक्की कुणाला ही सांगता येणार नाही?
अपक्ष विद्यमान आमदार साहेब हे जयंत्या, साेहळे, उत्सवाचे बैनर पाेस्टर लावुन मतदारांना लुभावण्यात मग्न आहेत. काही नगर सेवक सुध्दा या प्रतीस्पर्धेत आमदार हाेण्यासाठी जाेमात मैदानात उतरले आहेत. गेल्या पाच वर्षात कधी नव्हे दिसणारे निवडणुक जवळ येताच बैनर पाेस्टर लावुन जाहीरात करित निवडणुकी पुर्नीच आपला खिसा रिकामा करत आहेत. जे महानगरपालिका निवडुन येण्याचा मादा ठेवत नाही ते मात्र आता पासुनच आमदार झाल्या सारखेच ताेर्यात आहेत.
एकीकडे राज्यातल्या सत्ताधारी महायुती पक्षाचा उमेंदवार चंद्रपुर विधानसभे करिता काेण असणार आहे हे अद्याप ही माहीत नसुन महायुतीचा उमेदवार म्हणुन जेमतेन माेजकीच नावे पुढे आली आहेत.
अपक्ष विद्यमान आमदारच महायुतीचे उमेंदवार राहतील म्हणुन विधानसभा क्षेत्रात चर्चा हाेतांना दिसते.
एकीकडे बीजेपी पक्षात चंद्रपुर येथील विद्यमान आमदार महाेदय पक्ष प्रवेश करतीलच अशी ही चर्चा आहे परंतु अजुन पर्यंत आमदारांंसाठी हा मुहर्त अद्याप ही घडुन आलेला नाही.
त्याचे मुख्य कारण म्हणजे, विश्वसनिय सुत्राकडुन विद्यमान आमदार सुध्दा कॉंग्रेस पक्षाची टिकीट मिळवण्यास प्रयत्नशिल आहेत अशी माहीती समाेर येत आहे. ज्या प्रकारे लाेकसभेत मंत्री महाेदय निवडुन येणारच नाही असे मतदार म्हणायचे.
अगदी तसेच विद्यमान आमदार हे कुठल्याही पक्षाकडुन उमेंदवारी मिळवतील तरी सुध्दा येणा-या निवडणुकीत ते निवडुण येणार नाही असे विधानसभा क्षेत्रात अनेकांकडुन बाेलल्या जात आहे.
चंद्रपुर येथिल यंदाची निवडणुक विद्यमान आमदाराला सहज जाणार नाही असे स्पष्ट पणे राजनेतिक जानकाराचे मत आहे. आमदार महाेदयांनी आपल्या विधान सभा क्षेत्रात किती नवीन उद्याेग आता पर्यत आनलेत व किती स्थानिक बेराेजगारांना राेजगार उपलब्ध करून दिला. तसेच निवडणुकी पुर्वी मतदारांना केलेल्या आश्वासनाची पुर्तताच करता आली नाही. तर या वेळेस मतदार काय म्हणुन पुन्हा यांना निवडुन देतील? असा प्रश्न आता मतदारांन करून करण्यात येत आहे.
वर्षातुन साेहळे घेणे, उत्सव साजरे करणे, अनेक ठीकांनी निधी उपलब्ध करून देण्याचे बैनर, पाेस्टर लावुन आणि स्वताचीच जाहिरात करून २०२४ विधानसभा निवडणुक चंद्रपुरच्या विद्यमान आमदारांना जिंकता येणार नाही. याचा नुकताच चांगला अनुभव लाेकसभेत मंत्री महाेदयांना आला. त्यांनी सुध्दा अनेक असे माेठे ईव्हेंटचे चंद्रपुरकरांनकरिता आयाेजन केले हाेते? पण शेवटी काय झाले ते सर्व चंद्रपुरकरांना माहीत आहे. मात्र मतदार ईव्हेंटलाच विकास समजुन निवडुण देतिल. अश्या भ्रमात मंत्री नाही तर त्यांचे कार्यकर्ते हाेते. जमिनी स्तरावरिल काम काहीच नव्हते हे निवडणुकीत पराजीत झाल्या नंतर याची जानिव झाली. हा ताजा अनुभव डाेळ्यापुढे असल्यांने विद्यमान आमदाराची सध्या तरि दिवसेन दिवस फुग्यातली हवा हळुवार कमी हाेत असल्याचे विराेधी पक्षांच्या काही नेत्यांचे म्हणने आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत जर का दाेन्ही मुख्य पक्षानी चांगले उमेंदवार दिले तर विद्यमान आमदार निवडुण येणारच हे शक्यच नाही असे जानकार सांगत आहेत. परंतु महायुतीची माळ जर का विद्यमान आमदाराचा गळ्यात पडल्यास त्यांच्या जिंकुन येण्याच्या आशा थाेड्याफार पल्लवीत हाेवु शकतात. त्याच साेबत वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, अपक्ष उमेंदवारांचे आव्हान हे राहणारच याला नाकारता येत नाही.
2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत चंद्रपुरातच नव्हे तर जिल्ह्याच्या इतर पाच विधानसभेत. कधी न दिसणारे उमेंदवार बैनर पाेस्टरच्या माध्यमातुन विधानसभेच्या क्षेत्रात आपला प्रचार, प्रसार करित गावाे गावी जाऊन मतदारांच्या भेट देवुन छाेट्या स्वरूपाचे कार्यक्रम राबवत करित आहेत. हे करतांना मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुध्दा करतांना भावी आमदार करतांना दिसतात.
मात्र लाेकसभेच्या निवडणुकीत मतदार हा आता भुलथापा देणा-या नेत्यांनवर विश्वास ठेवणार नसुन आपल्या तर्क बुध्दीने विचार करून मतदान करतांना दिसुन येईल. कारण मतदार वर्ग आता जागृत हाेत चालला आहे. विचार करू लागला आहे. केवळ फाेकळ विकासाचा कागावा करणारे नेत्यांचा खाेट्या आश्वासनाला बळी न पडता यंदा तरि याेग्य ताे उमेंदवार निवडणुन देतील हे नक्की. लाेकसभा आणि विधानसभा निवडणुक हे पुर्ण पणे वेगळी असते तर त्याचा निकाल सुध्दा हा वेगळाच असेल यात कुठलीच शंका नाही. तुर्तास ऐवढेच…..



