कार्यकर्त्यांनी ‘पालख्या’ उचलणे बंद करावे
‘कार्यकर्ता’ हा शब्द हल्ली फारच सवंग झालाय. ‘राजकीय कार्यकर्ता’ हा तर आता बदमाश, बदनाम यांना समानअर्थी शब्द झालाय.
विविध राजकीय पक्षांचे ज्येष्ठ, श्रेष्ठ नेतेसुद्धा पराकोटीचे मतभेद झाल्यावर बंडखोरीच्या भाषेनंतर अपमान गिळताना ‘मी पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आहे. पक्ष देईल ती जबाबदारी मी निष्ठेने पाळेन,’ असंच म्हणतात. परंतु ते नुसते त्यांचे साेंग असते.
अशावेळी प्रश्न पडतो तो हा, की ‘सामान्य कार्यकर्ता’ म्हणजे नेमका कोण?
थोडक्यात- ‘सामान्य कार्यकर्ता’ ही भाषणात, घोषणांत अत्यंत मूल्यवान असलेली गोष्ट- प्रत्यक्षात मात्र खोगीरभरती, हरकामे, निष्ठेची नशा चढलेले सरफिरे, आपल्यातल्या न्यूनगंडाला स्वामीभक्तीची झालर लावून ती जळीस्थळी दिसेल अशा धडपडीत असणारे. म्हनजे ‘सामान्य कार्यकर्ता’
याशिवाय साहेबांची हरप्रकारे ‘मर्जी’ सांभाळणारे; दादा, भाई, नाना, तात्या, भाऊ यांचे सर्व प्रकारचे ‘हिसाेब’ सांभाळणारे त्यांच्या विरंगुळ्याची सोय पाहणारे आणि सत्ता, संपत्ती, दहशत यांच्या नशेत तरंगणाऱ्या या सर्वाना रात्री खांदा देऊन पलंगावर नेऊन झोपवण्यापर्यंत सगळी कामे हे सामान्य कार्यकर्ते करतात.
नेत्यांच्या ‘सौ’सुद्धा अशा कार्यकर्त्यांना सख्खा भाऊ, भावजी अशा नात्यात बांधून ‘लक्ष’ ठेवण्याची सोय करत असतात. त्यामुळे वेळप्रसंगी वहिनीसुद्धा पाच-दहा हजाराला या कार्यकर्ताला ‘नाय’ असे म्हणत नाही.
यापलीकडेही सामान्य कार्यकर्त्यांची एक वेगळी जमात असते. ती बऱ्याचदा पक्षाच्या विचारधारेकडे आकृष्ट होऊन विचारांना.. पर्यायाने पक्षालाच निष्ठा वाहणारे असतात.
हे थोडे शिक्षित, वाचनाची आवड, तोंडपाठ संदर्भ, पक्षाच्या मूळ विचाराला अनुसरून साधी राहणीमानी, विचारांसाठी पूर्णवेळ देणारे कार्यकर्ते झालेत.
पंचविशी-तिशीत पक्षात आलेले हे कार्यकर्ते पक्ष-कार्यालयातल्या साध्याच खुर्चीत बसुन बसुन लवकरच म्हातारे होतात. तरीही आपल्या नेत्यांनसाठी त्यांची निष्ठा नेहमी करिता कायम असते.
कधीतरी येता-जाता मोठय़ांनी (म्हणजे त्यांच्या मोठय़ा नेत्यांनी) नावाने एकेरी हाक मारून दखल घेतली तर समजा यांचा जीव धन्यच होतो.
मग मात्र हे बाजूच्यांना सांगणार- ‘बघ’ आमचे नेते आम्हाला विसरलेत ‘नाही ’ या अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी तेव्हा हा ‘काळ’ जणू थांबलेला असतो.
त्यांना वाटते, आपला पक्ष, आपले नेते अजूनही त्याच जुन्या, पक्षाच्या मूळ प्रेरणेनेच राजकारण, सत्ताकारण करत आहेत. बाहेर जग काहीही म्हणो, आपण खांद्यावरचा झेंडा, आदरणीय- माननीयसह कायम खांद्यावरच ठेवलाच पाहिजे.
‘कार्यकर्तांच्या आयुष्यात काळ हा असा अचानक थांबलेला नसतो त्याला इतिहास आहे.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सचोटीने काही करून ‘बदल’ घडवण्यासाठी, पक्ष, संघटना वाढवण्यासाठी कुणा साहेबांचं भाषण ऐकून, कुणा साहेबांचा लोकसंग्रह पाहून, कुणा साहेबांचं सत्तेतलं वजन पाहून, तर कुणा साहेबांचं कला-संस्कृती-खेळ यांवरचं प्रेम पाहून, पक्षाची जाज्ज्वल्य भूमिका पाहून, संघटनेच्या राडा करण्याच्या दहशतीवर भुलून, कधी आपला धर्म, कधी आपली जात, कधी आपल प्रांत, तर कधी आपली भाषा गोंजारणारे नेते मात्र कार्यकर्त्यांना प्रामाणिक, ध्येयनिष्ठ वाटत असतात.
आणि त्यांच्या या भुलथापेला मतदार जसे बळी पडतात तसे हे कार्यकर्ते बळी पडुन प्रचंड ऊर्जेनं नेते जातील त्या पक्षात सामील होवुन नेत्यांच्या प्रत्येक आंदोलनांकरिता पुढाकार घेत असतात.
ऐवढच नव्हे तर आपल्या नेत्यांचे स्वखर्चाने पोस्टर्स, बैनर (फ्लेक्स) लावुन स्वताला मिरवत असतात.
आपल्यापेक्षा सेर्वार्थाने गरीब कार्यकर्त्यांना चहा-भजी खावुन, वेळोवेळी स्वखर्चाने फोन, प्रवास करून ‘वरती’ अहवाल देत, बंगल्यावर किंवा पक्ष- कार्यालयात मोठय़ा साहेबांच्या केबिनमध्ये प्रवेश मिळवुन छाती फगवुन हे कार्यकर्ते आढळुन येतील.
आणि जर का सर्वासमोर नेते म्हणाले, ‘आला आमचा वाघ हे बघा उद्याचे नेते.. तू भेटतोस बघ मला लवकरच मुंबई, दिल्लीत अपोझिशनवालेपण तुझ्याबद्दल चांगलं बोलतात.. मीडियाचा तर तु लाडका झालास’ वगैरे वगैरे हे ऐकुन ताे कार्यकर्ता शहारून, फुलून जावुन गद गद हाेवुन, हुरळूनही जात असताे.
असेच मग निरंतर सुरू असते. त्या नंतर पुन्हा नव्या दमाने कार्यकर्त्यांचा कामाचा वेग वाढत जातो.
मात्र खरी गम्मत तेव्हा या कार्यकर्त्याला कळते. पक्षबांधणीसाठी विविध पदे तयार होतात तेव्हा. आपल्याशिवाय कोण होणार पदधिकारी, हा प्रामाणिक आत्मविश्वास निष्ठावान कार्यकर्ता असतो. कि त्यांचा माज असताे हे त्यांनाच ठावुक.
पण पदे जाहीर होताच या कार्यकर्त्याचा आरसा तडकून प्रतिमेचंच भंजन व्हायला लागत, त्याचे कारण ही तसेच. पद वाटल्या जातात तेव्हा मात्र तो कार्यकर्ता कुठेच नसतो,
हताश निराश झालेल्या कार्यकर्त्याला मग खांद्यावर हात ठेवून त्याला तेव्हा त्यांच्या नेत्यांकडन समजावले जाते.. ‘काय आहे- तू, मी, तो, हा सगळे आपण एकाच जातीचे आहाेत. बाहेर चित्र वेगळे दिसायला हवे म्हणून ‘त्याला’ पदावर बसवलाय ही आमची घटनात्मक मजबुरी आहे असे नेता आपल्या कार्यकर्त्याला समाजावुन सांगताे. आणि त्या कार्यकर्त्याला दिलासा देत, नाही तर तुझ्यासमोर तो काय आहे?
पुढे त्यांचा नेता नकली अश्रु वाहत म्हनताे बघ- पक्ष माझ्यावर, नाही, आमदार-खासदारांवर नाही, तर तुझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर चालतो’ असे असुन ही तरीही तो कार्यकर्ता आपल्या नेत्यांच्या पाेकळ आश्वासनावर विश्वास ठेवुन नेत्यांचा ‘डावा खांदा’, ‘उजवा खांदा’ अशी विशेषणं झेलत आणखी दहा-वीस वर्ष कसा बसा तरि करून वर्ष काढत असताे.
अश्या काही कार्यकर्त्यांच बायकोच्या पगारात घर चालते. अश्या कार्यकर्त्यांच कधीतरी याच्याकडून चार पैसे येतात. बायका-मुलांच्या इच्छा-आकांक्षांना नजरेआड करण्यासाठी पेपर वाचनाचे त्यांना नाटक करावे लागते. आणि बायकाेचे कानावर टाेचणारे शब्द ऐकावे लागतात.
हे सगळ्या बाबीला समाेर जातांना कार्यकरत्याच्या डोळ्यांत पाणी येतं. पण शिस्तबद्ध कार्यकर्त्यांसारखं ते पटकन माघारी फिरतं. आज तिरमिरीत जाऊन आपल्या नेत्यांचा निकाल लावावा म्हणून तो निघतो. पोहोचतोही बंगल्यावर. आणि त्याला दिसतं मग ‘बाळराजे’ किंवा ‘ताईं’चा राज्यारोहण सोहळा. सर्व अवसान गळून तो भानावर येतो तेव्हा कळतं- आज खांद्यावर तो हात नाही, तर बाळराजे/ताईंच्या पालखीचा दांडा आहे
देशाच्या साठ वर्षांहून अधिक काळातल्या आपल्या संसदीय राजकारणात जवळपास सर्वच पक्षांत ‘तो’ आहे. अगदी आणि दिवसेंदिवस अशा कार्यकर्त्यांची परिस्थिती कठीण होत आहे.
सतत निवडणुका जिंकणाऱ्या साहेबांना त्यांच्या पश्चात लोकसभेवर पाठवायला पक्षात आणि मतदारसंघात फक्त ‘आपलेच मुल मुली’च लायक वाटतात.
यांच्या वयाएवढी सर्व पक्षाचं काम केलेले निष्ठावान कार्यकर्ते यांच्या पक्षात आहेत मग त्यांना डावलून आपल्याच पाल्यांना का बर संधी देतात?
आम्ही लोकशाही स्वीकारली, पण रक्तातली सरंजामी गेली नाही. संस्थानं खालसा झाली आणि लोकशाही मार्गाने नवी तयार झाली. पूर्वी राजमहाराजांचं निधन झालं की त्यांच्या बायका सती जात. नव्या लोकशाहीतले राजेमहाराजे गेले की त्यांच्या बायका वारसाहक्काने तिकीट मागतात. पक्ष देतोही आणि सहानुभूतीची लाट प्रसंगी यशस्वीही होते. हा सगळा लोकशाहीच्या नावावर चाललेला सरंजामी खेळ थांबवू शकतात ते सर्व पक्षांतले सामान्य कार्यकर्ते. ‘वर्षांनुवर्षे सतरंज्या उचललेल्यांनी आता एकत्रितपणे ताठ मानेने पक्षनेतृत्वाला सांगायला पाहिजे- मुलाला/मुलीला आणताय राजकारणात? आधी सतरंज्या उचलायला लावा, चहा सांगायला सांगा, पूर्णवेळ काम करायला सांगा. पोलिसांचा मार खायला नि खटल्यांचं खटलं मागे लावून घ्या म्हणावं. मग द्या तिकीट. नेत्यांची पोरं-पोरी मोठी होणार, ती तिकीट घेणार. या पक्षातून त्या पक्षात आले- मिळाले तिकीट!
‘दीवार’ चित्रपटात कॉलगर्ल परवीन बाबी अमिताभला विचारते, ‘नाम नहीं पुछोगे?’ अमिताभ थंडपणे म्हणतो, ‘तुम जैसी लडकीयां नाम ऐसे बदलती है, जैसे लोग कपडे बदलते है!’ हेच वाक्य नेत्यांत्या अशा मोठय़ा यादीला लागू पडेल.
सर्वपक्षीय सामान्य, निष्ठावान, जुन्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी एकच निर्णय करावा. पक्ष कुठलाही असो, नेत्याची मुलं, नातलग किंवा आयाराम-गयाराम यांची अनामत रक्कम जप्त करायची. घराणेशाहीवर बोलणाऱ्यांनी आपल्या घरापासून सुरुवात करावी. अशा उमेदवारांना विरोध करत त्या- त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच नेतृत्वाला सांगायचं- ‘आम्ही काम करणार नाही. तुमची ताकद आहे तर आणा निवडून!’
अमेरिकेत जसं एखादी व्यक्ती दोनदाच राष्ट्राध्यक्ष होऊ शकते, तसंच बंधन आपल्याकडेही उमेदवारीवर घालता येईल. बाकी आपण साऱ्यांनीच पक्षभेद बाजूला ठेवून सरंजामी रक्ताचे ‘वंशाचे दिवे’ त्यांच्या विरोधात मतदान करून विझवले तरच खऱ्या अर्थाने लोकशाहीची पहाट होईल. तेवढे तरी आपल्या आणि त्या- त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हातात नक्कीच आहे. ‘बदल’ अशाच छोटय़ा छोटय़ा गोष्टींनी होईल. सुरुवात तर करा.
नेत्यांची हुजुरीगीरी करणा-या व पैश्याचा माज दाखवुन वेळेवर येवुन दिखावा करणा-या उमेंदवारांना निवडणुकीत संधी न देता. पक्षातिल निष्ठावान कार्यक्रत्यांना राजकिय पक्षानी संधी द्यायला हवी. परंतु तसे हाेतांना कधीच दिसत नाही.
विद्यमान परिस्थितीथ राजकारण है केवळ पैश्याचा जाेरावरच करता येताे असा संदेशच जनु प्रत्येक राजकिय नेत्यांना द्यायचा असताे की काय? असेच चित्र देशात आपल्या दिसुन येत आहे.
निष्ठावान कार्यकर्त्याला कढीपत्या सारखा वापरले जाते.
कोणतीही भाजी बनवण्याआधी गरम तेलात भाजीला चव यावी म्हणुन कढीपत्याला टाकुन भाजी चवीष्ट बनवण्याचा प्रयत्न केला जाताे.
मात्र तीच भाजी खाताना सगळ्यात पहिले त्याच कढी पत्याला उचलुन ताटाचा बाहेर फेकण्यात येते.
राजकारणात ही तसच आहे, ज्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या भरवश्यावर माेठे नेते हाेतात. तेच नेते माेठे झाल्यावर मात्र “काम झाल माझ” “काय करू तुझ” म्हनजे कार्यकर्त्यांना कढीपत्या सारख बाहेर काढुन टाकतात. राजकारणात कार्यकर्ते आपल्या पेक्षा माेठे नये हाेवु म्हणुन त्यांचाकडे जानिव पुर्वक दुर्लक्ष केल्या जाते.
त्याचे मुख्य कारण म्हनजे नेत्यांचे मुल, मुली तसेच भाऊ, बहिण पत्नीला आपला राजकारणाचा वारसान हक्क मिळावा म्हणुन हे राजकारणी सदैव प्रयत्नशिल असतात. त्यात नेत्यांची हुजुरगीरी चमचेगीरी करणा-यांची खास करून मज्जा असते.
प्रामाणिक पणे काम करणा-या कार्यकर्त्याचा काम पडल्यास वापर करून घेण्यात येते?
नेत्यांनसाठी राब राब राबणारे त्यांचा करिता दिवस रात्र कष्ट करणा-या कार्यकर्त्यांना मग मिळाले तरि काय? असा प्रश्न त्यांना केला तर उत्तर काहीच नाही हेच शब्द कार्यक्रत्यांन मार्फत उदगारले जातील हे नक्की.
अश्या कार्यक्रत्यांना मि हेच म्हणेल की आता तुम्हीच ठरवा तुम्ही कुठल्या पक्षातले कार्यक्रते आहात? आणि काेनत्या नेत्यांनसाठी तुम्ही निष्ठावान आहात?, नेहमिच निवडणुकीत निष्ठावान कार्यक्रत्याना पक्षा अंतर्गत टिकीट मिळावी म्हणुन इच्छा व्यक्त केली जाते. परंतु त्यांना डावलुन आपल्या पाल्यांनचे व हुजुरगीरी करणा-यांचे व वेळेवर पक्षात पक्ष प्रवेश करणा-यांचे नाव समाेर करण्यात येत असते?
म्हणुन आता कार्यकर्त्यांनी अश्या नेत्यांन बद्दल सावध व्हायला हवे..



