Friday, April 17, 2026
Google search engine

हीच खरी परिस्थिती आहे आज शासकिय कार्यालयाची.

हीच खरी परिस्थिती आहे आज  शासकिय कार्यालयाची.

सर्व सामन्यांचे कामे करण्यास अधिकारी व कर्मचा-यांना वेळ नसतो. यांना काही विचारल्यास उद्दट पने नागरिकांशी बाेलतात. साध कामा बद्दल विचारणा केल्यास उडवा उडवीचे उत्तर देत असतात.

प्रशासकिय कार्यालयातिल अधिकारी, कर्मचा-यांना आपली कामे झालेकी नाही हे बघण्यास येणा-या सर्व सामान्य नागरिक हे बेकामी आहेत की काय? असेच यांना वाटत असते.

कार्यालयाच्या फे-या मारून मारून वर्ष लाेटुन जातात परंतु कामे मात्र लवकर कुनाचे मार्गी लागत नाहीत. आता सामान्य नागरिकांनी प्रशासकिय कार्यालयाच्या हेलपाट्या खाव्या तरि किती मुळात हाच प्रश्न सामान्य नागरिकांना नेहमिच पडत असताे.

आपन शासकिय अधिकारी, कर्मचारी आहाेत म्हणुन आपल्यालाच खूप काम असतात असा यांचा समज असेल किवां आपन शासकिय सेवा देताे याचाच यांना माज किंवा घमंड कदाचित असु शकताे?

भ्रष्ट्र प्रवृतीचे लाेक आम्हाला खुप काम असतात. म्हणुन आम्ही थोडासाही वेळ कुठला ही वाया घालवत नाहीत असे नेहमिच दाखवण्याचा प्रयत्न करत असतात.

म्हणुन दफ्तर दिरंगाई कायद्याची प्रशासकिय अधिकारी, कर्मचा-या मार्फत जानिव पुर्वक निरंतर पायमपल्ली केली जात आहे.



कामचाेरपणा करणा-या अधिकारी व कर्मचा-यांची तक्रार वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे करून देखिल कुठलीच कारवाही अश्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर हाेत नसते.

कार्यालयात वावरत असतांना मात्र यांची वागणुक बघितल्यास यांची कार्यपध्दती पुर्ण पणे विपरित दिसुन येते. बहुतांश हे कर्मचारी, अधिकारी आपल्या चेंबर मध्ये आपल्या टेबलावर अधिकाअधीक अनुउपस्थित दिसुन येत असतात.

यांना कुठलीच वेळ मर्यादा नसुन ते कधीही येजा करत असतात. जशी की त्यांना शासना मार्फत तशी मुभाच मिळाली की काय? असेच जानवते.

शासनानी शासकिय अधिकारी कर्मचारी यांच्या कामाचा बाेझा वाढल्यांनी सहा दिवसाचा आठवडा हा पाच दिवसाचा केला. असे असुन देखिल हे अधिकारी तथा कर्मचारी केवळ मात्र तीन दिवस सुध्दा हे आपले प्रामाणिक पणे कार्य करू शकत नाहीत.

कामचाेरपणा करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्या कडे सांगण्या सारखे अनेक कारण असतात :-


१) आठवड्याचा पहिल्या दिवशी उशीरा येने ही तर अनेकांची सवय झालेली दिसुन येते.

२) आपल्या टेबलावर दिसले नाहीत आणि त्या बद्दल विचारल्यास साहेब लाेकांनी बाेलवले आहे अशी प्रतिक्रिया देत असतात.
३) आम्हाला एकच काम असतात का? जिल्हाधिकारी कार्यालयात मिटिंगसाठी जावे लागले. अहवाल यायला वेळ लागताे या पैकी इतर कारण सांगत असतात.

४) पालक मंत्री यांचा दाैरा असल्याने नियाेजन भवनात मिटींग बाेलवली आहे. त्या मुळे व्यस्त हाेताे, कामाचा व्याप वाढला तुमचे काम करण्यास वेळच नाही म्हणुन निर्लज पणे बाेलुन दाखवतात.

५) तुमचे काम झाले असते पण सध्या साहेब रजेवर गेले आहेत. सध्या सह्या घ्यायच्या राहिल्या अशी माहिती देत असतात. मग आपल्यालाच आपला राग येताे. घ्या की मग शेकुन गेल आपल काम पुन्हा लांबणीवर.

६) अनेक प्रकरणी नियमा प्रमाणे सर्व कागद पत्राची पुर्तता करून देखिल त्यात यांना जाेंदरा (पैसा) नाही मिळत म्हणुन निवळ सामान्य नागरिकांना फिरवत यांच्या मार्फत टाईमपास केल्या जाते. असे अनेक कारण यांच्या वतीने नागरिकांना सांगण्यात येत असते.
अशी परिस्थीती प्रत्येक शासकिय कार्यालयात अनेकांनी अनुभवली आहे.

अनेक महिला कर्मचारी तर कार्यालयात काम कमी आणि आपल्या माेबाईलवर जास्त दिसुन येतात.

बहुतांश अधिकारी व कर्मचारी हे इतर जिल्हा व तालुक्यातले असल्याने शुक्रवारी दुपारलाच घर पायवाट करित आपल्या गावाला निघुन जातात. मात्र साेमवारला कार्यालयात नेहमी प्रमाणे उशीरा येत असतात. त्या मुळे प्रशाकिय कार्यालयातिल सामान्य नागरीकाच्या प्रलंबीत कामे तर हाेतच नाही. नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करने तर दुरच म्हणावे लागेल.

कार्यालयाच्या एका काेपर्यात प्रकरणाच्या फाईली धुळ खात आहेत. त्याचे मुळ कारण म्हनजे एकाच अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे अतिरिक्त प्रभार असल्याचे बाेलले जाते. परंतु या सगळ्याबाबी करिता सामान्य मानसांची काय चुक आहे ? अश्या अधिकारी, कर्मचा-यांना यांना धडा शिकवलाच पाहिजे. त्यांचावर दफ्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत कारवाही हाेने अपेक्षित आहे.

त्या करिता सामान्य मानुस पेठुन उठला पाहीजे. परंतु तसे हाेत नाही. सामान्य मानुस हा आपल्या नेत्यावर, निर्भर असताे. म्हणुन  भ्रष्ट्राचाराची किड ही उदरी लागल्या सारखी दिवसेन दिवस वाढत असुन भ्रष्ट्राचार मात्र पुन्हा पुन्हा माेठ्या स्वरूपात रूद्र रूप धारण करताे आहे.

ज्याना कुनाला हा नाहक त्रास झाला असेल व तुमच्या फाईली शासकिय कार्यालयात धुळ खात असुन अनेक वर्षा पासुन काम हाेत नसेल त्यांनी कामाचे स्वरूप बघुन त्या कामाला किती कालावधी लागताे ते बघुन माहिती अधिकार अंतर्गत माहिती घेवुन तुमचे काम जानिव पुर्वक लांबवल्या गेले असेल अश्या अधिकारी व कर्मचा-यांची दफ्तर दिरंगाई कायदा अंतर्गत वरिष्ठ अधिकारी तक्रार यांच्याकडे तक्रार करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page