नुकत्याच देशातल्या लाेकसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीचा निकाल सुध्दा चकीत करण्या सारखा लागला असुन निवडणुकी पुर्वी प्रसार माध्यमाच्या द्वारे घेण्यात आलेला एक्जीट पाेलचा अंदाज साफ चुकीचा ठरला.
मात्र आपन निवडुण दिलेले लाेक प्रतीनीधी निवडणुकीत उभे एका पक्षात राहतात मात्र निवडुण आल्या नंतर लगेच स्वताच्या स्वार्थपाेटी पुंडरी मारून दुसर्या पक्षात जातात.
अश्या लाेकप्रतीधींना आता मतदारांनी धडा शिकवायला हवा. महाराष्ट्राचा राजकारणातच नव्हे तर देशातल्या राजकारणात आता आमदार खासदारांच्या बाेल्या लागत असुन ते लाेकप्रतीनीधी सर्रास पणे स्वताला विकत आहेत.
मग अश्या लाेकांना निवडुन द्यायचच कशाला? जर का लाेकप्रतीनीधी असे करत असतिल तर आता देशातिल मतदारांनी आता मतदान करतांना विचार करायला हवा. सध्याचे राजकारण फाेडाडीचे सुरू असुन हे लाेकशाहीला घातक ठरतांना दिसुन येते. हे हाेत असतांना कुठे तरी संविधानाचे उलंघन हाेतांना दिसुन येते.
पुढे काही राज्यातल्या विधाससभेच्या निवडणुका हाेणार आहेत. मागील विधानभेच्या निवडणुकीत मतदारांनी पक्ष चिन्ह बघुन अनेक आमदारांना मतदान करून निवडुन दिल. परंतु ते आमदार आपल्या पक्षा साेबत विश्वासघात करित दुसर्या पक्षाच्या बाकावर जाऊन बसल्याचे मतदांनी बघितले आहे.
ते का बर गेलेत हे मतदारांना सांगायची गरज नाही. देशातला मतदार हा आता जागृत झाला दिसुन येताे. म्हनुन नुकत्याच झालेल्या लाेकसभेच्या निवडणुकीत सर्व एक्जीट पाेलचे निकाल खाेटे ठरवले गेले. यंदा असे कृत्य करणार्यांना लाेकप्रतीनीधींना मतदारांनी चांगलाच धडा शिकवला.
या नंतर निवडुण आलेल्यांनी लाेकप्रतीनींधी पक्षांतर करतांना आपल्याला मतदारांनी आपल्या विधानसभा, लाेकसभेच्या क्षेत्राची सेवा करण्याची संधी दिली याचा ही विचार निवडुण येणार्यांनी करायला हवे. नाही तर ” ये पब्लिक हेै सब जानती है ये पब्लिक है, अजी अंदर क्या है अजी बाहर क्या है” हेच म्हनावे लागेल.



