Friday, April 17, 2026
Google search engine

आंबेडकरी घराण्याचा निवडणुकीय परफॉर्मन्स बाबासाहेबांच्या नावाला काळिमा फासणारा..

मिलिंद भवार
पँथर्स..यांचे लिखान

प्रकाश आंबेडकर, अकोला मतदारसंघ:*
या मतदारसंघातून निवडून येण्यासाठी उमेदवाराला सरासरी 40 टक्केच्या जवळपास मतदान लागतं.

1998 साली एकीकृत ‘RPI + काँग्रेस’ युती मधून उभं राहिलेल्या प्रकाश आंबेडकर यांना तब्बल 50.6 टक्के एव्हढं भरघोस मतदान लाभले व ते विजयी झाले.

1999 साली ‘भारिप बहुजन महासंघ + सोनिया काँग्रेस’ या युतीतून उभं राहिलेल्या प्रकाश आंबेडकर यांना 40.5 टक्के मतदान झाले व ते विजयी ठरले.

त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी 25 टक्क्यांच्या आत राहीली आहे. अपवाद एकदा ती 30 टक्क्यांपर्यंत गेली होती.

याचा अर्थ प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघातून स्वबळावर निवडून येवू शकत नाहीत..मतदारसंघात त्यांचे तेव्हढे कार्य नाही.

स्वतःच्या हेकेखोर स्वभावाला मुरड घालून या निवडणुकीत जर त्यांनी RSS/भाजपा विरोधातील आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला असता तर आज दलित वस्त्यांमध्ये वेगळाच जल्लोष असता कारण दलितांची त्यांना पडलेली मतं RSS/भाजपा च्या उमेदवाराच्या ‘कामी’ आली नसती.

वंचित भक्तांनी, बाबासाहेबांच्या विचारांना जागून, जर प्रकाश आंबेडकरांना योग्य निर्णय घेण्यास बाध्य केले असते तर निश्चितपणे आज वेगळा दिवस असता.

*आनंदराज आंबेडकर, अमरावती मतदारसंघ:*
जेमतेम 19 हजार मतं (1.6 टक्के) मिळवून आनंदराज यांनी आपलं ‘डिपॉजिट जप्त’ करवून घेण्याची किमया साधलीय. डिपॉझिटचे व निवडणूक लढविण्याचा खर्च आनंदराज यांनी ‘रिपब्लिकन सेना’ या आपल्या राजकीय पक्षाच्या खात्यातून नव्हे तर ‘बौद्धजन पंचायत समिती’ कडून उकळलाय हे विशेष. मतदारसंघात आपलं कवडीचंही काम नाही. मुंबईतील ‘इंदु मिल’ लढा या नावाने जे काही आहे..नाहिये, त्याच्या जीवावर अमरावती मतदारसंघात पोहोचणे हा मोठा विनोदच म्हणावं लागेल. अमरावती मधिल दलित-बौद्धांनी आनंदराज यांना झिडकारलं नाहीतर प्रकाश आंबेडकर प्रमाणे त्यांनीही भाजपा उमेदवाराला निवडून आणलं असतं.

*डॉ.भिमराव यशवंतराव आंबेडकर, होशियारपुर मतदारसंघ:*
या महाशयांनी सर्वात जास्त कहर केला. हे पार पंजाबला होशियारपुर येथे पोहोचले. या मतदारसंघातून तब्बल 62 वर्ष आधी (1962) भिमराव आंबेडकरांचे वडील यशवंतराव हे 37.1 टक्के मतदान घेत केवळ 10 हजार मतांच्या फरकाने पराजित झाले होते. एव्हढीच काय ती शिदोरी घेवून डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर होशियारपुर मतदारसंघातून ‘ग्लोबल रिपब्लिकन पार्टी’ या आपल्या नवीन पक्षातून उभे राहिले, सपाटून आपटले व ‘इज्जत’ घालवून घेतली. त्यांना लाभलेली 1041 मतं ही टक्केवारीत बसत नाहीत. 17 उमेदवारांमध्ये ते 14 व्या स्थानावर आले. NOTA मध्ये देखील डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर यांना लाभलेल्या मतांपेक्षा अधिक मतं पडलीत. याहून अधिक शरमेची बाब ती कोणती. यांनी  देखील आपल्या पंजाब मधिल निवडणुकीचा खर्च महाराष्ट्रातील ‘भारतीय बौद्ध महासंघ’ याच्या खात्यातून काढलाय.

बाबासाहेबांचे रक्त..बाबासाहेबांचे घराणे..म्हणून या तिघांनाच नव्हे तर बाबासाहेबांच्या नावाने आपली दुकानदारी चालवणार्यांना आंबेडकरी समाजाने अश्या सर्वांना त्यांचा भक्तांनी डाेक्यावर घेतलंय..

‘आंबेडकर’ हा शब्द म्हणजेच बाबासाहेब मानत या शब्दाभोवती फिरणारे या तिघांचेच नाही तर स्वताला आंबेडकरांचे स्वयंम घाेषित वारसदार समजणारे ‘आपआपले’ व काही ‘कॉमन’ असे ‘अंधभक्त’ आहेत जे यांचे असे ‘नव-गुलाम’ झालेत की हे आपल्या सोबत बाबासाहेबांचे नाव देखील खड्यात घालत आहेत तरी या नव-गुलामांना त्याचे काही सोयरसुतक नाही.

अध्यात्मातील भक्तिमार्ग उपयोगाचा असेलही मात्र, समाजकारण, राजकारणातील भक्त आपल्या ‘हीरो’ ची तर वाट लावतातच मात्र समाजाचे देखील हमखास नुकसान करतात. म्हणून, राजकारणातून ‘भक्ति संप्रदाय’ संपवून टाकला पाहिजे अशी बाबासाहेबांची सुस्पष्ट भूमिका या तिघा नेत्यांनीच अजून वाचलेली दिसत नाही तर त्यांच्या नव-गुलाम भक्तांचं काय घेवून बसलाय.

आम्हाला मात्र आमच्या उद्धारकर्त्या बाबासाहेबांच्या नावाला फासली जात असलेली ही काळिमा सहन होत नाही/कदापि होणार नाही.

महाराष्ट्रात एकीकडे असे बाबासाहेबांच्या नावाला काळिमा फासण्याचा प्रकार (यात जोगिंदर बाबा अन राम-डास तथा आळा बाळा सवई फवई इत्यादी ही आलेच) चालू असतांनाच उत्तरप्रदेश व तमिळनाडूतून दिलासा देणार्‍या बातम्या आल्या. या दोन्हीही ठिकाणी  बाबासाहेबांच्या नावाने स्वतंत्रपणे लढून खासदार निवडून आलेत (उत्तरप्रदेशात एक तर तमिळनाडूत दोन).

भीम आर्मी संस्थापक व आझाद समाज पार्टी चे चंद्रशेखर आझाद हे उत्तरप्रदेश, नागीना मतदारसंघातून 5 लाखांच्यावर (51.2 टक्के) एव्हढे भरघोस मतदान घेवून निवडून आलेत. चंद्रशेखर अवघ्या 37 वर्षांचे आहेत.
तर दक्षिण भारतातील तमिलनाडु येथून ‘लिबरेशन पँथर्स ऑफ इंडिया’ या पक्षाचे दोन खासदार भरघोस मतांनी निवडून आले आहेत. चिदम्बरम मतदारसंघातून डॉ. थोल थीरुवलवलन (पक्षाचे अध्यक्ष-संस्थापक) व विलीपुरम मतदारसंघातून रविकुमार. डी हे स्वतंत्रपणे निवडुन आले आहेत.

अब्राह्मण चळवळीचा गड समजल्या जाणार्‍या दक्षिण भारत अन विशेषकरून तमिळनाडूत दलितांची अवस्था मात्र काही वेगळी नाही. येथील अब्राह्मणी OBC पक्षांकडून दलितांच्या होत असलेल्या छळवणूकी विरोधात ‘दलित पँथर’ नावाने डॉ.थोल थीरुवलवलन यांनी सुरू केलेले संघटन ‘लिबरेशन पँथर्स ऑफ इंडिया’ या राजकीय पक्षाच्या नावाने स्थिरस्थावर झाले आहे. ‘जातिअंत’ याला आपले उद्दिष्ट मानून कार्यरत या पक्षाचे अनेक आमदार देखील आहेत.

थोडक्यात काय तर एकीकडे महाराष्ट्रातील दलित पुढारी अन खासकरून ‘आंबेडकर’ घराणे अन त्यांचे नव-गुलाम भक्त बाबासाहेबांच्या नावाला काळिमा फासण्याचे काम इमानेइतबारे करत आहेत तर दुसरीकडे ‘बाबासाहेब आंबेडकर’ हे नाव व या नावाच्या मागील ‘विचार’ जपण्याचा प्रयत्न महाराष्ट्राबाहेरील तरुण जोमाने अन प्राणपणाने करत आहेत.

अर्थात, ‘आझाद समाज पार्टी’ अन ‘लिबरेशन पँथर्स’ यांनी मारलेली बाजी यामागे त्यांचे कित्येक वर्षांचे समाजकारण, पक्ष बांधणी, मतदारसंघ बांधणी यासाठी घेतलेली मेहनत, सवर्णांशी केलेला जीवघेणा संघर्ष आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही…

*जाताजाता:*
आंबेडकरी विचारांचे पाईक असण्यासाठी व बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्यासाठी आडनावात ‘आंबेडकर’ असण्याची गरज नाही…तसंच हे आडनाव जर बाबासाहेबांच्या नावाला खड्यात घालत असेल..काळिमा फासत असेल तर त्याविरोधात भूमिका घेण्यापासून मागे सरण्याची देखील बिल्कुल गरज नाही.. हाच खरा आंबेडकरी बाणा..

विशेष म्हणजे निव्वळ ‘आंबेडकर’ या शब्दाने चिरकाल असे काही हासिल होत नाही. त्या साठी या नावामागे असलेली जीवतोड मेहनत, त्याग व समाजाप्रति समर्पण समजून घेणं व त्याप्रमाणे मार्गक्रमण करणं गरजेचं…

मिलिंद भवार
_पँथर्स_
9833830029
05 जून 2024

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page